महापालिका निवडणूक २०१२

Submitted by आशुचँप on 17 February, 2012 - 06:02

आत्ताच हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीने मुंबईची महापालिका हातात राखण्यात यश मिळवले आहे. पुण्यात राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले तर नाशिकमध्ये मनसेने जोरदार मुसंडी मारली आहे.
मतदानाची टक्केवारी कमी झाल्यामुळे कॉँग्रेसला फायदा होईल असा अंदाज होता. पण तसे झाल्याचे दिसून येत नाहीये.
या २०१२ च्या निकालांविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा...
काय वाटते, मनसेला अजून जागा मिळू शकल्या असत्या का...शिवसेना-भाजपाला सत्तेसाठी मनसेची मदत घ्यावी लागेल असे वाटत होते पण तसे न होता ते थेट सत्तेवर येऊ शकतात. राज ठाकरे यांचा करिष्मा तितका चालला नाही का अजून पक्षाला लोकांनी स्वीकारलेले नाही...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विवन - खूप विचार करण्यासारखा मुद्दा

दरवर्षी सगळीकडे मध्यमवर्गीय मतदारांविषयी लिहून येतं. यावेळी फारएण्डला अनुमोदन. पुण्यातले माझ्या आसपासचे, नातेवाईक इ. मधे जवळजवळ झाडून सगळ्यांनी मतदान केलं. मी जितके वर्षं महाराष्ट्रात होते तितकी वर्षं कायम मतदान केलंय, आणि शेजार्‍यापाजार्‍यांनाही करताना पाहिलंय.

Pages