गो. सुन्दर

Submitted by मेधा किरीट on 14 March, 2012 - 06:26

गो. सुंदर
मेधा किरिट
गो.सुंदर नसताना लाग्नासंबधी जाहिराती वाचायला मला खूप आवडतात. माझ लग्न वेळे आधीच ठरलं तेव्हा जाहिराती वाचण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही. पण तरीही त्याकाळी रोहिणी नावाचा अंक लग्न- विषयक जाहिरातीसाठी प्रसिद्ध असायचा. वाचनालयामध्ये जाऊन तो अंक चाळायला मला आवडायचे, वधू संबंधी जाहिराती आणि वरा संबंधी जाहिराती वेगवेगळ्या पानांवर असायच्या. कोणत्या वराला कोणती वधू सुटेबल होईल हा जोड्या लावण्याचा खेळ मी अधून-मधून करत असे. हा माझा छंद आजही कायम आहे. आता रोहिणी बंद झाला, टाईम्स मधील किंवा लोकप्रभातील जाहिरातींचा जमाना मागे पडला. भारत म्यात्रीमोनी सारख्या कॉम्पुटर साईद्सवर जोड्या जुळविण्याचा हा खेळ मी अजून ही अधून-मधून खेळते. आमचे एक स्नेही ज्यांचे वधू-वर सूचक मंडळ होते, जे नेहमी गमतीने म्हणायचे एकदा लग्नाच्या बाजारात उतरले की, बाजारात आलेल्या मालापैकी म्हणजे लग्नोत्सुकांपैकी जो बरा असेल तो त्वरित निवडावा यातच शहाणपण आहे. जास्त चिकित्सा केली तर शिळा नाही तर कुजका माल पदरी पडण्याची वेळ आलीच समजा. त्यांचे हे वाक्य म्हणजे उद्या कोणती भाजी करायची या विचाराने वैतागलेल्या गृहिणीने नाक्यावरच्या भाजीवाली कडे जाऊन भजी आणण्या सारखे वाटायचे
पण इतके वर्ष जोड्या जुळवता-जुळवता आणि जुळलेल्या जोड्यांचा अभ्यास करता-करता त्यांच्या बोलण्यातील खरे पणा अनुभवास आला.भाजी मंडई जाऊन मॉल आले तरी बाजाराचे स्वरूप तेच पाकिंग फक्त निराळे.
पूर्वी रोहीणीमध्ये प्रत्येकाची माहिती शंभर शब्दांत येत असे तर आता केवळ दहा शब्दांत येते. उदा. २५, बी.कॉम, यम.बी. ए. गो.सुंदर, ४०,०००/- किंवा २७, यम.बी. बी. यास.प्रक्टिस, ७५,०००/- याच्या वरून कळते की पहिली जाहिरात वधूची व दुसरी वराची.पूर्वी वधूसाठी गृहकृत्य दक्ष, घरकामाची किंवा माणसांची आवड असणारी, एकत्र कुटुंबामध्ये सहज सामावली जाणारी अशी विशेषणे असणारी. तर आता मासिक पगारा बरोबरच गो.सुंदर म्हणजे गोरी व सुंदर अशी उपाधी असते . आता सर्वच मुली गो. सुंदर असतात कोणी सावळ्या, गहूवर्णी अशी नसते. पूर्वी घटस्फोतीतासाठी,विधवांसाठी किंवा पुनःलग्न करू इच्छिणाऱ्या विधुरांसाठी कमी जागा व्यापली जात असे, पण हल्ली मात्र वेगवेगळे स्तंभ असतात. जसे- ती विना आपत्य घटस्फोतीत, फक्त सोबतीची अपेक्षा असलेला असे.
पूर्वी मुलग्यांची उंची, वजन इत्यादी गोष्ठी पण उल्लेखलेल्या असत. आता मुलांचा पोर्ट पोलिओ बनवून अपलोड करण्याची पद्धत रूढ झाली आहे. माझ्या आजी-आजोबांनी एकमेकांना लग्नानंतरच पहिले. आता सासू-सासरे सुना-जावयांना लग्न ठरल्यानंतर पाहतात एवढाच काय तो फरक. आजच्या चाटिंगच्या जमान्यात एकमेकांना न पाहता ही मुला-मुलींचे त्यांचा एकत्रित आयुष्या बद्दलचे प्लान तयार करतात. मग लग्नाचे इवेन्ट झाले याचे आश्चर्य वाटावयास नको. कामामुळे अशाच काही गो.सुंदर तरून-तरुणींना भेटण्याची-बोलण्याची संधी मिळते. एकाच वयाच्या दोघी मैत्रिणींचा लग्नाच्या बाजारातील अनुभव फारच गमतीचा होता. त्यातील स्मार्ट मुलीचे लग्न जुळणे अवघड बनले होते. सुमारे १५ ते २० ठिकाणी दाखविण्याचा कार्यक्रम होऊनही शेवट-शेवट जुळत आलेले लग्न कोणातरी आतोबना नाही तर मामांना मुलांमध्ये खोड आढळल्यामुळे फिस्काठ्त असे. दुसरी मात्र परिस्थितीने आणि दिसायला बेताची असली तरी पण या कालावधीत एका मुलाची आई बनली.मी या गो. सुंदर आईला विचारले ''कसं चाललंय ग''. ती म्हणाली, ''मस्त, माझे सासू-सासरे म्हणजे देव माणसं आहेत. ज्या मुलाने मला होकार दिला त्या पहिल्याच मुलाला मीही पसंत करून टाकले. वडील म्हणत होते, एवढी काही घाई नाही, तुला दोन-चार स्थळ बघायची असतील तरी चालेल , पण मीच सर्वाना ठामपणे सांगितले, याच मुलाशी लग्न ठरवा . जास्त चौकशी नको''. मला आश्चर्य वाटलं मी तिला विचारलं ''असं कसं''. ती म्हणाली ''माझा माझ्यावर विश्वास होता ना; आपण चांगले तर जग चांगले, आणि दुसरे म्हणजे ज्या दिवशी तो बघायला आला होता तेव्हा माझी पुढील अभ्यासासाठी निवड झाली होती, त्याने मला पुढे शिकण्यास परवानगी दिली. माझा आणि त्याचा मिळून पुरेसा पैसा येणार होता आणि काय पाहिजे''? ती पुढे म्हणाली ''तुम्हाला गंमत वाटेल, मैडम, पण माझे सासू-सासरे इतके चांगले आहेत की, लग्नानंतर माझ्या पहिल्या पगाराचा चेक जसाच्या- तसा त्यांच्या हातात दिला त्या नंतर लगेच त्यांनी तो चेक मला परत केला.आणि म्हणाले तुझे वडील निवृत्त आहेत, भाऊ इंजिनियरिंग शिकत आहे, तुज्या लग्नाचा एवढा खर्च झालेला आहे,तेव्हा वडिलांवर खर्चाचा भार असेलच.तुझा भाऊ कमवे पर्यंत तुझा पगार तू वडीलांना देत जा. आपल्याला काही कमी नाही. आज ते माझ्या मुलाला सांभाळतात म्हणूनच मी इथे काम करू शकते . त्यांच्या पायांचे तीर्थ जरी मी प्यायले तरी कमीच''.

तिचे बोलणे ऐकून तिचा स्वतः वरती असलेल्या विश्वासाचा अभिमान वाटला आणि सर्व विवाहोत्सुक मुलींना सांगावेसे वाटते की, आत्मविश्वास बाळगा.
गो. अहेड सगळे सुंदर आहेत. एवरी थिंग इज बिवठीफुल!

गुलमोहर: 
शब्दखुणा: