झुकिनीच्या वेलाला फक्त नर फुले का आली?

Submitted by स्वाती२ on 11 March, 2012 - 22:21

गेल्या वर्षी मी लावलेल्या झुकिनीच्या वेलांना फक्त नर फुलेच आली. या पूर्वी असे झाले नव्हते. काय चुकले असावे? मी ५बी झोनमधे आहे. जमिन क्ले आहे पण कंपोस्ट घालून छान वाफा केला होता. आता स्प्रिंगमधे लागवड करताना काय काळजी घ्यावी म्हणजे असे होणार नाही?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, आख्खा समर वाट पाहिली. पण काही उपयोग झाला नाही.
जामोप्या, वाफ्यात ८ वेल होते. सगळ्या वेलांची हिच परिस्थिती होती.

ती बाकीची सूर्यप्रकाश आणि तापमान वगैरे कारणं पटत नाहीत... जेनेटिकच असणार.. सगळी आठही झाडे तशीच आहेत, म्हणजे त्या लॉटमधल्या बिया आता वापरु नका..

मला राहून राहून शंका येत आहे.. झाडंसुद्धा गे असतात का? ही झाडं गे आहेत बहुतेक! Proud

स्वाती कारण माहीत नाही गं पण गेल्या वर्षी माझ्या लाल भोपळ्याला पण अशीच सगळी नर फुले आली होती. Sad ४ झाडं होती माझी पण.

स्वाती , बीया बदलून बघ गं यावर्षी. एका वर्षी सेम प्रॉब्लेम झालेला आमच्याकडे.
तसच नेहमी मेल फ्लॉवर्स अगोदर येतात आणि फिमेल साधारण १५ दिवसानी.
झुकिनी किंवा पोलिनेशन लागणार्‍या इतर वेलींच्या भोवती झेंडुची झाड लाव. फार चांगला उपयोग झाला आमच्या इथे.

याच्...उत्त र्...मिळाल्..तर्..मला.हि सान्गा..