महापालिका निवडणूक २०१२

Submitted by आशुचँप on 17 February, 2012 - 06:02

आत्ताच हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीने मुंबईची महापालिका हातात राखण्यात यश मिळवले आहे. पुण्यात राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले तर नाशिकमध्ये मनसेने जोरदार मुसंडी मारली आहे.
मतदानाची टक्केवारी कमी झाल्यामुळे कॉँग्रेसला फायदा होईल असा अंदाज होता. पण तसे झाल्याचे दिसून येत नाहीये.
या २०१२ च्या निकालांविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा...
काय वाटते, मनसेला अजून जागा मिळू शकल्या असत्या का...शिवसेना-भाजपाला सत्तेसाठी मनसेची मदत घ्यावी लागेल असे वाटत होते पण तसे न होता ते थेट सत्तेवर येऊ शकतात. राज ठाकरे यांचा करिष्मा तितका चालला नाही का अजून पक्षाला लोकांनी स्वीकारलेले नाही...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज ठाकरेंचा करिष्मा चालला नाही असे म्हणता येणार नाही... कारण गेल्या वेळे पेक्षा बहुतेक प्रत्येक ठिकाणी त्यांनी दुप्पट जागांवर विजय मिळवला आहे.. त्यांच्या मतांची टक्केवारी किती आहे हेही बघावे लागेल?.. दादरला त्यांनी सगळ्या जागा मिळवल्या जो युतीचा बालेकिल्ला मानला जातो...

काँग्रेसची मात्र वाताहात झाली आहे.. त्यांना प्रचंड प्रमाणात आत्मपरिक्षण करावे लागणार आहे. .पुण्यात महापौर, उप महापौर, काही माजी महापौर जोरात आपटले आहेत.. कलमाडींच्या जवळचे पण काही उमेदवार पडले आहेत.

मुंबई आणि ठाणे, नागपूर युतीची सत्ता नक्की.. पिंपवड राष्ट्रवादीकडे.. नाशिक, पुणे... त्रिशंकू.. बेरजा कशा होतात त्यावर ठरणार महापौर कोणाचे ते..

गोपीनाथ मुंडेंनी चांगलीच बाजी मारली. सगळी कडे विजय मिळालाय त्यांना..

दादरला त्यांनी सगळ्या जागा मिळवल्या जो युतीचा बालेकिल्ला मानला जातो...

हो ते आहे...हा सॉलीड दणका आहे. सेनाभवनच्या जवळच्या जागा मनसेने जिंकणे म्हणजे त्यांचेच गेल्या वेळचे वाक्य एकही मारा पर क्या शॉलीट मारा तसे आहे...

पुण्यात पण कॉँग्रेस २० आणि मनसे २२. नाशकात २७.
पण टीव्हीवर ज्या चर्चा सुरु होत्या त्यात सगळे सांगत होते की मनसे तळागाळापर्यंत पोहचण्यात कमी पडले. प्रचार तितक्या ताकदीने झाला नाही. तेही खरे असावे. आमच्या भागात मनसेचा नक्की उमेदवार कोण आहे हेच मला आठवत नव्हते. तरूण मतदारांनी जर पाठ फिरवली नसती तर त्यांना अजून फायदा झाला असता.

चँपा, हे ललितमध्ये टाकलायंस (चुकून)!
अरे नाही...मला तो चालू घडामोडी विभागच सापडेना..म्हणून इथे टाकले...कुणाला सापडला तर कृपया हा धागा तिथे हलवावा

आशु...... आता हे सिध्द झालय की मनसे पक्ष म्हणून कॉलिफाईड आणि लोकांनी स्विकारलेला आहे..... आता खरोखरच बेसिक लेव्हलपर्यंत पोचणारी पार्टी मेकॅनिझम राबवणे गरजेचे आहे मनसेला...... २०१४ पर्यंत आता त्यांना तेच जाळं विणावं लागेल.....

मतदानाचे प्रमाण एवढे कमी का झाले ? त्याचा अभ्यास कुणी केला आहे का ? असेच होत राहिले तर निवडून आलेले लोक, पुरेसे प्रातिनिधीक नाहीत असेच म्हणावे लागेल.

अत्यंत खालच्या पातळीवर उतरुन केलेली टिका, नेत्यांनी उधळलेली मुक्ताफळे, बंडखोरांचे वाढलेले प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या निवडणूकीत झालेला पैशाचा प्रचंड वापर (यावेळी सगळीकडे साधारणपणे एका मतासाठी ६-७ हजार असा रेट सुरु होता आणि हे अनेक ठिकाणी खुल्लमखुल्ला सुरु होते. ) ही काही कारणे असू शकतात. उच्चभ्रु मतदार निवडणूकीपासून लांब राहण्याची. तसेच मतदान याद्यांमध्येही खूप घोळ होता. कित्येकांना इच्छा असूनही नाव न सापडल्याने मतदान करता आले नाही.

