प्लेग्रूप संस्थापनाविषयक माहिती.

Submitted by टोकूरिका on 14 January, 2012 - 05:05

माँटेसरी-प्री प्रायमरी टिचिंगचा कोर्स मी उत्तीर्ण झाले असून मला कल्याण येथे एक प्लेग्रूप सुरू करायचे आहे. त्यासाठी माहिती मिळू शकेल का??

उदा.

रजिस्ट्रेशन कुठे करावे?

जागेची निवड कुठे/कशी करावी?

मुलांची अधिकाधिक संख्या किती असावी??

जाहिरात कशी करावी??

इत्यादि.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्याण खडकपाडयाच्या पुढे बरीच नविन वसाहत तयार होत आहे. नविन व्यवसाय करण्यासाठी चांगली जागा. धर्मादाय आयुक्तांकडे तुम्ही नोंदणी करुन नविन व्यवसाय सुरू करु शकता.

मी तुमच्या साठी जाहिराती बनवू शकेन. मला तुमचे म्याटर द्या. पूर्वी शाळांसाठी जाहिराती लिहीत असे मी. नाव ठरविले का? फुलपाखरे, गोड गोड बाग, स्मार्ट किड्स असले काहितरी हवे.

अरे वा अश्विनीजी धन्यवाद.! नाव ''हॅप्पी किड्स'' असं ठेवायचा विचार आहे. तुम्ही मदत करण्यासाठी सरसावलात त्याबद्दल खरच खुप आभारी आहे. आता नक्की पिडेन तुम्हाला जाहिरातीसाठी. Happy

सारीका, शुभांगी, अतुल आणि निंबुडा धन्यवाद सर्वांचे! Happy
निंबु तसंही मी स्मार्ट किड्स नै ''हॅप्पी किड्स'' हे नाव निवडलय....अजून सुचवा नवीन माहित असतील तर....:)

लोक्स मला आतापर्यंत मिळालेली माहिती.:

१. प्री-स्कूल साठी कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करावे लागत नाही.

२. नाव ठरवले तर ते तहसिलदाराकडे रजिस्टर करावे लागते.(?)

३. किमान गुंतवणूक ३ ते ४ लाख.

४. जागेचं किमान क्षेत्रफळः १२०० ते १५०० चौरसफूट

५. मुलांची किमान संख्या: २० ते २५

६. केअरटेकर्स(आया) व टीचर्स रेशिओ: १०:१

७. फ्रँचायझीशिप घेतली तर येणारा खर्च : अंदाजे रू.२५००००/- (नो रॉयल्टी बेसिसवर)

अजूनही अनुत्तरित प्रश्नः

१. नावाचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे का?

२. महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांमध्ये वेगळी कर्जसुविधा उपलब्ध आहे का?

३. अ‍ॅफिलियेशन कसे केले जाते? योग्य निवड कशी करावी?

४. जागा भाड्याने घेताना कोणती काळजी घ्यावी?

५. फ्रॅंचायझींग की स्वतःचं प्रीस्कूल??

>>>>६. केअरटेकर्स(आया) व टीचर्स रेशिओ: १०:१ <<<< आँ?
हा असा कसा रेशो? जरा समजावुन सान्गणार का?
(मी धरुन चाललो होतो की दहा बालकान्करता एक आया/शिक्षिका पुरे होईल.
इथे तर आया नि शिक्षिका यान्च्यातच रेशो मान्डलाय Proud )

