डे केअर सेंटर्स

Submitted by नीतु on 26 February, 2012 - 04:34

लिव्ह एन रिलेशनशिप वर तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, अजून एक पर्याय विचार करताना सुचला तो म्हणजे डे केअर सेंटर्स, लहान मुलांसाठी जशी डे केअर सेंटर्स असतात तशी जेष्ठ नागरीकांसाठी काढली तर त्यांचा एकाकीपणा दूर होईल. मला वाटत पुण्यामध्ये अशी सेंटर्स सुरु झाली आहेत.

गुलमोहर: 

नीतु, तुम्ही हे सगळं ललितमध्ये का लिहिता आहात? तुम्हाला जर डिस्कशन अपेक्षीत आहे तर तुम्ही समाज ह्या भागात धागा उघडा. ललित हा साहित्याचा प्रकार आहे आणि असे प्रश्ण साहित्यात येत नाहीत. मदत हवी असेल तर इथे अ‍ॅडमिनना विचारा. अ‍ॅड्मिन ग्रुपने खूप मेहनतीने वर्गिकरण करून ही साईट मेंटेन केली आहे.

आधी रोज एक नवीन डिस्कशन ग्रूप आता रोज नवीन ललीत ह्यामध्ये धागे उघडता आहात म्हणून लिहिलं.

ह्या चर्चेकरता वेगळ्या धाग्याचीही गरज नाही. लिव्ह इनवरच वेगळा उपाय म्हणून चर्चा करता आली असती.

आर्च, सायो + १

नीतू, हा धागा अत्यंत अनावश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी किंवा एकाच प्रश्नाच्या नवीन पैलूसाठी नवीन धागा का काढता आहात? तो ही चुकीच्या सेक्शनमध्ये!

आर्च

मला माहित आहे हे ललित लेखन नाही पण मी नवीन असल्यामुळे अजून शिकत आहे, आणि तुम्ही सगळे आहतच शिकवणारे. लिहिलय त्यावर प्रतिक्रिया दिलीत तर बर होईल.

मला माहित आहे हे ललित लेखन नाही पण मी नवीन असल्यामुळे अजून शिकत आहे, आणि तुम्ही सगळे आहतच शिकवणारे. लिहिलय त्यावर प्रतिक्रिया दिलीत तर बर होईल.
>> नीतु, म्हणूनच सगळे सांगत आहेत ना काय करायला हवे ते Happy योग्य प्रकारे वर्गीकरण केले की माहिती संकलन चांगल्या प्रकारे होते. तसंच कुठलाही धागा उघडण्यापूर्वी आधी तशा प्रकारचा धागा कुणी उघडला आहे का ते ही तपासून पाहा उदा. फिशपाँड, उखाणे ह्यावर आधीच धागे आहेत. तो धागा शोधून त्यावर तुमची प्रतिक्रिया लिहा म्हणजे धागा आपोआप वर येतो आणि चर्चा सुरु राहते.
तुम्हाला धागा शोधता येत नसेल तर एखाद्या गप्पांच्या पानावर किंवा मदतपुस्तिकेत विचारा. उत्तरं मिळतील Happy
तसेच धाग्याला शीर्षक देताना विषय स्पष्ट करणारे द्या. उदा. 'वॄद्धांसाठी डे-केअर सेंटर्स'. तुमची आधीची काही शीर्षकं - 'माहिती हवी आहे', 'आजच्या चर्चेचा विषय' 'आपले विचार कळवा' 'काय करता येईल' अशी संदिग्ध आहेत म्हणून सांगितले.

मायबोली आपल्या सर्वांचीच आहे त्यामुळे तिचे स्वरुप विस्कळीत होत नाही ना ह्याची काळजी आपणच घ्यायला हवी. गैरसमज नसावा Happy

सायोला अनुमोदन.
कृपया कोणाशी तरी बोलायचंय या विभागात असे धागे आपण सुरू करू शकता. तसेच एकाच विषयावरच्या आधी अस्तित्वात असलेल्या धाग्यावर त्या विषयासंदर्भातली चर्चा करावी ही आग्रहाची विनंती.

-मदत_समिती.