अग्निपथ

Submitted by मंजूडी on 30 January, 2012 - 01:28

सूडकथाच दाखवायची होती तर करण जोहरने सुहास शिरवळकरांची कुठलीही 'दारा साम'ची कथा निवडली असती तरी चित्रपट चांगला झाला असता.

ऋषी कपूर छान. सिनेमातल्या छोटी काली (प्रियंका चोप्रा) आणि शिक्षा (हृतिकची बहिण) खूप गोड आहेत.

प्रियंकाताईंना फारसा वावच नाहीये. एकच मुख्य गाणं होतं तेही कापलं गेलंय.

क्लायमॅक्समध्ये करण जोहरने 'असली हिरो ऐसा होता है'चा एकही सीन हृतिकला न देऊन त्याच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे.

श्रद्धा आणि फारएन्ड यांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे, त्यांचे खास रीव्ह्यू येतीलच Wink
तोवर आपण इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चि क वा वरच्या या काही पोस्टी :

दीपांजली | 29 January, 2012 - 13:27
'अग्निपथ' चा सेपरेट धागा कस अनाही अजुन ??
खूप चांगले रिव्ह्युज ऐकतेय....

udayone | 29 January, 2012 - 22:13
ंअग्निपथ पाहीला....जुना चित्रपट डोक्यात घेउन जाऊ नका....
..

छान आहे....सिंगल स्क्रिन मधे बघायला मजा येते....

अंजली_१२ | 29 January, 2012 - 22:19
अग्निपथ पाहिला छान आहे. ह्र्तिक रॉक्स. संजय दत्त्त महाभयानक दिसतोय. प्रियांका चोप्राला काहीच काम नाही दिलंय. ॠषी कपूर एकदम हट्के रोल मधे आहे.

महागुरु | 29 January, 2012 - 22:27
मला काही जणांनी खुप काही चांगला नाही असे रिव्ह्यु दिले. एकाने फे.बु. वर टाकलेला रिव्ह्यु:
"बीच मे निंद आये तो, सोना मत सोना मत ...अग्निपथ अग्निपथ'

udayone | 29 January, 2012 - 23:05
स्वतं्त्र धागा काढण्या सारखा आहे..
जुन्या रस्त्या वरून नविन गाडी चालवण्यात आली आहे.. ह्रूषी कपुर ओल्ड ईज गोल्ड...

रितीक ने कुवत ओळखुन काम केले..
बच्चन च्या चित्रपटाची तुलना चुकीची आहे.
एक स्वच्छ दुसरा गलिच्छ..आहे...बच्चन स्वत: च राहणीमान उंचावतो...रितीक झोपडपट्टीतच राहतो..त्याची बहीन जी दाखवली आहे ती फारच गोड आहे...करीना सारखी दिसते.. ..

साजिरा | 30 January, 2012 - 00:45
vaait cinema aahe. agnipath aivaji paanipat naav thevale asate tar kiman pahila agnipath dokyat theun baghitla nasta.
krutrim roshan ne tyala karta yeil tevdhe keley. priyanka aani sanjay datt baddal bolavat nahi.
matra rushi kapoor che paatra interval paryant bhari aahe. tyanantar tehi gandaley.

श्री | 30 January, 2012 - 02:54
अग्निपथ एकदम भंकस .
ऋषीकपुर खुराड्यातुन कोंबडी ओढुन काढावी तशी मुलगी ओढुन काढतो .
भंकस ..........

इंद्रधनुष्य | 30 January, 2012 - 10:25
agnipath aivaji paanipat >>> Lol

शुभांगी हेमंत | 30 January, 2012 - 10:33
साजिर्‍या, पानिपत Lol

दक्षिणा | 30 January, 2012 - 11:34
कृत्रिम रोशन >> Lol Rofl

मी_चिऊ,
सगळ्यांच्या पोस्टी मी कॉपी पेस्ट केल्या ती पोस्ट १२:०२ ची आहे. चि क वा वर तुमची पोस्ट त्यानंतर म्हणजेच १२:१९ ला पडली आहे.

मुव्ही खरेच ओके टोके टाईप्स! विशेष नाही फार!!
छोटी काली आणि शिक्षा खूप गोड आहेत.>> मंजूडी +१

चित्रपटाचा शेवट, ब क वा स.....

माझ्या मित्रानी सांगितले कि 'नको बघुस ... मला पैसे दे तुला जास्र झाले असले तर ... ' ... <<डोळे फिरवणारी बाहुली >>

ह्रुतिक 'स्वतःला लै भारी समजून' काम करतो . . असे अजून एकाने सांगितले.

ती हरिवंशराय यांची कविताच फक्त तेवढं बलस्थान आहे. नुसती ऐकायला जास्त बरी वाटेल. त्यातल्या त्यात ऋतिक एकदाच (एका साईड व्हिलनाच्या पोटात चाकू खुपसताना) 'विजय दीनानाथ चौहान- पूरा नाम. गाव- मांडवा.' म्हणतो तेव्हा त्यातल्या त्यात अपील होतो. (पण ते लिहायचं 'चव्हान' आणि बोलायचं 'चौहान' हे पण एक अजबच). बाकी सारा आनंद. सिनेमा बघताना चार वेळा असह्य होऊन बाहेर आलो, असं खूप दिवसांनी झालं. ते चायनीज पार्लर तर काहीच्या काही आहे. पण ते नसते तर तिने बिचारीने काय केले असते? तर आणखीच काहीच्या काही करण्यापेक्षा चायनीज पार्लर बरे. ऋषीकपूरने मात्र विश्वास बसणार नाही, असा तो 'लाला'चं पात्र रंगवलं आहे. एकच नंबर. पण मध्यंतरानंतर तेही सावकाश गंडतंच.

'विजय चौहान'ला अमिताभने फारच लार्जर दॅन लाईफ करून ठेवलं आहे. त्यामुळे 'हा' बघताना 'तो' मनातून जाणं अशक्य. ऋतिकचा विजय चौहान मला जरा दुबळा केविलवाणाच वाटला. पूर्ण 'तीन तास' लांबीच्या सिनेमात हे सारं सहन करायचं!

कृत्रिमपणाचे आरोप अमिताभच्या विजय चौहानवरही झालेच होते. (बदललेला / खर्जातला आवाज, सुरमा, अनावश्यक बॉडी लँग्वेज इ.). पण खटकेबाज संवाद आणि अमिताभची एकंदरच इमेज यामुळे त्यात जान आली होती, असं मला वाटतं. (आणि शिवाय त्यात डॅनी होता!)

शेवटच्या सीन च्या वेळचा मला जाणवलेला गूफ अपः

१) चित्रपटाच्या शेवटी फायटींगच्या एका दृश्यात संजय दत्त हृतिकच्या पोटात पुढुन सुरा खुपसतो असा शॉट आहे. शेवटी त्या तथाकथित झाडापाशी आल्यानंतर हृतिकचा शर्ट पार कामातून (म्हणजे चिंध्या वगैरे होऊन) जातो. तेव्हा हृतिकच्या पोटावर त्या खुपसण्याचे नामोनिशानही दिसत नाही. Uhoh

२) संजय दत्त ला हृतिक फासावर लटकवतो तेव्हा तो संजय दत्त चे हात बांधत नाही. तरीही संजय दत्त स्वतःच्या सुटकेचे प्रयत्न (हाताने फास सैल करणे इ.) करताना दिसत नाही. कमाल आहे. हीरो च्या हातून मरण येऊन पुण्य मिळू घातलंय तर स्वतःच्या हाताने अवलक्षण का ओढवून घ्या असा विचार त्याच्या मनात आला असण्याची शक्यता आहे. Wink

मध्यंतरापर्यंत सिनेमा आवडला. नंतर साफ गंडलाय. शेवट तर अगदीच सुमार.

प्रियांका चोप्राला ची नाकाची सर्जरी क्लोज-अप शॉट्स मध्ये अगदीच दिसून येतेय. साईड अँगलच्या क्लोज-अप शॉट्स मध्ये भयाण दिसलीये.

१) चित्रपटाच्या शेवटी फायटींगच्या एका दृश्यात संजय दत्त हृतिकच्या पोटात पुढुन सुरा खुपसतो असा शॉट आहे. शेवटी त्या तथाकथित झाडापाशी आल्यानंतर हृतिकचा शर्ट पार कामातून (म्हणजे चिंध्या वगैरे होऊन) जातो. तेव्हा हृतिकच्या पोटावर त्या खुपसण्याचे नामोनिशानही दिसत नाही. >>> + १

निंबुडा +१

१> आणि शेवटी तो दिनानाथ चौहान चालात जतो तेव्हा त्या उतारा वर पुश्ठे टाकलेले आहेत वाटते कारण ते थोडे खाली झाले
२>दिनानाथ चौहान ला पुरताना पण खुप लांब कोणी तरी लपुन जाताना मी पाहीले [म्हणजे तिथे कोणीच नसते फक्त हा विजय आणि त्याची आई ]

मी_चिऊ,
सगळ्यांच्या पोस्टी मी कॉपी पेस्ट केल्या ती पोस्ट १२:०२ ची आहे. चि क वा वर तुमची पोस्ट त्यानंतर म्हणजेच १२:१९ ला पडली आहे.>> माफ करा मंजुडी, हे माझ्या लक्शातच नाही आलं.

आयला पब्लिकनी डायरेक्ट पोस्टमार्टेमच चालू केला की.. हे असले गूप अप्स.. IMDB मध्ये द्या... तिकडे येतीलच हळू हळू.. पण तुम्ही टाकलेत तर तुम्हाला क्रेडीट मिळेल ते शोधल्याचे..

श्री गणेशा देवा गाणं आवडलं. अजय अतुलचं मराठमोळं संगीत छान वाटलं पण थिएटर मधे इतक्या जोरात आवाज होता (ओव्हरऑल पिक्चरसाठीच) की कानावर हात ठेवावे लागले.

चिकनी चमेली बद्द्ल कोणी बोलणार नाही का Proud
संजय दत्त ने शेवटी फारच बुकललाय ब्वॉ हृतिकला Sad

krutrim roshan ne tyala karta yeil tevdhe keley. >>>> अरे अरे अरे.. एका पिक्चरने क्या से क्या हो गया !! साजिर्‍याने जिंनामिदो बाफवर तो बोटीतला टडोपा सिन करायला हृतिकच्च्च हवा वगैरे पोस्टी टाकल्या होत्या... आणि आता डायरेक्ट कृत्रिम रोशन? Proud

साजिर्‍याने जिंनामिदो बाफवर तो बोटीतला टडोपा सिन करायला हृतिकच्च्च हवा वगैरे पोस्टी टाकल्या होत्या... >>> जिंनामिदोच्या बाफवर मला अजूनही "पोहायला येत नसलेला, स्कुबा डायविंग मधल्या एन्लायटनिंग शांततेनंतरचा ऋतिक." एवढंच दिसतं आहे. आणि तो शॉट त्याने खरंच भारी केला होता. त्याच बाफवर माझी आणखी एखादी पोस्ट असली, तर ती याचबद्दल असेल. बिचार्‍याने काही मिनिटांसाठी चांगलं काम केलं तर नावाजायला नको? Proud

आता ऋतिकबद्दल मी आणखी काय लिहिलं होतं, ते बघ.

१) ऑफ बीट सिनेम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयदेओलने या कमर्शियल सिनेम्यातही मस्त कमाल केली आहे. मी गेलो होतो फक्त त्याच्यासाठी (आणि सिनेमा संपल्यावर सर्वात जास्त लक्षात राहिलाही तोच), पण कंप्लीट पॅकेज वॉज अ स्वीट रिफ्रेशमेंट. ऋतिकच्या चाहत्यांनाही मेजवानी. मस्त दिसतो आणि वावरतो.

२) पण तरी 'तो अंमळ हृतिकच वाटत राहतो..' हे लक्षात घ्या. अभय देओलसमोर.

३) अभयची अभिनयातली सहजता इतर दोघांना थोडी कमीच जमली आहे; म्हणून हा सिनेमा जास्त 'अभय'चा आणि एकंदर 'पात्रां'चा विचार केला तरी कबीरचा सिनेमा आहे, असं वाटलं.।

आता ऋतिकच्या चाहत्यांचा विचार करून एवढं तरी लिहिलं आहे. नाहीतर.. Proud

(हा माणूस शरीराच्या इतर सार्‍या स्नायूंसारखं चेहेर्‍यावरच्याही स्नायूंनाही का सतत कामाला लावतो? सहजसाधं सोपंसरळ राहता येत नाही त्याला?)

पांढरा शर्ट-पांढरी ट्राउझर, त्यावर पांढरा ब्लेझर अशा 'सिग्नेचर' स्टाइल सुट मधे "तो " कमिशनर गायतोंडे च्या ऑफिसात येतो.., आपल्या सिग्नेचर 'स्टाइल' मधे लांब पाय पसरत खुर्चीत बसतो आणि त्याच्या फेमस आवाजाला वेगळी शेड देऊन करड्या आवाजात नाव सांगतो
"विजय, विजय दिनानाथ चौहान, पूरा नाम !
बाप का नाम ' मास्टर दिनानाथ चौहान', मां का नाम सुहासिनी चौहान, गांव , मांडवा !!
उमर ३६ साल ९ महिना ८ दिन, ये सोलवा घंटा चालु है .
........................................

ये दुनिया बहुत बिगडे हुई है गायतोंडे सहब, जो सुधर गया, वो गया... उप्पर
इस दुनिया मे तरक्की करनेके लिये 'ना' बोलना बहुत जरुरी है कमिशनर !
.........................................................................

वेळेचा काटेखोर विजय आपल्या खिशात एक डायरी घेऊन फिरतो, गायतोंडेला एक पान उघडत सांगतो
'आज शाम ६ बजे आपुनका मौत के साथ अपिंटमेन्ट है'
' आपिंटमेंट, इंग्लिश बोलता है' !!
.................................................................................................

विजय कांचा च्या साम्राज्यात त्याला भेटायला येतो..
"वक्त पे पहुंचना आपना पुराना आदत है, आज थोडा देर होगया इस लिये माफी चाहता है !
बचपन मे मै तुम्हारा गाडी साफ करता था, कपडा के साथ..
कांचा: "और अब मेरे कापडे पहनना चाहता है?"
विजयः नही, पहनाना चाहता है,इसको, सर्दी लग जायेगा ( असं म्हणत विजय कांचाच्या बाजुला उभ्या असलेल्या स्विम सुट मधल्या फटाकडीला आपला पांढरा ब्लेझर घालतो.)
.....................................................................................................................
कांचाचं साम्राज्य संपवून शेवटचे श्वास घेताना जखमी विजय आईच्या मांडीवर येऊन पडतो
" तेरे हाथ का रोटी अच्छा लगता है मां, ये देखो हाथ, धो दिया मै, मै बुरा आदमी नही है मां"
...................................................................................................................................................

हे आणि असे अनेक दमदार डॉयलॉग्ज, फिल्म इंडस्ट्रीचा एकमेव 'विजय' , आय मीन फक्त आमिताभच हे साकारु शकतो आणि तो दमदार आवाज .. जो 'अग्निपथ' चा आत्मा आहे.. तेच सगळच मुळात मिसिंग आहे 'करण जोहर च्या' अग्निपथ मधे :).
तसं पाहिलं तर जुना -नवा दोन्ही अग्निपथ च्या कथेत काही दम नाहीये, तिच ती अतिभडक सूडकथा, हिंसा, हिरोच्या आई बहिणीला पळवून नेणारा व्हिलन आणि शेवटी वडिलांच्या मृत्यु चा सूड घेणारा विजय .. टिप्पिकल मसाला भट्टी !
पण बच्चन ने ज्या प्रकारे तो साकारलाय, असल्या टिंपाट कथानकाला इग्नोअर मारून पहात्/ऐकsssत रहावा..

तर नव्या अग्निपथ विषयी, हिर्थिक ची फॅन्/पंखा/ए ,सी वगैरे आहे ,.. त्याचे हिरवे-निळे डोळे, परफेक्ट बिल्ट, अ‍ॅक्शन-डान्स सगळं फ्लॉलेस ..पण ................. 'विजय दिनानाथ चौहान' ला या सगळ्याची खरच गरज नाही.. त्याला फक्त ' ए +++++' स्क्रीन प्रेझेन्स ची गरज होती जी ह्रिथिक प्रयत्न करतो पण बच्च्न डोळ्या समोर येतो आणि सगळं मिसिंग वाटत :(... त्या कांचा कडून कित्ती मार खातो ह्रितिक :(.
ह्रितिक 'विजय' च्या दोन व्हर्जन्स ची तुलना करु नका म्हणतो पण बच्चन चे ते कॅरॅक्टर कसं विसरणार.. ती फेमस 'अग्निपथ' कविता बच्च्न शिवाय कोणाच्या आवाजात सॉरी पण नाहीच अपिल होत !
असो, नव्या अग्निपथ चा प्रयत्न वाइट नाहीये, काही जमेच्या बाजुही आहेत.. 'अजय अतुल' चं अफाट म्युझिक (आणि बॅकग्राउंड स्कोअर), मराठी वातावरण, अर्चना पूरण सिंग च्या टिंपाट 'अलीबाबा' डान्स नंबर ऐवजी कट्रिनाची तुफ्फान 'चमेली' , 'माधवी' ऐवजी प्रियांका चोप्रा, मतिमंद देवेन भोजानी , टेक्निकली जास्त चकाचक , आणि द बेस्ट 'ऋषी कपुर' या नव्या अग्निपथ च्या जमेच्या बाजु !!!
ऋषी कपुर चं स्क्रीन प्रेझेन्स अफाsssट आहे, तो फ्रेम मधे असताना इतर कुणाकडेही लक्ष जाउ नये इतकं.. .. त्याचा तो गेट अप, निगेटिव रोल जबरदस्तं केलाय ऋषी कपुर नी.
ओरिजनल अग्निपथ मधे कोणी केलाय हा रोल, आठवत नाहीये..
संजय दत्त (कांच चिना)- ओम पुरी (गायतोंडे) ऐवजी ओरिजनल मुव्ही मधले 'डॅनी' -विक्रम गोखले अजुनही चालून गेले असते... संजय दत्त कसला धुड दिसतो.. ओम पुरीच्या अभिनया बद्दल वाद नाही पण 'गायतोंडे' म्हणून विक्रम गोखलेच जास्त शोभतो :).
मिथुन च्या क्रिष्णन अय्यर यम .ये कॅरॅक्टर इथे नाहीये,ओरिजनल अग्निपथ ची बहिण 'नीलम' मोठी दाखवलीये, यात छोटीच दाखवलीये.. ते एक बरं केलं.
प्रियांका चोप्रानी बरा केलाय रोल , तिला घेण्याचं कारण म्हणाजे 'कमीने' मधे झालेलं तिच मराठी ट्रेनिंग असणार :फिदी:, बरी बोलते ती मराठी.
ओरिजनल अग्निपथ च्या लहान पणाच्या विजय चा रोल मंजुनाथ (मालगुडी डेज चा स्वामी)नी अतिशय अप्रतिम केलाय , इथला बाल कलाकार त्या मानाने कच्चाच आहे अभिनयात.. मास्तर म्हणून जो आहे तो ही टिपिकल 'मास्तर' नाही वाटत.. तिथे ओरिजनल अग्निपथ चा 'अलोक नाथ' च फिट्ट होता.
असो.. एकदा बघायला ओक्के आहे पण जर ओरिजनल पाहिला असेल तर अमिताभ आठवणार नाही असं होणच शक्य नाही..लहान पोरांना घेऊन मुळीच जाउ नका, हिंसा बघताना आपल्यालाच नको होतं, खूप लाउड झालीयेत हिंसक दृश्यं !
माझ्या कडून अडीच स्टार्स.

लहान पोरांना घेऊन मुळीच जाउ नका, हिंसा बघताना आपल्यालाच नको होतं, खूप लाउड झालीयेत हिंसक दृश्यं !>> +१००
आमच्या बाजूची लहान मुले बिचारी कानावर हात ठेवून खुर्ची मध्ये लपत होती ..तेव्हा पोरांना नेवू नकाच !
शेवटी पोटात खंजीर खुपसतो तरी रितिक मध्ये एव्हडा जोर कसा येतो कुणास ठावूक ?
कारण जोहर चा सिनेमा नाही का ! Happy

सूडकथाच दाखवायची होती तर करण जोहरने सुहास शिरवळकरांची कुठलीही 'दारा साम'ची कथा निवडली असती तरी चित्रपट चांगला झाला असता.>>>>>

दुर्दैवाने हल्ली प्रथितयश निर्माते अशा सल्ल्यांकडे दुर्लक्ष करतात. यावर एक धागा असायला हवा.

ऋषी कपूर छान. सिनेमातल्या छोटी काली (प्रियंका चोप्रा) आणि शिक्षा (हृतिकची बहिण) खूप गोड आहेत.>>>>>

प्रियांका गोड आहे हे विधान थोडे कालबाह्य वाटते.

प्रियंकाताईंना फारसा वावच नाहीये. एकच मुख्य गाणं होतं तेही कापलं गेलंय.>>>

अरेअरे. कशाकशाचं वाईट वाटतं.

क्लायमॅक्समध्ये करण जोहरने 'असली हिरो ऐसा होता है'चा एकही सीन हृतिकला न देऊन त्याच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे.

श्रद्धा आणि फारएन्ड यांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे, त्यांचे खास रीव्ह्यू येतीलच
तोवर आपण इथे लिहूया.>>>>>

माझ्यामते चित्रपट सुमार आहे.

-'बेफिकीर'!

शेवटी फारच बुकललाय ब्वॉ हृतिकला >>>>>>>> Happy खरे आहे
एवढा मार खाउन पण ठोम्ब्याला सरपट्ता येतै म्हटलं तर कस होनार, त्यावर त्या १२०किलोच्या संजय दत्ताला दोरिवर लटकवने म्हन्जे वा...
[व्हराड निघालय लंडनला मध्यल्या बप्पाच्या[काय माय काय पोट्टे] टोन मधे,..................काय र्हितीक काय संजय... अवघडे

दीपांजली, बेष्ट रिव्ह्यू!

चित्रपट पहिला अर्धा तास आणि शेवटची पंधरा मिनिटं सोडून आवडला.
नको तिथे गाणी घुसडून आणि शेवट हिरोला "तू भारी तर मी लै भारी" असा प्रकार करून करण जोहरनं बोल्ड फाँट मध्ये ७२ साईझ मध्ये आपलं नाव प्रिंट केलंय शेवटच्या सीनवर! कांचा विजय चौहानच्या पोटात, पाठीत, छातीवर असा ५ एक वेळा तरी सुरा खुपसतो आणि तरी विजय "लै भारी" चौहान त्याच्या पाठीत एक दगड घालून त्याला ढेर करतो नि वर ते एवढं धूड उचलून झाडावर लटकवतो! हा हा हा! अरे काय गंमत आहे काय?! तेवढा सीन वगळून इट वॉज ओके, टिपिकल बॉलिवूड मसाला! Happy

आणि चित्रपटाचे सगळ्यात वीकेस्ट पॉईंट्स म्हणजे
१. विजय चौहान शेवटी आईला "मां, ले. दे दिया तुझे तेरा मांडवा" हा ड्वायलॉक मारत नाही.
२. आणि यात "अम्मे कृष्णन अय्यर येम्म्म्म्ये" हे पात्रच नाहीये! बिग टाईम फेल्युअर! 'अग्निपथ' म्हटल्यावर विजय चौहान सोबत क्रिष्णन्नैय्यर्येम्म्ये पाहिजेच!
३. दमदार डायलॉग्ज हेच अग्निपथचा आत्मा आहेत आणि तेच 'दिलबुरा जोहर अंकल'च्या या सिनेमात खंप्लीटली मिसिंग आहेत! त्यातल्या त्यात हृतिक यात 'सूर्या'च्या पोटात सुरा खुपसताना 'तो' पेटंट ड्वायलॉक टाकतो ते बरं जमलंय. पण दॅट्स ऑल अबाऊट इट.

प्रियंका चोप्रा आवडली मला फॉर अ चेंज! ऋषी कपूर अफाटच! खरंच तो असताना अगदी हृतिककडेही लक्ष जात नाही काही सीन्स मध्ये! संजय दत्तचा कांचा चीनाही आवडला. हृतिक हिज युजुअल बेस्ट. पण राहून राहून मिथुनचं पात्र वगळून टाकल्याची चुटपूट लागून राहिली. आणि क्लायमॅक्सची तर अगदीच "दुरगंधी" करून टाकलीये.

कुणाचं या पिक्चरच्या सेट्सवरती लक्ष गेलं नाही का? कसले भंगार ८०च्या दशकातले नकली सेट उभारलेत. बरं बजेट नाही हा यांचा प्रॉब्लेम नाही. त्या संजय दत्तला टकला बनवायला लाखो रूपये खर्च केलेत मग सेट इतके दरिद्री का?

ऋषी कपूर द बेष्ट. माझा अत्यंत आवडता अभिनेता. आणि अजूनपण काय काम करतो... त्याच्यासाठी पिक्चर एकदातरी बघायला हवा. (जुन्या पिक्चरमधे हे पात्र नव्हते ना?)

मिथुनचे कॅरेक्टर ठेवलं असतं तर कुणी केलं असतं? धनुष (कोलावेरी डी फेम) चालला असता किंवा मग अतिआचरटपणा करायचा असेल तर सोहेल खान. Happy

ह्रितिक बेस्ट आहे आहे आणी आहे. Happy

मला ऋषी कपूर आणि संजय दत्त सगळ्यात जास्त लक्षात राहिले. ऋतिक दिसतो सहीच पण ह्या दोघांच्या पुढे अगदीच केविलवाणा वाटतो. ह्याचा त्या कांचा समोर कसा निभाव लागणार आणि हा बदला कसा घेणार अशी सतत भिती वाटत राहते Happy

संजय दत्त कसला ओंगळवाणा आणि हिडिस दाखवलाय.

डॅनी आणि विक्रम गोखले खरंच अजूनही चालले असते.

अजिबात आवडला नाही सिनेमा. फारच हिंसक केलाय. काही प्रसंग सूचक दाखवता आले असते. उदा. दीनानाथ चौहानचा मृत्यू, कांचाचा विजय चौहानवरचा अत्याचार.. बाकी ऋषी कपूरने रौफ लालाच्या व्यक्तिरेखेला न्याय दिलाय.

Pages