ओके, चान्गला धागाहे, अजुनही माहिती जमेल तशी लिहा इथे Happy अन शुभेच्छा Happy

बर, पण तुम्ही मराठि मिडीयम की इन्ग्लिश मिडियमचे स्कुल करणार?
प्लेगृपचा, तुमचा असा अभ्यासक्रम ठरविणार की रेडीमेड उपलब्ध करुन घेणार?
स्वतः देखरेख करणार की दुसरेहाती सोपविणार?
पुढील अ‍ॅडमिशनकरता कोणकोणत्या शाळान्शी "सलोखापूर्ण/सौजन्ययुक्त" संबंध निर्माण करणार?
पुढील अ‍ॅडमिशनकरता पालकान्ना (अन अर्थात पाल्याला शिकवुन तयार करणे ओघाने आलेच) मार्गदर्शन करणार की कसे?
विद्यार्थ्यांचे खानपानादिक कपडेलत्ते/उठनीज इत्यादीची सोय कशी कशी करणार?
प्लेगृपचे तास वगळता, बेबीसिटीन्ग/पाळणाघर या सुविधेची मागणि केली असता पुरवणार का?/बदली व्यवस्था सुचविणार का?
अत्यावश्यक वेळेस, त्वरीत वैद्यकीय सुविधेची उपलब्धता काय-कशी असणार आहे?
पन्चवीस ते तीस बालकान्ना वावरण्या/खेळण्यासाठी पुरेसे अंगण/जागा, खेळणी आहेत का? पुरेसे फर्निचर/सतरन्ज्या इत्यादिक आहे का? अन्तर्गत व बाह्य सजावट काय कशी करणार?

इत्यादी बाबीन्चा विचारही व्हावा Happy

टोकु शुभेच्छा Happy

एखाद्या आधीपासून चालू असलेल्या प्ले गृप मधे जाऊन त्यांनाही विचारुन घे माहिती. माझ्या आईला विचारुन ठेवते, ती बालवाडी चालावायची बरिच वर्ष

धन्यवाद कविन. Happy
चिऊडे धन्स गं....

लिंबूकाका सध्या तरी वेरी मच बिगिनिंग आहे सर्वच बाबतीत.
इंग्रजी प्री-स्कूलच काढणारे. अभ्यासक्रम बहुधा स्वतः ठरवेन. स्वत: लक्षपूर्वक सांभाळणार. नुसतंच प्रीस्कूल (पाळणाघर नव्हे) अस्ल्याने तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खानपान कपडेलत्ते इत्यादींचा विचार नाही केला अजून.
पर्यायी पाळणाघराचे रेफरन्स वगैरे देता येतील.

आधीच संस्थापित शाळांमध्ये जाऊन माहिती घेणे कितपत योग्य? म्हणजे ते लोक माहिती देतीलच कशावरून? स्पर्धेत वाढ होईल या कारणाने गैरमार्गदर्शन करणार नाहीत का?

एक ना हजार शंका आहेत आत्ता. सध्या मी पुरेशी ( तळमज्ल्यावर १५०० स्वेफी.+ मोकळे अंगण) अशा स्वरूपाची जागा शोधतेय.

एकदा जागेचं ठरलं की मगच फर्निचर मागवणार. त्यासाठी कोटेशन्स मागवली आहेत.

रूम्स ची रंगसंगती, फर्निचर ची मांडणी, टॉयलेट्+बाथरूमची सोय, व इतर सजावट इत्यादींचा टेंटेटीव्ह आराखडा तयार केला आहे.

तुम्ही जे अ‍ॅडमिशनचे म्हणताय ते म्हणजे थोडे कन्फ्युजिंग आहे माझ्यासाठी. शिवाय अ‍ॅफिलियेशन बद्दल माहिती मिळत नाही अजून Sad

जाहिरातीची पत्रकं, प्रवेशासाठी फॉर्म्स, पालकांना मार्गदर्शक अशी माहिती छापलेली पत्रकं, इत्यादींबद्दल विचार झाला आहे. पण अ‍ॅफिलियेशन चं कोडं सुटत नाहीये. म्हणजे जेव्हा मुलांना पासिंग सर्टीफिकेट्स वगैरे द्यायची वेळ येइल तेव्हा काय?

बघू! मी जिथे हा कोर्स केला, तिथल्या प्रमुख अध्यापिका व इतर शिक्षिका यांची मदत घेईन म्हणते त्यासाठी.