मतदानाचे प्रमाण एवढे कमी का झाले? >>

दिनेशदा, पुण्यात मतदार याद्यांमध्ये नेहमीप्रमाणे बरेच घोळ होते असे लोक म्हणत होते. (या खेपेस ऑनलाईन तुमचे नाव देऊन प्रभाग, मतदार वॉर्ड इ. शोधायची सुविधा होती!) अनेकांची नावे त्या मतदार यादीत नसणे, दुसरीकडेच कोठेतरी असणे, किंवा न सापडणे, काही ठिकाणी ती मतदान यंत्रे बंद पडली.... शेवटी लोक कंटाळून घरी गेले असे कानावर आले. 'न' झालेल्या मतदानामागे हीदेखील कारणे असतील.
बाकी या खेपेस माझ्या ओळखीपाळखी-नातेवाईक-शेजारी-कामवाल्या बाया इत्यादी सर्व परिचितांनी झाडून मतदान केले. मतदान केंद्रावर देखील लोक उत्साहाने मतदान करताना दिसत होते.

मतदानाचे अगोदरचे रात्री आमच्या परिसरात बरेच 'वाटप' झाले असे ऐकिवात आले. एक रिक्षावाला काल दुसर्‍याला म्हणत होता, ''आमच्या घरी पोचलं रात्रीच मत!'' पानटपरीवरच्या चर्चेत ७०००, १०००० असे रेट्स ऐकायला मिळाले एका मित्राला. पण या सर्व ऐकीव चर्चा.

एक सहज बातमी म्हणून...

शमिकाची (माझी बायको) आत्येबहीण आशा परमेश मामीडी मनसेतर्फे मुंबई प्रभाग २०९ मधून निवडून आलेली आहे.. Happy

सोलापूर तेव्हढं काँग्रेसकडे...

दिनेशदा कारण भरपूर आहेत.. यादीचे घोळ, लोकांची उदासीनता, दुबार नावे... रहात्या ठिकाणापासून बाहेर असणे...

मनसे नाशिकमध्ये जोरात आहे. सध्याच्या आकड्यानुसार त्यांना सत्ता स्थापन करायला अडचण येणार नाही. तिथल्या अपक्ष उमेदवारांची लॉटरी लागली. आता कॉँग्रेस-राष्ट्रवादी मिळून पैसे ओतून बंडखोरांना विकत घेणार. मनसे आणि भाजप एकत्र येणार का आणि जर यायचे ठरवले तर त्यांच्या मुंबईच्या शिवसेनाबरोबरच्या युतीवर किती फरक पडणार यावर सगळी समीकरणे ठरतील.

तरुण मतदार आणि अशिक्षित समाज यांनी झाडून मतदान केलेय....... नेहमीप्रमाणेच पांढरपेश्या लोकांनी घरी राहूनही मतदान केलेलं नाही......

एक सहज पाहिलेला ट्रेंड आजुबाजुच्या घरातला......

सकाळी विचारलं की दुपारी जेवून जाणार मतदानाला...... दुपारी ३ वाजता विचारलं की हो आता चहा पिऊन जातोच आहे...... आणि ५.३० नंतर विचारलं की, अरे अचानक घरी पाहुणे आले नाहीतर अश्याच सबबी... एकूण काय तर दिवसभर घरी राहून मतदानाला जायचच नाही....... आता या पूर्ण वाढ झालेल्या बैलांना कसं पिटाळणार मतदानाला????? Angry तरीही यावेळी जेवढ्यांना जमले तेवढ्यांना हुसकावून पाठवलं .....

म्हणूनच अगदी १२ आणि २ वाजेपर्यंतचे मतदानाचे आकडे १४% ते २०% होते पुणे मुंबई ठाण्यात....... नंतर ते वाढलं........ Sad

शिवाय बर्‍याच कंपन्यांनी हाफ डे सोडलं त्यामुळे संध्याकाळी मतदान जास्त झालं.

मनसे नाशिकमध्ये जोरात आहे. सध्याच्या आकड्यानुसार त्यांना सत्ता स्थापन करायला अडचण येणार नाही. तिथल्या अपक्ष उमेदवारांची लॉटरी लागली. आता कॉँग्रेस-राष्ट्रवादी मिळून पैसे ओतून बंडखोरांना विकत घेणार. मनसे आणि भाजप एकत्र येणार का आणि जर यायचे ठरवले तर त्यांच्या मुंबईच्या शिवसेनाबरोबरच्या युतीवर किती फरक पडणार यावर सगळी समीकरणे ठरतील.
>>>>>>>>>>>>>>>>>>

ही संधी राजने अजिबात सोडता कामा नये..... जोपर्यंत एखाद्या महानगरपालिकेत केलेले परिवर्तन किंवा बदल त्याला दाखवता येत नाहीत एक "मॉडेल" म्हणून तोपर्यंत इतर ठिकाणी स्पष्ट बहुमताकडे वाटचाल कठीण आहे.... त्यासाठी हा पक्ष अजून वयाने आणि सिस्टीम्सदृष्ट्या लहानच आहे. फक्त एका व्यक्तीचा करिश्मा आता चालणार नाही.... तो कंवर्ट झाला पाहिजे बहुमतात. कल्याण डोंबिवलीला संधी हुकली होती.... आता निदान नाशिकात त्याने एक मॉडेल करून दाखवावं.

