प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं...

Submitted by मेधा on 4 September, 2008 - 01:46

बर्‍याच वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात प्रेम प्यार मोहोब्बत उल्फत लव्ह अशा शीर्षकाचा लेख वाचला होता. लेखकाचं नाव वगैरे आठवत नाहीये आता. पण सिनेमातल्या, कादंबर्‍यातल्या प्रेम प्रकरणांबद्दल होता तो लेख.

स्त्री पुरूष प्रेमाबद्दल वाचलेला तो पहिला लेख. त्यानंतर बार्बरा कार्टलॅन्ड ची अन तत्सम पुस्तकं अगदी शेकड्याने नाही तरी डझनावारी तरी वाचलीच. सुदैवाने वर्षा-दीड वर्षात त्या पुस्तकांचं प्रेम ओसरलं. आता त्याच पुस्तकांची सुधारित आवृत्ती म्हणावं अशी चिक लिट पुस्तकांची लाट येत असते. त्यातली सुद्धा क्वचितच वाचली जातात. पुष्कळदा त्यावर सिनेमा आल्यावरच ' अरेच्चा, हे पुस्तक पण आलं होतं का अगोदर?' अशी परिस्थिती होते.

पण इतर प्रेमकहाण्या बर्‍याच वाचल्या. लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा पासून थॉर्न बर्ड्स सारख्या प्रेमकहाण्यांची पारायणं केली. ग्रिफिन ऍन्ड सॅबिन ट्रिलॉजी ची अनेकदा वाचली, मित्र मैत्रिणींना ती पुस्तकं दिली. गॉन विथ द विंड, कासा ब्लांका सारखे चित्रपट पाहून झाले. कागज के फूल अन प्यासा सारखे चित्रपट इतक्यांदा पाहिले की कॅसेटच काय तो विडीओ प्लेयर पण झिजून गेला असेल. काव्य, साहित्य, नाटक, सिनेमा सगळ्या सगळ्या रूपांमधून प्रेमकहाण्या भेटत राहिल्या.

हे सगळं पाहताना शाळा, कॉलेज, नोकरी, परत शिक्षण , परत नोकरी वगैरे चालूच होतं. तेंव्हा प्रत्यक्षात कितीतरी प्रकरणं, भानगडी, लफडी, क्रशेस वगैरे पाहिलं, अनुभवलं सुद्धा. काही वर्षांपूर्वी पाडगांवकरांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता वाचली. त्याच कवितेची कोणी कोणी केलेली विडंबनं पण वाचली. अन मग कविता जरी आवडली तरी वाटली की ते काही खरं नाही . प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतंच मुळी.
तर त्याकरता पुरावा म्हणून या प्रेम कहाण्या.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा.. छानच प्रस्तावना शोनू. वाट पाहून आहे..

वा छानच सुरूवात आहे बी.. आता पुढील भाग कधी? Happy
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

शोनू -- असं करू नये ! सुरूवात चांगली करायची आणि लगेच 'क्रमशः' टाकायचे !!
(उद्या पुढचा भाग येईल ह्या आशेवर आहे Happy )

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या प्रेम या कवितेवरून स्फूर्ती घेऊन रचलेली माझी एक 'प्रेम' ही कविता मी तरूणांना वाचून दाखवत असते, येथे केव्हातरी लिहिन म्हणते, बघू केव्हा योग येतो. एखाद्या लग्नप्रसंगी वगैरे.

कुलदीप,
तू चुकून मला प्रतिक्रिया दिलीसं. ती शोनूला द्यायची होती. असो.. होते असे कधी कधी.

उद्या नक्की येणार ना पहिली प्रेम कहाणी?? Happy