>>> नुसतंच प्रीस्कूल (पाळणाघर नव्हे) अस्ल्याने तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खानपान कपडेलत्ते इत्यादींचा विचार नाही केला अजून. पर्यायी पाळणाघराचे रेफरन्स वगैरे देता येतील. <<<
मी याचा विचार मुद्दाम करतोय, कारण, जर आईबाबा दोघेही जण कामावर जाणार असतील, तर जास्तीत जास्त दोनचार तासाच्या प्रीस्कुल नन्तर मुल कोठे जाणार? त्याला नेणार आणणार कोण? इत्यादी अनेक प्रश्न पडतात. त्यामुळे जवळपासच भरवशाचे पाळणाघर असेल, तर ती जबाबदारी पालकान्मार्फतच तिकडे सोपविली जाऊ शकते. पण याचबरोबर, म्यानपॉवर (आयमीन वेमेनपॉवर Proud ) पुरेशी असेल, तर "साईड बिझनेस" तसेच जागेचा पुरेपुर वापर या दृष्टीनेही बेबीसिटीन्गची पर्यायी व्यवस्था पुरविणेचा विचार पुढेमागे करता येऊ शकतो. मात्र हाताशी मनुष्यबळ हवेच हवे. Happy

अ‍ॅडमिशनचे येवढ्याच साठी की, जर तुमचे प्रीस्कुल, धुमधड्याक्यात, वा योग्य तितक्या प्रसिद्धी करुन नावारुपास आल्यावर, सहसा नामवन्त शाळा त्यान्चे शिशूवर्गात प्रवेशासाठी फार खळखळ करीत नाहीत, त्याकरता, वेगवेगळ्या निमित्ते, शाळान्शी/त्यातिल शिक्षक-कर्मचारीवर्गाच्या संपर्कात निदान सुरवातीची एखाददोन वर्षे असणे आवश्यक. प्लेगृपचेच ग्यादरिन्ग/सहल/कसलेतरी दिवस साजरे करताना पाहुणे म्हणून बोलाविणे, वा तत्सम उपायान्नी देखिल हे साध्य करता येते. नॉट नेसेसरी की दरवेळेस "ऑफिशियल बिझनेस माईण्डेड व्हिजिट्स" च केल्या पाहिजेत शाळान्बरोबर.
तुम्ही किती आगळेवेगळे उपक्रम राबवता, अन तुमचे/उपक्रमाचे किती चर्वितचरण मुल घरी गेल्यावर करते यावरही बरेच अवलम्बुन असते. असे झाल्यास पालकच तुमची पब्लिसिटी योग्य प्रकारे करतात/त्यान्चेकडून होते. नामवन्त शाळा याची दखल जरुर घेत असतात.
शिवाय, तुमच्या स्कुल मधिल मुल, भले इन्टर्व्ह्युला बन्दी असली तरीही ओळखीकरता शाळान्च्या पुढे येते, तेव्हा त्या त्यास जोखत असतातच, अन तुमचे नाणे खणखणीत पहिल्या एखाददोन वर्षातच सिद्ध झाले, तर पुढे प्रश्न रहात नाही.

मी याचा विचार मुद्दाम करतोय, कारण, जर आईबाबा दोघेही जण कामावर जाणार असतील, तर जास्तीत जास्त दोनचार तासाच्या प्रीस्कुल नन्तर मुल कोठे जाणार? त्याला नेणार आणणार कोण? इत्यादी अनेक प्रश्न पडतात. त्यामुळे जवळपासच भरवशाचे पाळणाघर असेल, तर ती जबाबदारी पालकान्मार्फतच तिकडे सोपविली जाऊ शकते. पण याचबरोबर, म्यानपॉवर (आयमीन वेमेनपॉवर फिदीफिदी ) पुरेशी असेल, तर "साईड बिझनेस" तसेच जागेचा पुरेपुर वापर या दृष्टीनेही बेबीसिटीन्गची पर्यायी व्यवस्था पुरविणेचा विचार पुढेमागे करता येऊ शकतो. मात्र हाताशी मनुष्यबळ हवेच हवे. स्मित>>>>>>>>>

हा विचार खर तर मीही केला होता, पण आत्ता पाळणाघराचे रेफरन्स देणारे फक्त. पुरेसं मनुष्यबळ नसल्याने अन एकटीने ही धुरा घेतल्याने, दोन जबाबदार्‍या पेलवणे आत्ता तरी शक्य नाही. दोनेक वर्षात तो विचार करू शकते.

