करवंटीचा -पेन स्टँड

Submitted by स्मितागद्रे on 5 February, 2012 - 22:26

मागच्या महिन्यात कोकणात गेलो असताना एक जायंट नारळ मिळाला.
त्याची करवंटी देखील टाकवेना लेकीला ही आणि मलाहीl Proud लेकीने त्या पासून बनवलेला पेन स्टँड
तिच्या दृष्टीने तिने थ्रीडी इफेक्ट दिलाय Proud

Photo0152.jpg

गुलमोहर: 

रंगकाम मस्तय.
त्यात स्टँडणार्‍या पेनांसकट फोटो असेल तर टाक ना, म्हणजे नक्की कल्पना येईल. Happy

रंगकाम मस्तय.<<<<<<<+१
आयडियाची कल्पना आवडली. Happy

मस्त झालाय Happy करवंटीचा कँडल स्टँड, आर्टिफिशल फ्लॉवर स्टँड, डबा बनवला होता उरलेल्या लेस, स्टोन्स, रंग लावून. अडगळीत अजून आहे का बघते.

स्मितागद्रे - छान झालाय एकदम!

तरीही फोटोबद्दल एक सुचना - फोटो फ्लॅशशिवाय काढावा. त्यामुळे आपल्या कलेचे सर्व डिटेल्स समजतील. फ्लॅशमुळे बराचसा भाग चमकत आहे.

स्मिते, मस्तच ग स्टँड, Happy

आमच्याकडे असा स्टँड करून ठेवला ना टेबलवर तरी पेनं बिनं त्याच्या आजुबाजूलाच पडून राहतील आणि पसार्‍यावरून आरडाओरडाच जास्त होईल घरात Lol

मस्त Happy

असा पेन स्टँड गोव्याला दुकानात बघितला होता. किंमत विचारल्यावर त्यामधे अजून शंभर पेनं येतील असा विचार केला होता. घरच्याघरी करायला सोपं आहे असं कधी वाटलंच नाही. Happy

स्मिता, लेकीचे अभिनंदन.

मनापासून धन्यवाद लोक्स, आवर्जून प्रतिसाद दिल्या बद्दल.
मला जर माबो वर वाचायच असेल काही तर लेकीला हस्तकला विभाग दाखवल्या शिवाय ती पुढे जाऊ देत नाही मला .
खरतर फार काही सुंदर कलाकृती वगरे बनवता येते अस नाही. तस बघीतल तर कचराच असतो जास्त. पण स्वनिर्मितीचा आनंद, शिवाय आपण बनवलेल्या वस्तु घरात वापरल्या जातात थोडे दिवस का होइना हा एक आनंद.
काही ना काहीतरी नविन बनवत राहिल पाहिजे हा उद्देश असतो. शिवाय टीव्ही बघायचा वेळ ही वाचतो हे जास्त महत्वाच Proud रादर आठवणही होत नाही. त्यापुढे कचर्‍याच आणि पसार्‍याच काही वाटत नाही मग. घरात अर्ध कपाट अशा निरर्थक गोष्टींनी (आपल्या दृष्टीने ,त्यांच्या दृष्टीने तो खजीना ) भरल आहे.
@दिनेशदा हो आधी तिला ती करवंटी गुळगुळीत करुन दिली
@ अतुलनीय थँक्स, पुढच्या वेळेस नक्की काढेन तसा

Pages