दुबई उर्फ डु बाय ( Do Buy )

Submitted by सुनिल परचुरे on 19 January, 2012 - 07:17

दुबई उर्फ डु बाय ( Do Buy )
साधारण 15 वर्षापूर्वी नुसते ’दुबई’ हे शब्द उच्चारले तरी मनात भिति वाटायची. तो प्रदेश म्हणजे जगभरातल्या कुख्यातांचे माहेरघर अशी ओळख झाली होती. पण गेल्या 15 वर्षात जगभरात जे बदल वेगाने घडत आहेत तसेच ते इथेहि झाले .

खरं तर दुबई हे यु.ए.ई. मधील सातपैकी एक एमिरेट्स आहे. 1971 साली अबुधाबी, अजमन, दुबई, फुजैरा, रस-अल खैमा, शारजा व ऊम-अल क्युएन (शब्दोच्चारातील ‘चु.भु. दया. घ्या.’) हया सात एमिरेट्सनि मिळून यु.ए.ई. (युनायटेड अरब एमिरेटस) हा देश जन्मला. आताच त्यांचा 40वा वर्धापन दिन साजरा झाला. ह्याची अबुधाबी ही राजधानी आहे. फ़क्त तिथेच जगातील महत्वाची वस्तु म्हणजे खनिज तेलाच उत्पादन होते. बाकीच्यां मध्ये शारजा हे बर्‍यापैकी पुढारले पण दुबईने यु.ए.ई.ची आर्थिक राजधानी बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. अबुधाबी इथे गेल्या 10 वर्षापासून वास्तव्य करणारे माझे मित्र श्री. किरण जोशी यांनी जी उपयुक्त माहिती दिली ती खाली देत आहे.

एमिरेट्चे त्याचे यु.ए.ई.मधिल तेथील
नांव क्षेत्रफळ त्याचा % मध्ये वाटा वाळुचा रंग तेथील फर्स्टफॅमिली

1. अबुधाबी 67340 85% लाल अल नहयन
2. दुबई 3900 5% हलका लाल अल मख्तुम
3. शारजा 2600 3% राखाडी अल क्वास्मी
4. अजमन 260 0.5% क्रिम अल नुआमी
5. उम-अल क्यएन 770 1% निळा अल् मउल्ला
6. रझ अल-खैमा 1700 2.5% पांढरी अल् क्वास्मी
7. फुजैरा 1300 3% काळा अल शरगी

(परत एकदा – उच्चाराबद्दल चुक झाल्यास क्षमस्व)

हया सातपैकी फक्त दुबईने जगातील प्रवाशांचे, उद्योगधंदे करणाऱयांचे लक्ष जबरदस्त वेधून घेतले आहे. गेल्या 10 वर्षापासून त्यांनी आपली ओळख ही एक मनोरंजनाचे व उद्योगाचे ठिकाण अशी केल्यापासून त्यांच्याबद्दलचे पुर्वीचे दुषित ग्रह हळुहळु तिथल्या समुद्रातील पाण्यासारखे वा हवेसारखे स्वच्छ होत गेले. राज्यकर्त्यांनी जर मनात आणलं तर काहीही होऊ शकते. मोठी स्वप्न बघण्याची व ती पुर्ण करण्याची ताकत आमच्यात आहे, हे इथल्या एमिरेट्सनी दाखवुन दिले.. जे काही करायचे ते भव्य, दिव्य, अद्भुत हाच त्यांचा खाक्या.

त्यामुळे जेव्हा आम्ही दुबईला जायचे ठरवले तेव्हा 26 डिसेंबर ते 1 जानेवारी हे 7 दिवस पुरतील असं वाटले होते, पण ते किती फसवे होते हयाचा अनुभव आम्ही घेतला. एका टुर ऑपरेटरकडून तिथल्या हॉटेलचे व काही साईट सिईगचे बुकींग केले. तिथे हॉटेलचे चेक-इन दुपारी 1 चे असल्याने ओमान एअरचे व्हाया मस्कत ते दुबई हे विमान बुक केले. नेहमीप्रमाणे फोटोची जबाबदारी सुषमाने उचलली आहे.

22 डिसेंबरला सकाळी 6.45 ला जेव्हा ओमान एअरच्या विमानाने उड्डाण केले त्यावेळी ’गणपती बाप्पा मोरया“ बरोबर ’इन्शाल्ला“ ही मनात म्हटले. मुंबई ते मस्कत हे 2.15 तासाचे उड्डाण. त्यात व्हेज खाण्यात जी भाकरी कम पोळी म्हणून जे काही होते ते पाहून जेलमध्ये पोळया बनवणाऱयानी आपल्याला असे का बर बनवता येत नाहि म्हणत माना खाली घातल्या असत्या असे वाटले.

