'निरभ्र': लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक प्रसिद्ध झाला

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2012 - 00:52

davandi-finaltex.png

निरभ्र: लिंगनिरपेक्ष मैत्री ओळख परिसंवाद विशेषांक

जरूर वाचा. प्रतिक्रिया द्या आणि आपापले विचारही मांडा.
चर्चा व्हावी म्हणून प्रत्येक लेखाच्या खाली प्रतिक्रियांची सोय आहे.

विषय: 

प्रथमदर्शनी मांडणी (टेम्प्लेट) अतिशय आवडली. अभिनव आहे. सुरेख. Happy
वाचते आता सावकाश.

अरे वा. सुरेखच मांडणी. अभिनंदन संपादक मंडळ.

वाचून झाल्यावर लिहितेच पुन्हा.

संपादक मंडळी आणि सहभागी लेखक-लेखिका सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन!
अशा नाजुक, थोड्याशा गंभीर विषयावर काम केलं म्हणून संपादक मंडळी आम्हाला तुमचा अभिमान वाटतो! Happy

संयोजक टीमचे अभिनंदन! सोपी सुटसुटीत मांडणी आवडली.

शिर्षक आवडलं. खुपच समर्पक! पण निरभ्रतेला कधी कधी शुष्कतेची झाक येते, कधी ती रखरखीत जाणवते. आपलं आपापसातलं मैत्र निरभ्र असावं पण शुष्क आणि रखरखीत नसावं. त्यासाठी प्रयत्नही आपणच करायचे, मी, तुम्ही, आपण सर्वांनीच.

सर्व लेखनकर्त्यांचे, लेख छापुन आले त्यांचे आणि नाही आले त्यांचेही मनापासुन अभिनंदन.

नीधप, अगो, नादखुळा, नानबा, पराग, सानी, स्वाती२: मी अगदी आतूरतेनी वाट बघत होतो ह्या विशेषकांची. तुम्हा सर्वांचे अभिनंदन!

सर्व मायबोलीकरांना एक विनंती की फक्त मुद्रित शोधणाच्या चुका न काढता अंकाकडे सजग वाचक ह्या नजरेतून बघा Happy

मुख्य संपादक : निधप
संपादक मंडळ: अगो, नादखुळा, नानबा, पराग, सानी, स्वाती२
>>
इथे नीधप हवे आहे ना Happy

सर्व मायबोलीकरांना एक विनंती की फक्त मुद्रित शोधणाच्या चुका न काढता अंकाकडे सजग वाचक ह्या नजरेतून बघा

म्हणजे थोडक्यात बघा.... कित्ती चुका आहेत मुद्रीताच्या! पुलं नी सांगितलेल्या सार्वजनिक पुणेरी बोलीचा अत्युत्तम नमुना आहे वरचं वाक्य. Proud Light 1

पुन्हा एकदा सगळे शांतपणे वाचतो

सर्व संबंधितांचे अभिनंदन

शाम यांची कथा विषयाशी बरीच रिलेव्हंट वाटली

अंकाचे नाव 'निरभ्र' फारच आवडलं. मुखपृष्ठही छान आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन आणि आभार.
आता वाचते.

मला प्रथमदर्शनी मुखपृष्ठ आवडले होते. पण काही फोटोंची निवड मला पटली नाही.
या फोटोत मला, पारंपारीक जेंडर बायस दिसतो.
१) एक फोटो स्त्री सारखे दिसण्याचा प्रतत्न करणार्‍या माणसाचा आहे. हा मुद्दा फार
वेगळा आहे. ती मानसिकताही वेगळी.
२) वैमानिक आणि सैनिक स्त्री, असा फोटो का आहे ? हो क्षेत्रे पारंपारीक रित्या
पुरुषी वर्चस्वाची मानली आहेत म्हणून. पण हि परंपरा कधी आणि कुणी निर्माण केली ? झाशीची राणी, ताराबाई च कशाला, पुराणकाळी पण दुर्गा, सिता लढल्याच की.
३) वेट लिफ्टर स्त्री ! कैकयीने खांद्यावर रथ तोलला होता.
४) नर्तक पुरुष. यात तर मुद्राच नटराजाची म्हणजे शिवाची आहे. शिवाच्या सहभागाशिवाय, नृत्य कसे सुरु झाले असते ?
५) कंडक्टर स्त्री. हे क्षेत्र पण पुरुषाचे आहे का ?
६) मुले संभाळणे, जेवण करणे अशी कामे करणारा पुरुष.. या प्रतिमा कधीच कालबाह्य झाल्यात.
तर एकंदर काय, मला या चित्रांतून लिंगनिरपेक्ष मैत्री न दिसता. हे क्षेत्र पुरुषांचे आणि हे बायकांचे, असा मला अमान्य असलेला दृष्टीकोन दिसतोय.
लेख वाचतोच.

चित्रांबाबतः

मला दिनेश यांचा प्रतिसाद वाचल्यावर चित्रे पुन्हा नीट पाहावीशी वाटली व अगदी खरे सांगायचे तर चित्रे मला पटली. मला असे वाटले की स्त्री सर्व क्षेत्रात आहे व काही स्त्रीची म्हणून गणली गेलेली क्षेत्रे आज पुरुषही स्वीकारतात असा संदेश त्या चित्रातून येत आहे व तो लिंगनिरपेक्षतेशी संबंधीत आहे.

