मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे २ प्रश्न.
२०१६ मध्ये रनिंग सुरु केलं. ते वर्ष फारच मस्त गेलं. २०१७ मध्ये ट्रेक्स आणि इंज्युरी आणि २०१८ मध्ये इतर काही कारणाने इच्छा असूनही रनिंगला वेळ देता आला नाही. आता एप्रिलपासून पुन्हा सुरु केलय. ह्यावेळी व्यवस्थित स्ट्रेन्थ ट्रेनिंग वगैरे करत आहे.
खूप प्रयत्न करुनही माझा पेस सुधारत नाहीये. फार कमी आहे असही नाही पण अजुन चांगलं करता येइल, तरी जमत नाहीये. काय करता येइल ? (पुन्हा काही दुखापत होईल का अशी एक सुप्त भिती आहेच )
मी ३ दिवस जीम, ३ दिवस रनिंग ( कधी २ दिवस) करते. पण टेम्पो किंवा इंटर्व्हल रनिंगसाठी अजिबात स्टॅमीना टिकत नाहीये. पेस न सुधारण्याचं हेच कारण असेल का ? की जास्त व्यायाम केला जात आहे ?

कोअर मजबूतीचे व्यायाम प्रकार करत असाल तर त्यामुळे नक्की फरक पडू शकेल.
टेम्पो किंवा इंटर्व्हल रनिंगसाठी अजिबात स्टॅमीना टिकत नाहीये. - ह्याकरता श्वासोश्वासावर लक्ष दिले जाते ना ते पहा असे सुचवेन. , म्हणजे आवर्जून दीर्घश्वसन करायचे.

मी म्हणतो ते विचित्र वाटेल पण एलएसडी लाँग 'स्लो' डिस्टन्स रनिन्ग मुळे (काही कालावधीनंतर) आपल्याला ताकद आणि दमसास वाढायला मदत होते. ज्यामुळे पेसही वाढू शकतो. तर सध्या जर का स्टॅमीना टिकत नाहीये तर पेसपेक्षा अंतर वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे.

उंचीनुसार वजन बरोबर आहे का? जास्त असेल तर ते कमी करूनही पेस मधे फरक पडतो.

पेसपेक्षा अंतर वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे.

उंचीनुसार वजन बरोबर आहे का? जास्त असेल तर ते कमी करूनही पेस मधे फरक पडतो. >> अगदी अगदी हे दोन्ही अगदी उपयुक्त सल्ले आहेत. मला स्वतःला फरक जाणवला होता या दोन्ही गोष्टींनी

हर्पेन, धनि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्वासोश्वासावर लक्ष दिले जाते ना << बहुतेक इथेच प्रॉब्लेम आहे. दीर्घश्वसन करुन बघेन.

स्टॅमीना टिकत नाहीये तर पेसपेक्षा अंतर वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे. << लाँग रनिंगसाठी टिकतोय स्टॅमीना. म्हणजे टप्प्या टप्प्याने अंतर वाढवत आहे. ते जमतय. पण पेस सुधारत नाहीये. टेम्पो किंवा इंटर्व्हलसाठी स्टॅमीना टिकत नाही. बहुदा मी सुरुवात फार स्पीडने करतीये, म्हणून नंतर दमायला होतय.
उंचीनुसार वजन थोडं जास्त आहे, ते कमी करायचा प्रयत्न चालू आहे , कठीण जातय. , पण करेन.

हेम आणि हर्पेन अभिनंदन
भरत अहो आपल्या मित्रांच रोज रोज अभिनंदन करायला काय जातय. नाहीतर आपण कोहलीचे उगाच कुठल्या गल्लीतल्या टीम विरूद्ध शतक काढल्यावर सुद्धा नाचतोच की. Happy

पळणार्‍या मंडळींकडून मला एका बाबतीत सल्ला हवाय. मी नेहमी जिमला जातो. खूप स्ट्रेंग्थट्रेनिंग करतो. पण सुरुवातीपासूनच मला व्यायामासाठी पळायचा खूप कंटाळा. तसा मी क्रिकेट खेळताना खूप फिट होतो. उत्कृष्ट फिल्डर आणि रनर होतो. मधे सहा महिन्यांपूर्वी मी ४४ किमी चाललोही.

पण आता थोडे जरी क्रिकेट खेळताना पळले तर गुढगे खूप दुखतात. वजन उंचीच्या मानाने खूप जास्ती आहेच. (बिल्ट चांगली असल्याने मला जाड्या कुणी म्हणत नाही, फार तर पोट सुटलेला पैलवान म्हणतील Happy )पण ते कमी करण्यासाठी व्यायामा बरोबर दिक्षित डायेट करतोच. पण बरोबरच पळण्याचा व्यायाम केला तर जास्त फायदा होईल असे मला वाटले म्हणून कोच टू ५ के टाईप पळणे चालू केले. पण पळले की गुढगे इतके दुखतात की साधा जिना चढायला सुद्धा त्रास होतो. तर

१. पळण्याच्या तयारीसाठी मी पायांचे व इतर कोणते व्यायाम करू.
२. गुढगे न दुखता पळण्याचे अंतर वाढवण्यासाठी काय करू.
३. गुढगे दुखत असल्यास कोणते व्याम करू?
४. अजून इतर काही उपयुक्त सल्ले.