जसं जसं मस्कत जवळ येऊ लागलं तशा फक्त डोंगरांच्या रांगा दिसू लागल्या. हया अल हाजर माउंटन रेंज आहेत. त्यांचा रंगही वेगळाच होता. दोन डोंगराच्या खोबणीत छोटी बैठी घरे,कधि तिन चार मजलि इमारति असे चित्र दिसे.
IMG_2498.jpgIMG_2499.jpgIMG_2500.jpgIMG_2501.jpg

मस्कत हा तसा इंटरनॅशनल म्हटलं तरी छोटासाच विमानतळ आहे. पण जेव्हा विमानतळावर ओमानी रियालचा भाव ऐकला तेव्हा आमच्या तेथील खरेदीने आमेन म्हटले. कारण 1 ओमानी रियाल =140 रु. तसेच यु.ए.ई. चा दिराम. तो 1 दिराम =14.50 रु.च्या आसपास. म्हणजे ओमानी रियाल जवळजवळ 10 पटीने जास्तीचा भाव. कारण ओमान हा तेलसमृध्द देश. हया तेलाने खरचं आपला घाम काढलाय. तिथुन 40 मिनिटात दुबई. वाळूचे रण संपून जसजशा हिरवळीच्या, समृध्दीच्या खुणा दिसू लागल्या. तसे समजले दुबई जवळ आले आहे.
IMG_2525.jpg
हळुहळु डोंगर संपुन वाळुचे रण सुरु झाले
IMG_2531.jpgIMG_2529.jpg
वाळुच्या रणात चकाचक रस्त दिसु लागले
IMG_2532.jpgIMG_2524.jpgIMG_2535.jpgIMG_2536.jpg

विमान लँड झाल्यावर प्रथम सांगितले बाहेरील तापमान 21 डिग्री आहे. खरं तर मार्चपर्यंतचा सिझन हा इथे येण्याकरता चांगला. एकदा का मे-जुन सुरु झाला की असह्य तापमान. कधीकधी 50 डिग्रीच्याही पुढे. आपल्या राजस्थानातही असेच असते की. ह्याच्या व तिथल्या तापमानात फरक नाही पण संपूर्ण यु.ए.ई. ला समुद्र किंवा गल्फ असूनही ही परिस्थिती आहे.

विमानतळावर एक गंमत झाली. खरं तर तिथे जाऊन आलेल्यांनी किंवा आमच्या टूर ऑपरेटरनी ज्यांनी आम्हांला बुकींग करुन दिले त्यांनीही ही छोटीशी गोष्ट आम्हांला न सांगितल्याने आमचा वेळ गेला.

आमच्याकडे जास्त सामान नसल्याने आम्ही पटापट विमाना बाहेर आलो. एके ठिकाणी गर्दी होती ती कसली असा विचार करत पटपट पासपोर्ट / व्हीसा क्लिअरन्सच्या लाईनीत 10 मिनीटे उभे होतो. तिथे नंबर आल्यावर तिथल्या कस्टमच्या माणसाने विचारले ’हिंदी / इंग्लीश समजात है ?“ ’पहला आयरिस टेस्ट करो“. कुठेतरी मनात दुबईबद्दलची एक सुप्त भिति दडली होती. त्याने असं सांगताच आम्हांला हे ’त्यातले“ समजले की काय अशी भिती वाटली. पण मग कळले की व्हिसा क्लिअर करण्याआधी आपल्या डोळयातील बाहुलीचा फोटो काढला जातो. आधी दिसलेली गर्दी ही त्यासाठीच होती. त्यांनी परत खाली जा असे सांगितले. नॉर्मली तिथे आमच्यासारखे अगदी कमी असतील. कारण तिथे वर येण्यास दोन एक्सेलेटर्स होते. पण खाली जाण्यास एकही नव्हता. तिथे एक लिफ्ट होती. त्याने आम्हांला खाली जाण्यास सांगितले.

साधारण आपण लिफ़्ट्मध्ये चढलो की पटकन बंद झालेल्या दाराकडे तोंड करुन उभे राहतो. तसेच आम्ही दोघे उभे राहिलो. लिफ़्ट थांबली पण दार काही उघडेना. अरे बापरे आपण आत अडकलो की काय. म्हणजे हयांना आपल्याबद्दल काही खरेच वेगळे वाटतयं की काय ही भिति पुन्हा वर आली. आत एकच स्विच दिसत होता. तो दोन-तीनदा दाबला. पण मग लक्षात आले की आमच्या मागेही लिफ़्टला एक दार होते ते कधी उघडले हे आम्हांला कळलेच नाही. त्या दाराकडे पाठ करुन आम्ही आपले आमच्या समोरचे दार उघडण्याचा प्रयत्न करतोय. ओशाळून बाहेर येऊन पाहिले तर समोरच तिथे स्क्रिनींग टेस्ट सुरु होती. आमच्या डोळयातील शरमेची भावना नक्कीच त्या फोटोत आली असेल.
भाग....१.... क्रमशः

गुलमोहर: 

सुनिल्,छानै सुरुवात.. पटकन लिही पुढचा भाग.. मेट्रो सारखी दोन दारं असलेली लिफ्ट.. गंमत वाटली Happy
सुषमा ने फार छान एरिअल फोटोज काढलेत

छान सुरवात.
तो पहिला फोटो आहे तो ओमानमधल्या सूर गावाचा. इथून जवळच कासवाचे अंडी घालण्याचे ठिकाण आहे.
आयरिस स्कॅन, हा बोटांच्या ठश्यापेक्षा जास्त विश्वासार्ह मानला जातो.
दुबईला डझनावारी वार्‍या झाल्या आणि मस्कतला पाच वर्षे वास्तव्य केले, यावरुन एवढे नक्की म्हणेन, की निसर्गसौंदर्यात ओमान जास्त उजवे आहे. आता परत तिथे कधी जाता येतय ते पहायचे.