ही संधी राजने अजिबात सोडता कामा नये..... जोपर्यंत एखाद्या महानगरपालिकेत केलेले परिवर्तन किंवा बदल त्याला दाखवता येत नाहीत एक "मॉडेल" म्हणून तोपर्यंत इतर ठिकाणी स्पष्ट बहुमताकडे वाटचाल कठीण आहे.... त्यासाठी हा पक्ष अजून वयाने आणि सिस्टीम्सदृष्ट्या लहानच आहे. फक्त एका व्यक्तीचा करिश्मा आता चालणार नाही.... तो कंवर्ट झाला पाहिजे बहुमतात. कल्याण डोंबिवलीला संधी हुकली होती.... आता निदान नाशिकात त्याने एक मॉडेल करून दाखवावं.

भुंग्या प्रचंड अनुमोदन...राजला त्या मानाने बर्याच लवकर अशी संधी मिळाली आहे. ही दवडली तर त्याचा तोटा २०१४ च्या निवडणूकीत बसेल. दोन वर्षात जर बोलल्याप्रमाण मनसेने नाशिकचा कायापालट करून दाखवला तर मग जनतेचाही विश्वास बसेल.

हिम्सकुल - पुण्यात नाही रे...कॉँग्रेस-राष्ट्रवादी मिळून बरीच जागा घेतल्यात. त्यांची आघाडी निवडणूकीपूर्वीच निश्चित झाली आहे. पण कॉँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवून मनसेने बदलाची चुणूक दाखवली आहे.

थोडासा नाही रे स्पष्ट बहुमतासाठी ६२ जागा हव्या आहेत मनसेला. आत्ताच्या आकड्यानुसार ४० जागा त्यांनी पटकावल्यात. भाजप अजूनही ९-१० जागांवर आहे. अपक्ष ८. त्यामुळे अजूनही काही सांगता येणे अवघड आहे.

दिनेशदा - ८-१० हजार ही काय कमी किंमत नाही. घरटी चार जणांचे कुटुंब गृहीत धरले तरी ४० हजार. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतली एक ट्रीप स्पॉन्सर...

दिनेशादा. पांढरपेशांच काय घेऊन बसलात.. इतरांसाठी सुद्धा ती किंमत कमीच आहे... ५ वर्षांसाठी ५००० जास्तीत जास्त १००००... २.७५ ते ५.५ रुपये दर दिवसाला... जर मतदार खरच जागरुक असेल तर हे सुद्धा पैसे न घेण्यात जास्त शहाणपणा आहे..

मी पुण्याचं म्हणत होतो रे..

पुपुवर पण हेच लिहीले होते - माझ्या ओळखीत असे कोणीही नव्हते की जे जाऊ शकत होते, यादीत नाव होते पण तरीही अगम्य कारणाने मतदान केले नाही. याउलट लोक आवर्जून जात होते.

पुण्यात गेल्या १०-१२ वर्षात बर्‍याच मध्यमवर्गीय लोकांनी घरे बदलली. त्यातील बर्‍याच जणांची नावे अजून जुन्याच यादीत आहेत. ते एक कारण असू शकेल.

पण एकूणच ५०% मतदान न केलेले लोक कोण असतील? मध्यमवर्गीय बरेच असले तरी यात मुख्य संख्या त्यांची असण्याची शक्यता कमी वाटते.

सत्तांतर घडवायचे असेल तर ६०%च्या वर मतदान झालेच पाहिजे.

मतदारांमधिल सगळ्यात मोठा (२५%च्या वर) असलेला वर्ग म्हणजे अत्यल्प उप्तन्न गट... या गटावर प्रत्येक पक्षाचा प्रभागा प्रमाणे वचक असतो आणि त्यांच्या जिवावर ते उडत असतात. ही मते सहसा फुटत नाहीत.

२०-२५% मध्यम वर्गीय लोक हक्क आणि सामिजक जाणिवेतून मतदान करतात. पण त्यांच्या मत प्रक्रियेत फार गोंधळ असतो. म्हणजे पक्षाला मत द्यायचे की उमेदवाराला यात त्यांची कुंचबणा झालेली असते.

राहिला प्रश्ण उरलेल्या १०-१५% उच्चभ्रू वर्गाचा... हा ना कधी समाजात सामिल झालाय ना होणार. काचबंद शितल आयुष्य हे यांचे सर्वस्व (काही अपवाद वगळता). खरतर या उच्चभ्रू वर्गाची निर्णय क्षमता चांगली असते पण ती ते मतदानातून न दाखवता केवळ कॉरपोरेट मधेच दाखवतात.

बाकीचे टक्के सरकारी कर्मचारी, बदली, पुर्नवसन, पोलिस, निवडणूक कर्मचारी, यादीतील गलथानपणा, यांत्रिकी बिघाड इत्यादी कारणांनी फुकूट जातात.

Pages