आयुष्य यातनांना जेव्हा बहाल केले...

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 March, 2012 - 06:44

आयुष्य यातनांना जेव्हा बहाल केले...
जगणे खरेच त्यांनी माझे खुशाल केले

जमले कधी न तेव्हा, ते आजकाल केले...
बंदिस्त मी व्यथांना ह्रदयात काल केले

रिचवीत राहिले मी प्याले तुझ्या स्मॄतींचे...
अवघे भविष्य माझे पुरते जहाल केले

स्वप्नात बांधलेले इमले पडून गेले...
दारूण वास्तवाने तेथे महाल केले

लावून बोल आता लावेल ती कुणाला...
सीतेस राघवाने कोठे सवाल केले ?

मांडून खंत माझी गेलीच मायबोली...
'माझ्याच माणसांनी माझेच हाल केले !'

-------------------------------------------

पाचेक-वर्ष ज्यांच्या खुर्चीस भाव आला...
त्यांच्या समर्थकांनी रस्ते बकाल केले

हाती अशिक्षितांच्या गेलाच देश माझा...
मतदान शिक्षितांनी ना आजकाल केले

-----------------------------------------

-सुप्रिया.

गुलमोहर: 

छान... काही शेर खूप आशय समृध्द आहेत..

काही सुट्या ओळी आवडल्या. उदा. बंदिस्त मी व्यथांना ह्रदयात काल केले

माझ्याच माणसांनी माझेच हाल केले !'
पु.ले.शु

Happy

छान..

मला समजली ..आवडली..

रिचवीत राहिले मी प्याले तुझ्या स्मॄतींचे...
अवघे भविष्य माझे पुरते जहाल केले>>>>खुप मस्त Happy

छान गझल

स्वप्नात बांधलेले इमले पडून गेले...
दारूण वास्तवाने तेथे महाल केले

लावून बोल आता लावेल ती कुणाला...
सीतेस राघवाने कोठे सवाल केले ?

हे आवडले
-------------------------------------------
हा ही मस्त

हाती अशिक्षितांच्या गेलाच देश माझा...
मतदान शिक्षितांनी ना आजकाल केले