सुनिल,

छान सुरुवात !!

ईथे ( यु ए ई मध्ये ) सर्वच) विमानतळावर उतरल्यावर नविन विसा घेतलेल्याना EYE SCANNING
कराव लागत !! सर्व साधरण पणे चार वर्षापुर्वी ही पद्धत सूरु झाली. त्या पुर्वी हाताचे ठसे (Electronically)
घेत असत.

ओमान दुबईहून जास्त सुंदर आहे -- दिनेशदांना १००% अनुमोदन

असो, लवकर पुढचे भाग लिहा,.

झक्कास सुरुवात. मस्त लिखाण.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत. Happy
सुषमा ने फार छान एरिअल फोटोज काढलेत>>>>+१

ओमान जास्त सुंदर आहे हे खरं. त्या सुर च्या समुद्र किनार्‍यावर रात्री खुप कासवं बाहेर फिरताना दिसतात ( रात्री तीथे जाण्यासाठि आधी परवानगी लागते आणि फ्लॅश फोटोग्राफिला मनाई आहे), याच भागात बोटो बांधण्याचा मोठा उद्योग आहे, स्थानिक लोक सिंदबाद याच भागातला असे सांगतात.
सुर, सोहार , निझवा,सलाला आणि मस्कत अशी छान ट्रिप हओउ शकते, अजुन भारतातल्या टुर ऑपरेटर्स ची नजर ईकडे फारशी का वळली नाही हे येक कोडं.

दुबई ला नेहमी काही ना काही नविन टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन्स अ‍ॅड होतच असतात पण अशा कॄत्रीम अ‍ॅट्रॅक्षन्स ना भेट देण्यापेक्षा ओमान ला येक भेट केव्हाही चांगली. Happy

ओमान जास्त सुंदर आहे मत असणाऱ्या सगळ्यांना अनूमोदन .... गेले साडेचार वर्ष मस्कतमधील वास्तव्यामूळे स्वानूभवाचे बोल.
संयूक्त अमिरातीत पाहिलेल्या अमिरातीपैकी अल-ऐन मस्कतशी साधर्म्य साधणारे आहे. अतिशय हिरवेगार आहे ते.

दुबईपेक्षा राजधानीचे अबूधाबी शहर जास्त आवडण्याजोगे आहे... गेल्या सहा महिन्याचा इथला वास्तव्याचा अनूभव अतिशय सुखावह आहे.

लेख आवडतोय... फोटो छानच आहे. पुढील भागांची वाट पहातेय.

दुबई ला नेहमी काही ना काही नविन टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन्स अ‍ॅड होतच असतात पण अशा कॄत्रीम अ‍ॅट्रॅक्षन्स ना भेट देण्यापेक्षा ओमान ला येक भेट केव्हाही चांगली.>>>>> नैसर्गिक सौंदर्याच्या मानाने माझ्या मते 'भारतभ्रमण' योग्य ठरेल.
वाळवंटाचे सौंदर्य राजस्थानात सुध्दा पाहता येईलच.
नैसर्गिक सौंदर्यच पहायचे असल्यास ओमान्,दबई,सौदी ची ट्रिप करण्यात काय अर्थ? इथले सौंदर्य मानवाने 'वाळुवर' केलेल्या अदभुत चमत्कारातच. Happy

सुनिलभौ छान केलंत इथे भेट देउन.
एक छोटसा Wink झब्बु.....
'बुर्ज खलिफा'.... टॉपवरुन घेतलेले प्रची.


शेख झायद रोड.

'दुबई मॉल' मेट्रो स्टेशन.

इतक्यतच झब्बु दिला नसता तर बर झाल असत. दुबैला गेल्यावर 'बुर्ज खलिफा'. प्रची. नाहि असे नाहि होणार. आगे आगे देखो.... थोडा सबर करो!!!!!

इतक्यतच झब्बु दिला नसता तर बर झाल असत.>> काय करु सर्व निसर्ग सौंदर्यावरच अडकले.....आणि तुम्ही दुबईला उगाच्चच गेलात असं चित्र अभे राहत होते.... Lol

म्हणुन देउन टाकला काय तो एकदाचा......तुम्हीही द्या प्रचि वेगळ्याएंगलचे त्यात काय...??

नाहि असे नाहि होनार. आगे आगे देखो.... थोडा सबर करो!!!!! >>कल्पना होती. इथले माझ्या जवळ एकुण २००-३०० प्रचि आहेत पण इथे ३ च दिलेत.

सुनिलदादा, मस्तच प्रचि...
पुढच्या भागाची वाट पाहातोय Happy