आमचे एक डायरेक्टर (६० व्या वर्षी पळण चालू केल्यावर) सत्तरी पर्यंत मॅरथॉन पळायचे. त्यांचे रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेवलय. Happy

विकीकाका - सरसकट व्यायाम प्रकार म्हणजे गुढग्यांमधे उशी दाबून धरणे दिवसभरात १०-१२ वेळा प्रत्येक वेळी साधारण अर्धा मिनिटभर, पायाच्या बोटांनी वर्तमानपत्राचा कागद चुरगाळणे वगैरे असतात ते करून पहा पण सांगेन की क्रीडा वैद्यकात निष्णात डॉक्टरला दाखवा एकदा. म्हणजे तो तुम्हाला तपासून, गुढगे कुठे-कधी दुखतात वगैरे जाणून घेऊन नीट सल्ला आणि व्यायाम प्रकार सांगेल.

Knee joints strengthen करणारे वेगळे व्यायाम आहेत.
खुर्चीवर बसून उठणे.
खुर्चीशिवाय बसून उठण्याची कृती.
एकच पायरी एकाच पायाने पुन्हा पुन्हा चढणे, उतरणे.
पाठीवर झोपून पाय गुडघ्यात दुमडून ठेवून एकेक पाय सरळ करून पूर्वस्थितीला आणणे.

मी arthritis recovery साठी हे सगळे केलेत.

रनिंग नाही पण एका अल्त्रा वॉकथॉन मधे भाग घेतला होता. ऑक्स्फाम या एन जी ओ तर्फे कर्जत परिसरात हा इव्हेंट असतो . ४ जणांच्या टिम नी १००/५० के अंतर ४८/२४ तासात कापायच असत. सरासरी दहा के वर चेक्पोस्ट असतात. प्रत्येक चेक्पोस्ट वर चौघानी एकत्र चेक इन चेक आउट करायच असत. आपापली सपोर्ट टिम या चेक पोस्ट वर सपोर्ट साठी असते. ( हाय्ड्रेशन रिफिल, औषधे, खाणे, स्पेअर शूज कपडे अन जे लागेल ते)
आमच्या द स्ट्रेन्जएस नावाच्या टिम नी १०० के मधे भाग घेतला अन जरा अपेक्षेबाहेर यश मिळाल , ओवरॉल यादीत सातवे अन मिक्स कॅटॅगरीत पहिले आलो आम्ही. १०० के चालायला २६ तास १ मिनीट ४६ सेकंद लागले. पैकी चालण्याचा वेळ २२ तास ३० मिनीटे . अन इतर वेळ रेस्ट टाइम / खाणे पिणे , चेक्पोस्ट वगिरेला.
आम्हा चौघांपैकी ३ जण पहिलट कर होते. अन आम्ही नावाला जागून स्ट्रेन्जर्स ही होतो . (जेम्तेम ३-४ प्रॅक्टिस वॉक एकत्र केलेले. बाकी आपापले वा एकादोघांनी .) पण आमच्या भारी सपोर्ट टिम नी पदार्पणातच पोडियम वर पोचवल!
अश्या एन्द्युरन्स टेस्ट करणार्‍या उपक्रमात सपोर्ट टिम चा फार मोठा रोल असतो हे पण छानच लक्षात आल

हो. पेपरात बातम्या वाचल्यावर माबोवरल्या धावकुट्या लोकांची आठवण आली होती.
खास तुमच्यासाठी पुण्याचा विसर पडेल अशी थंड, बोचरी, चावरी हवा arrange केलेली आहे.

सिंबानी Tata Mumbai marathon ४ तास ७ मिनिटे ४१ सेकंदांत पूर्ण केली.
७८०३ स्पर्धकांत ११४२ वा, तर ७११३ पुरुष स्पर्धकांत १०८५ वा आणि वयोगटात २२३/१५३२ वा नंबर काढला.
म्हणजे जवळजवळ टॉप सप्तमांशांत नाव नोंदवलं. तेही पहिलीच फुल marathon धावत असताना.
याबद्दल तारसप्तकात अभिनंदन!

सिम्बा, मस्तच!

बाकी कोण कोण पळालं ? >>>
इंद्रा आणि यो-रॉक्स पळाले, हे नक्की माहिती आहे.
आणखीही माबोकर असतीलच.

पुरुषांच्या एलिट प्रकारात इथिओपियाच्या धावपटूंनी मॅरेथॉनमधील विक्रमी वेळ नोंदवत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदके पटकावली. इथिओपियाच्या देरारा हुरिसाने २:०८:०९ अशा विक्रमी वेळेत स्पर्धा पुर्ण केली (कोर्स रेकॉर्ड) त्याचे प्रत्यक्ष स्पर्धेत वापरलेले बूट उधारीवर घेतलेले होते. (सवयीचे नव्हते)

https://sportstar.thehindu.com/athletics/mumbai-marathon-2020-derara-hur...

सिम्बा, इंद्रा आणि यो-रॉक्स अभिनंदन.

मायबोली करांमध्ये हर्पेंन, simbaa, डेव्हील, यो रॉक्स, इंद्रा, मध्यलोक आणि रोमा हे होते
ज्याने नुकतीच 100 अल्ट्रा केली तो हेम यावेळी वॉटर स्टेशन ला स्वयंसेवक म्हणून चिअर करायला होता

Pages