मला जपा ! नाहीतर ......

Submitted by रविन्द्र खर्चे on 10 February, 2012 - 01:53

मी मराठी ?आज मी मराठी हे माझे अस्तित्वच मी विसरत चालले आहे. एक काळ आस होता कि निदान महाराष्ट्रात मला खूप मान होता माझ्याशिवाय कोणतेही काम होत नसे, शाळेत मराठी, ज्याच्या त्याच्या तोंडी मराठी भाषा , सरकारी कामात प्रत्येक ठिकाणी माझी गरज असे. हळू हळू महाराष्ट्रात इतर भाषेचे लोक वाढू लागले, त्यानुसार नवनवीन धोरणे आली, नवीन कंपन्या आल्या, प्रदेशातील कंपन्याशी संपर्क साधण्यासाठी इंग्रजी भाषा येणे अनिवार्य ठरू लागले. काही ठराविक लोकांनी इंग्रजी शाळा काढल्या. खेधाची बाब अशी कि आपल्याच मराठी माणसांनी इंग्रेजी शाळा काढण्यास प्रोसहान दिले. इंग्रजी मुळे मोठ्या पगाराच्या नोकर्या मिळत असल्याने बहुतेक जणांचा कल तिकडेच होऊ लागला. परिणामी माझे अस्तित्व धोक्यात आले ! त्याला भरीस भर म्हणून कि काय मुंबईत , महाराष्ट्रात पर प्रन्तियाचे लोंढे वाढू लागल्याने हिंदी भाषेचा माझ्यापेस्खा जास्त वापर वाढू लागला. माझा जीव या सर्वांमुळे घुसमटतो आहे . त्यापेशाही जास्त खंत वाटते ती आपल्याच मराठी माणसानी माझी गळचेपी सुरु केली आहे. आता बहुतेक मराठी पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत पाठवतांना दिसत आहेत. सरकार सुद्धा माझ्या अस्तीवाबद्दल उदासीनच आहे. कोणत्याही प्रकारच्या ठाम उपाययोजना करतांना दिसत नाही , त्याउलट आता मराठी पुस्तकात खूप चुका आढळतात. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे काही औउरच होते. त्यांनी या मराठी समाजाला दर्जेदार मराठी साहित्य दिले. कविता दिल्या, लेख दिले, नाटक दिले, चांगल्या चांगल्या चित्रपटांसाठी पटकथा दिल्या. लहान मुलांसाठी मायेची बडबड गीते दिली. छान छान गोष्टी दिल्या . ते माझे सोनेरी दिवस आठवले कि आपसूकच डोळ्यातून पाणी येते, आणि आपले अस्तित्व आता काही दिवसच आहे याची प्रखरतेने जाणीव होते.
अजूनही वेळ गेलेली NAHI , तुम्ही सर्व माझ्यावर प्रेम करणारे एकत्र आलात, प्रयत्न केलेत तर माझे गेलेले दिवस नक्कीच परत येतील.
अन्यथा , एक दिवस असा येईल कि , मराठी माणूस इतिहास जमा झालेला असेल, माझे अस्तित्वच लोप पावलेले असेल, आणि त्याबरोबर
हे मराठी राज्यही संपलेले असेल, या मराठी राज्यावर दुसर्या कोणातरी भाषेचा अधिकार असेल. आणि मराठी मौंस दुसर्या भाषेचा, त्या भाषेच्या माणसांचा गुलाम झालेला असेल ...........

अधिक विषयावर लेख वाचण्यासाठी माझ्या या ब्लोज्वर जा
ravindrakharche.sosblogs.com

गुलमोहर: 
शब्दखुणा: