तिच्या जन्माची भानगड कशी काय संपत नाही

Submitted by कल्पी on 20 February, 2012 - 12:41

काळजाची वेल किती असते नाजूक
वाकून जाते कधी अती झाल्या भाराने

कधी होत जातो काळजाला फ़ोड
कळेना कळीला ,फ़क्त उगवतीचाच सोस

पावलागणिक वारं मध असते प्यालेलं
अधांतरी नभ किती जवळ आलेलं

तिच्या जन्माचा शाप तसा काही कळत नाही
गुरफ़टताना श्वासात धोखा पुढचा दिसत नाही

पावलावर पाऊल पुन्हा टाकलच जातं
जात्यावरचा भरडा ,रडता रडता हसतो

कोवळं कोवळ फ़ुल वा-यावर झुलतं
झुलता झुलता उन्हात थोड थोड करपतं

नाही नाही म्हणता पुन्हा पिंज-यात अडकतं
पेरुची फ़ोड अन दाण्यासाठी तरसतं

ओलावा अन कोरड यांची सांगड होतच नाही
तिच्या जन्माची भानगड कशी काय संपत नाही

कल्पी जोशी

०६/०२/२०१२

गुलमोहर: