"जन गण मन" प्रिमिअर - मुंबई

Submitted by भुंगा on 26 January, 2012 - 06:41

"जन गण मन" या चित्रपटाच्या मुंबई प्रिमिअरला जायचा योग अ‍ॅडमिन कृपेने आला आणि मी, देवकाका, शर्मिला फडके, अनिताताई आणि ईंद्रधनुष्य असे ५ मायबोलीकर ईंफिनिटी मॉलला या निमित्ताने भेटलो.
मी, अनिताताई, देवकाका आणि शर्मिलाजी अगदी ६.१५ पासूनच तिथे हजर होतो... मालगुडी डेजमध्ये चहा कॉफी घेऊन अगदी ७.३० पर्यंत वाट पाहिली तरी कार्यक्रम सुरू व्हायचा पत्ताच नाही. नाही म्हणायला काही तुरळक मराठमोळे चेहरे हळूहळू जमत होते. ईंद्रा प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकला होता.

तोपर्यंत अचानक अमित अभ्यंकर (चित्रपटाचा दिग्दर्शक) आणि नंदू माधव (रामचंद्र सोनटक्के) हजर झाले. ते येताच देवकाकांनी सरळ त्यांच्याकडे मोर्चा वळवला. आम्ही मायबोलीकर आहोत म्हटल्यावर लगेच अमितने आमचे स्वागत केले. नंदू माधव यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही झाल्याच. अगदी दिलखुलास व्यकित्मत्व. औरंगाबादपासूनचा त्यांचा इथपर्यंतचा प्रवास त्यांनी थोडक्यात सांगितला. देवकाकांनी मोजक्या प्रश्नात त्यांना बोलकं केलं. मग अमितकडे मोर्चा वळवला. काही काळ ठरवून फिल्म एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचे काम करून आता अमितने ही आपली पहिलीच फिल्म केलेली होती. पण अजूनही बरेच काही करता आलं असतं हे आधीच प्रांजळपणे मान्य करून आणि काही दिवस मिळाले असते तर बरंच काही करता आलं असतं हेही तो थेट सांगून मोकळा झाला. मुळचा पूणेकर अमित एकदमच मोकळा वाटला.

आता हळूहळू ओळखीचे चेहरे येऊ लागले होते. प्रदीप वेलणकर, शिल्पा नवलकर, राजीव पाटील, चित्रपटातली बच्चे कंपनी, गुंतता फेम संदीप कुलकर्णी (माबोकरांच्या भाषेत संकु) सगळे जमले. कथालेखक समीर जोशी याच्याशीही बातचित झाली. त्याचा अनुभव आणि सध्या तो करत असलेल्या काही सिरिअलवर (सास बिना ससुराल आणि साम वरची एक सिरिअल) याबद्दलही देवकाकांनीच त्याला बोलता केला. संदीप कुलकर्णीचा गुंतता मधला शेवटशेवटच्या खुरट्या दाढील्या लूकमागचे गूढ उकललंच मी..... नव्या चित्रपटात एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत तो असल्याने तसा लूक घेतला आहे त्याने. आता दोन वर्षे नो डेली सोप असं स्पष्ट सांगितलं त्याने.
इंद्रा आल्यावर वरती कॅमेरे अलाऊड नसल्याने ते तसेच गाडीत ठेऊन आम्ही तिसर्‍या मजल्यावर पोचलो. तिथे तर थोड्याच वेळात सगळे मराठी कलाकार जमले. जयंत वाडकर, ऋजुता देशमु़ख, मधुरा वेलणकर, अभिजीत साटम.....

DSC07817.JPG

नंदू माधव यांच्यासोबत अनिताताई, शर्मिला फडके आणि भुंगा

DSC07818.JPG

अमित अभ्यंकर (दिग्दर्शक) याच्याशी गप्पा मारताना देवकाका

DSC07820.JPG

कथालेखक समीर जोशी, देवकाका, अनिताताई आणि शर्मिला

DSC07822.JPG

संदीप कुलकर्णीसोबत भुंगा आणि शर्मिला

DSC07823.JPG

संदीप कुलकर्णी सोबत शर्मिला, अनिताताई आणि देवकाका

*************************************************************************************************************
आडगावात येऊन पडलेल्या बदलीसाठी खटपट करणार्‍या रामचंद्र सोनटक्के आणि कथेच्या ओघात काही घटनांमुळे एक स्वप्न ऊराशी बाळगणारा "काटू" या मुलाची ही सहज सुंदर कथा.....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता मलाच हसावं की रडावं ते कळत नाहीये Lol

आणि नामांकित प्रकर्ण वाचून मला आता मी संदिप कुलकर्णीकडे चोरून बघायच्या ऐवजी तुच्छतेने बघतेय असा भास व्हायला लागलाय Proud

मिलिंदा,अरे नको तिथे खरं बोलायची खोड आहे मला...त्याला तू तरी काय करणार म्हणा! >>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>>>>

जुनं खोड ना तुम्ही..... आमच्यासारख्या फांद्यांना चिमटे काढणारच Light 1 Rofl

आणि नामांकित प्रकर्ण वाचून मला आता मी संदिप कुलकर्णीकडे चोरून बघायच्या ऐवजी तुच्छतेने बघतेय असा भास व्हायला लागलाय
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आता मलाही तसाच भास होतोय... पहिल्या फोटोत शर्मिलाच्या तेजाने संकुने डोळे झाकून घेतलेत.... दिपलेले डोळे.

आणि दुसर्‍या फोटोत तो तिच्याकडे बघतोप्य आणि ती त्याच्या मागच्या उभ्या भलत्याचकडे Rofl

हो रे..अगदी वठलेलं खोड! Proud
आम्हाला नाही तरी इतरांना(इतर विषयांना) फांद्या फुटाव्या इतकीच इच्छा! Wink

आणि समीर जोशी का कोण त्यांच्यात आणि देवकाकांच्यात इतकी गॅप आहे की मला जयराम शिलेदार आणि हंसावाडकरांचा 'छबीदार सुरत साजिरी'जोक आठवला. दिग्दर्शक ओरडले होते म्हणे ' जवळ उभे रहा. मधून बैलगाडी जाईल' Proud Light 1

लोकहो, आता जरी चित्रपटाविषयी लिहायचे झालं तरी मी ते नवा धागा काढूनच लिहेन..... इथे आपण इतका टीपी करून ठेवलाय की...... लोकांना संदर्भच लागणार नाही किई ह्या लोकांचं काय चाललय काय...... त्य्६आपेक्षा जन गण मन विभागात शेपरेट रिव्ह्य्युच टाकेन म्हणतो... हे आपलं गटगचा मागोवा म्हणून राहू देत इथेच.... आपला विरंगुळा Wink

आईग Lol

आत्ता मला आपण बापुडवाणे तिघं पाऊणतास आत्ता कोणी फिरकेल मग फिरकेल करत उभे होतो सिनेमॅक्सच्या पायर्‍यांवर ते आठवून हसायला येतय. काय गरीब गर्दी आपण तिघंच Lol

बाकी देवकाकांचं मुलाखत कौशल्य सॉलिड धडाकेबाज आहे. त्यांनी समीर जोशीला या आधी काय लिहिलय तुम्ही असं डायरेक (दरडावून) विचारल्यावर त्याला टेन्शननी नावच आठवेनात Proud

आपण चौघं म्हण शर्मिला.... नाहीतर अचानक रोमातून अनिताताई येतील.. आणि ही पोस्ट पण तुला एडिटावी लागेल...... तसेही गेस्ट एडिटर तू आहेसच Biggrin

अरे मी आता ते फोटो नीट बघितले..... शेवटच्या दोन फोटोत ते बगलेत धरलेलं पुस्तक म्हणजे अगदी एक पांढरी स्ट्रीप आलिये...... मी म्हटले हिने कुठे हातात काठी घेतली होती प्लॅस्टिकची Rofl

मी आपली नवं पोस्ट टाकायचं टाळते आणि आधीच्यातच अ‍ॅड करते Proud अ‍ॅक्चुअली मी एक नाव कमी केलं इन्द्रा उशीरा आला म्हणून. मोजणं चुकलच की. बाकी चौघं लिहिलं तरी फारसा फरक नाही. गर्दी गरीबच संख्येची Proud

नाहीतर अचानक रोमातून अनिताताई येतील>>>>>
तेव्हा मी नव्हते रोमात!! आत्ता वाचलं. जाऊ दे...कधीतरी गणित चुकतं!!!
दो और दो पांच म्हणतोच ना. तसं दो और दो तीन!! Biggrin

Pages