माझिच मि

Submitted by प्रिति_गयक on 14 February, 2012 - 02:20

girl_walking_in_the_hazy_light.jpg

परडी भरली होती फुलांनी
ओसंडून वाहिली होती चारहि दिशांनी
वाहून गेले माझीच मी ...
अश्रू वाहोनि थिजले गाली
विरघळून गेली ती कहाणी
अस्मिता जपली माझीच मी ...
चान्दण झेललं ह्या ओठी
सुख साठवलं ह्या पोटी
ओंजळीत लपली माझीच मी ...
चालत चालत चालले मी
पुन्हा नं मागे पाहिलं मी
ओळखीच्या वळणवर, ना
नदीच्या काठावर, ना
संध्येच्या सूर्य बरोबर
चालत चालली माझीच मी ...

गुलमोहर: 

छान !

वा वा! प्रिती, मायबोली च्या महाकुटुंबात तुझे स्वागत!
खुप छान कविता! तुझी प्रकाशचित्रेही लाव इथे!