डॅन ब्राऊन यांच्या पुस्तकांबद्दल गप्पा

Submitted by किमया देवलसी on 1 February, 2012 - 06:36

हॅरी पॉटरच्या जे. के. रोल्लिन्ग्बाईन्सारखे आणखी एक वेड लावणारे लेखक म्हणजे डेन ब्राउन. यांची सगळीच पुस्तके. विशेषतः "द दा विन्सी कोड " एका वेगळ्याच विश्वात आपल्याला घेउन जातात. पुस्तकात विषयाच्या अनुषंगाने येणारी चित्रांबद्दल, एखाद्या संस्थेबाबत, धर्म , आचार विचार, आजचे तंत्रज्ञान (द डिसेप्शन पौइन्ट) या संदर्भात येणारी माहिती त्या त्या विषयात आपल्याला हळूवारपणे नेउन सोडते. या पुस्तकांबद्दल, या लेखकाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

टीपः या विषयावर आणखी कुठे चर्चा झाली असेल तर जरूर कळवावे मी माझे लिखाण तिथेच हलवेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॅन ब्राउन ची सगळी पुस्तके वाचली आहेत. सद्ध्या इन्फर्नो वाचते आहे. अर्धे वाचून झाले आहे. अजून तरी मजा येते आहे. फ्लोरेन्सचे खूप छान वर्णन आहे!!>>

फ्लोरेन्सच्या वर्णनासाठी हे पुस्तक नक्की वाचेन मी. मी पाहिले आहे फ्लोरेन्स त्यामुळे अजून मजा येईल इन्फर्नो वाचायला. धन्यवाद सुमुक्ता.

डा विन्सी कोडची पन्नास साठ पान वाचून झाले तरी स्टोरी काय ते आजून सुरु होईना.
आपून सिडने शेल्डानचा फॅन. सिडनेचे कोणतेही पुस्तक घ्या, अगदी पहिले पान संपायच्या आत स्टोरी ग्रीप घेते. ईकडे ब्राऊन भाऊच्या पुस्तकाची पन्नास पाने उलटल्यावरही कशाचा काही पत्ता नाही. पुस्तकं सहसा रद्दीत विकत नाही पण याची दोन पुस्तकं रद्दीत विकली.

पुस्तकाची ओपनींग कशी असावी हे फक्त आणि फक्त सलमान रश्दी यालाच कळले आहे. . मिडनाईट्स चिल्ड्रन्सची ओपनींग तर भन्नाट आहे. त्याच्या नंतर नंबर लागतो सिडनेचा. डॅन ब्राऊन ओपनिंग मध्ये पुर्ण नापास

इन्फर्नो मस्त आहे! ते वाचल्याने फ्लोरेन्स ला जायची इच्छा द्विगुणित झाली आहे Wink

हातोडावाला तुम्हाला २०-२० आवडते, आम्हाला टेस्ट मॅच. दोघेही आपल्या परिने बरोबर आहेत. उगीच बोल्ड मध्ये लिहिण्यासारखे काहीच नाही.

काहीतरीच हतोडावाला! सुरवातीलाच लेखक सांगतात की जाक सॉनिए ह्यांचा खून होत आहे आणि आपण आता मरणार हे सॉनिए ह्यांना कळत आहे. ते आपल्याभोवती काही चिन्ह .. काही कोड लिहून ठेवत आहे. ह्यावरुन कथेची पुढची मांडणी काय असेल हे कळते. मला सुरवात आणि शेवटी दोन्ही फार आवडलेले आहेत.

मलापण एंजेल्स अँड डेमॉन्स आणि दा विंसी कोड आवडले.
इन्फर्नो कसेबसे वाचले पण अ आणि अ वाटले.
लास्ट सिंबॉल घरात पडून आहे(असे पहिल्यांदाच झालेय) पण एक दोन चॅप्टर्सच्या पुढे वाचवत नाही.
डिजीटल फोर्टेस आता आठवत नाही वाचून खूप वर्षे झाली.

इन्फर्नो मलापण अजिबात आवडले नाही. फॉर्म्युला तोच तोच वापरल्यानं असेल कदाचित....

हल्ली लोकं शोले आणि वीरानाची तुलनादेखील बिनधास्त करतात.

डेन ब्राउन चे ४ बुक्स - १. द दा विन्सी कोड २. एन्जल्स अँड डेमन्स ३. लास्ट सिम्बॉल ४. इन्फर्नो आमेझॉन वर ९९९/- मधे मिळताहे .. कॉम्बो.. घेऊ का ? कि विश लिस्ट मधे टाकुन ठेऊ ?

पिल्या >.हो पण त्यात मजा नै ना येत .. त्यात मला पुस्तक संग्रही ठेवायची जाम आवड आहे.. म्ह्णून विचारल .

डिसेप्शन पॉईंट, द दा विन्सी कोड, एंजेल्स अँड डेमॉन्स आणि डिजीटल फोर्ट्रेस मस्त आहेत, एकदा हातात घेतली कि खाली ठेववत नाहीत, लॉस्ट सिंबॉल लायब्ररीच्या मॅडमकडे हट्ट करून मागवले, पण वाचताना मात्र खुपच प्रेडिक्टीबल वाटले. इन्फर्नो अजून चालू नाही केलेय
यावर्षी 'लॉस्ट सिंबॉल' मुव्ही रिलीज होणार आहे ना?

Pages