असो. त्यावर मते वेगवेगळी असू शकतीलच.

पण एक महत्वाची बाब अशी (जी दिनेशरावही मान्य करतील) की शून्यातून एक मासिक निर्माण झालेले आहे आणि प्रत्येकाने प्रामाणिक लिहिलेले आहे. संपादक मंडळाने मनापासून शंभर टक्के योगदान दिलेले दिसत आहे. Happy

पुनश्च अभिनंदन!

===============================

लेखांबाबतः

स्त्री पुरुष समानता आणि लिंगनिरपेक्षता हे दोन मुद्दे पूर्ण भिन्न आहेत हे संपादक मंडळाला मान्य आहे की नाही असा स्पष्ट प्रश्न विचारावासा वाटला. या दोन पूर्णपणे वेगळ्या मुद्यांची 'अचूक भेसळ' झालेली अनेक उतार्‍यांमध्ये मला तरी आढळली.

जे वाटले ते लिहिले.

-'बेफिकीर'!

संपादकांनी मेहनत घेतलीय याबाबत दुमत नाहीच बेफी.
पण कुठलेही क्षेत्र फक्त स्त्रीचे किंवा फक्त पुरुषाचे असावे, मानले जावे हेच मला मान्य नाही. आणि हा समज फक्त मध्ययुगातच सुरु झाला.
नल दमयंती मधला नल, उत्तम बल्लवाचार्य होता. अर्जून वादक आणि नर्तक होता.
रावण गायक होता. वाल्मिकीं ऋषींनी मुलांचे उत्तम संगोपन केले तसे कण्वमुनींनीही शकुंतलेचे केले. त्यांची त्या कारणांमुळे कधीच हेटाळणी झाली नाही.
म्हणजे मधल्या काळात आपली दॄष्टी बदलली.

छान उपक्रम, छान अंक. मेहनतीसाठी संपादकमंडळाचं कौतुक. Happy

कृपया गैरसमज नसावा, पण संपादकीय वाचल्यावर असं वाटून गेलं की त्यातले काही मुद्दे आधी घोषणेतच दिले गेले असते तर माबोकरांचा (त्यात मी पण आलेच) गोंधळ जरा कमी झाला असता, विषयाची व्याप्ती, लेखांमधून असलेल्या अपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पोचल्या असत्या. पाठवल्या गेलेल्या लेखांची संख्याही त्यामुळे कदाचित वाढली असती.

प्रत्येक लेखाला येणारे प्रतिसाद या पानावर सुद्धा दिसले तर बरं पडेल.
नाहीतर हा बाफ शोधणे अवघड होईल.

<<मला या चित्रांतून लिंगनिरपेक्ष मैत्री न दिसता. हे क्षेत्र पुरुषांचे आणि हे बायकांचे, असा मला अमान्य असलेला दृष्टीकोन दिसतोय>>

परिसंवादाचा विषय लिंगनिरपेक्ष ओळख- मैत्री असा आहे. मुखपृष्ठावरील छायाचित्रे समाजात प्रचलित असलेल्या धारणा दर्शविण्यासाठी असावीत.

मला अंकाची मांडणी उमगली नाही. एकदा एखाद्या लेखात प्रवेश केल्यावर पुन्हा मायबोलीवर/अंकाच्या मुख्यपृष्ठावर वा अंकातील अन्य लेखावर जायची सोय आहे ना?

या लेखांचे आणि संपादकीय, लेखांच्या निमित्ताने वगैरे असे सगळे धागे सुटेसुटेही मायबोलीवर टाकता येतील का?

शिवाय मायबोलीच्या मुख्यपृष्ठावरून क्लिक केल्यावर डायरेक्ट विशेषांकाच्या मुख्यपृष्ठावर जायला हवं होतं. मध्येच हे आणखी एक पान आल्याने प्रतिसाद उगाचच विखरून टाकले जात आहेत. हे पान टाळता येऊ शकलं असतं.

'निरभ्र' नाव आवडलं. Happy
अंक वाचते आता.

नॅव्हिगेशनबद्दल आणि श्रेयनामावलीत आल्याने चटकन दृष्टीस पडणार्‍या अशुद्धलेखनाबद्दल वर इतरांनी लिहिलं आहेच - ते लवकरात लवकर दुरुस्त करालच.

संपादक मंडळातर्फे सर्वांना प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद! Happy

भरत,
एखाद्या लेखावरून अंकाच्या मुपृवर जायचं असेल तर तिथे लिंक आहे. अनुक्रमणिकेवर जायचं असेल तर ब्राऊजरचे बॅक बटण वापरून (किंवा तुमच्या की बोर्डवरचे बॅकस्पेस चे बटण वापरून) जाऊ शकता. मायबोलीच्या मुख्य पानावर जायची सोय नाहीये. ती देता येईल का ह्याचा खुलासा अ‍ॅडमीन करू शकतील.

मामी,
तुमच्या प्रश्नाचं उत्तरही अ‍ॅडमीन देऊ शकतील. पण मायबोलीच्या मुखपृष्ठावरून मात्र अंकाच्या मुखपृष्ठावर डायरेक्ट जाता येतं आहे. तुम्ही परत एकदा तपासून बघता का?

Pages