आवारगी

Submitted by यशू वर्तोस्की on 25 February, 2012 - 23:22

ये दिल ये पागल दिल मेरा क्यू बुझ गया ...आवारगी !...इस दस्त मै एक शहर था वो क्या हुवा ....आवारगी !
कल जब मुझे बेशक्ल की आवाजने चौका दिया ....मैंने कहा तू कोन हैं ..उसने कहा .....आवारगी !!!!!

गुलाम आली ने ही गझल गायली आणि आवारगी प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनली . आवारगी याची व्याख्या या ठिकाणी उनाडपणा ...म्हणजे राज कपूर च्या भाषेत " आवारा हु " अशी नाही. आवारगी याचा उर्दूतील खरा अर्थ म्हणजे मनाची संभ्रमित अवस्था. आज राज कपूरच्या नातवाचा म्हणजे रणबीर कपूरचा " रॉकस्टार " सिनेमा मी स्वाती आणि आदित्य तिघंच पाहत होतो. रणबीर ने रंगवलेला जॉर्डन बघत असताना कॉलेज च्या दिवसांची आठवण आली. या सिनेमातील मनमौजी ,आपल्याच मस्तीत जगणारा ,सणकी जॉर्डन मनाला कोठे तरी आवडत होता. मनात विचार आला कॉलेज च्या दिवसात हा सिनेमा पाहायला मिळाला असता तर किती वेगळा अनुभव असता.
लग्नाच्या आधी मित्र मंडळींबरोबर आयुष्य जगात असताना एक वेगळीच धुंदी होती . सिनेमा , भटकंती , हॉटेलिंग या सर्व गोष्टी किती वेगळ्या होत्या . पुढे स्वाती आयुष्यात आल्यावर ह्याच गोष्टी वेगळ्या प्रकारे अनुभवायला मिळाल्या . आणि आज इतक्या वर्षांनी स्वतःच्या टीनेज मुलाबरोबर रॉकस्टार पाहताना एक वेगळीच जाणीव झाली. अर्थात खूप मजा येत होती पण गेल्या २०-२५ वर्षात माझी भूमिका किंवा रोल प्ले किती बदलत गेला याचा विचार मनात येत होता . खरच इतकी वर्षे कशी भुरकन उडून गेली. काल २० वर्षाचा असणारा मी आज चाळीशीतला प्रौढ झालो आहे . कसे टीनेज मुलापासून माझे संसारी व्यक्तीपर्यंत रुपांतर झाले. काळ हा सर्वात शेवटी सर्वशक्तिमान आहे हेच खरे .
आज इतक्या वर्षांनी असा कलंदर सिनेमा बघताना हा विचार मनाला सतत अस्वस्थ करीत होता की माझे शाररीक वय वाढले तरी मन कोठेतरी मागेच अडकून पडले आहे की काय ? जेव्हा गरज असते तेव्हा प्रौढपणाचा मुखवटा चढवता येतोच की ! आणि आपण वेळोवेळी तो चढवत देखील असतो. पण मनातल्या मनात एक विचित्रशी कश्मकश सुरु झाली की खरा कोण आहे २० वर्षाचा मुलगा की ४० वर्षाचा गृहस्थ. आणि जरा सिरीयसपणे विचार केल्यावर लक्षात आले की यालाच आवारगी म्हणतात . या विषयी आता काही संदेह उरला नाही की मी दोन्हीही आहे . शरीराचं आणि जबाबदार्यांचे मोठेपण ही अगदी सहजपणे अंगावर चढले आहे , इतके सहज की त्याचे दडपण ही जाणवत नाही आणि मनातल्या मनात खोल कुठेतरी एक २० वर्षाचा टीनेज मुलगा जिवंत आहे. ही जाणीव झाली आणि मन एकदम हलकेफुलके होवून गेले.
पुन्हा नव्याने जीवनाला समोर जायला एक नवीन शक्ती मिळाली ,संजीवनी मिळाली आहे आणि त्या पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे भविष्यातील काळात चाळीशीतून साठीत जायच्या प्रवासा करिता मी अगदी तयार झालो आहे.

यशोधन वर्तक

गुलमोहर: 

आवडला लेख. ललित मधे हलवला तर छानच..

* अवांतर : य्शोधन नंतर टिंब द्यायची गरज नाही. सरळ आपली स्पेस द्या एक. तुम्हालाही सोयीचं होईल ते Happy

छान लिहिलंय. अजून विस्तृत वाचायला आवडलं असतं.

बाकी, चाळीशीतून साठीत जातानाही 'प्रौढत्वी निज शैशवास जपावे' हे विसरता कामा नये Wink

(अवांतर - 'जबाबदार्‍यांचे' हा शब्द jabAbadARyAMche असा लिहावा.)