अ‍ॅडमिशनचे येवढ्याच साठी की, जर तुमचे प्रीस्कुल, धुमधड्याक्यात, वा योग्य तितक्या प्रसिद्धी करुन नावारुपास आल्यावर, सहसा नामवन्त शाळा त्यान्चे शिशूवर्गात प्रवेशासाठी फार खळखळ करीत नाहीत, त्याकरता, वेगवेगळ्या निमित्ते, शाळान्शी/त्यातिल शिक्षक-कर्मचारीवर्गाच्या संपर्कात निदान सुरवातीची एखाददोन वर्षे असणे आवश्यक. प्लेगृपचेच ग्यादरिन्ग/सहल/कसलेतरी दिवस साजरे करताना पाहुणे म्हणून बोलाविणे, वा तत्सम उपायान्नी देखिल हे साध्य करता येते. नॉट नेसेसरी की दरवेळेस "ऑफिशियल बिझनेस माईण्डेड व्हिजिट्स" च केल्या पाहिजेत शाळान्बरोबर.
तुम्ही किती आगळेवेगळे उपक्रम राबवता, अन तुमचे/उपक्रमाचे किती चर्वितचरण मुल घरी गेल्यावर करते यावरही बरेच अवलम्बुन असते. असे झाल्यास पालकच तुमची पब्लिसिटी योग्य प्रकारे करतात/त्यान्चेकडून होते. नामवन्त शाळा याची दखल जरुर घेत असतात.
शिवाय, तुमच्या स्कुल मधिल मुल, भले इन्टर्व्ह्युला बन्दी असली तरीही ओळखीकरता शाळान्च्या पुढे येते, तेव्हा त्या त्यास जोखत असतातच, अन तुमचे नाणे खणखणीत पहिल्या एखाददोन वर्षातच सिद्ध झाले, तर पुढे प्रश्न रहात नाही.>>>>>>>>>>

प्वाईंट टू बी नोटेड. Happy

मला प्लीज ते सांगा ना की आपलं प्री-स्कूल एखाद्या नामांकित संस्थेशी संलग्न करून प्रमाणपत्रांचा प्रश्न सोडवता येइल काय??

>>>> आपलं प्री-स्कूल एखाद्या नामांकित संस्थेशी संलग्न करून प्रमाणपत्रांचा प्रश्न सोडवता येइल काय?? <<<
अं? माझ थोड कन्फुजन होतय!
१) "ब्रॅण्डेड प्रीस्कुलबरोबर" नाव जोडणे?
२) कि नामवन्त शाळान्सोबत करारमदार करणे?

१) ब्रॅण्डेड (सॉरी, नेमके शब्द आठवत नाहीत) संस्थान्बरोबर प्रीस्कुलचे नाव जोडले, तर उत्पन्नातील बराच भाग रॉयल्टि म्हणुन त्याना द्यावा लागतोच, शिवाय त्यान्चे नियम/अभ्यासक्रम्/अवान्तर शिक्षण, काटेकोरपणे अंमलात आणावे लागतात. तुम्ही जिथे उघडणार, तिथला ट्रेण्ड, पालक/पाल्य यान्ची "सोसायटी-रहाणीमान-अपेक्षा" काय ते बघुनच हा "अव्यापारेषू व्यापार" करायचा की नाहि ते ठरवावे लागेल. शक्यतो सर्वच बाबतीत प्रीस्कुलची स्वतःची स्वतंत्र आयडेण्टीटी निर्माण करण्यावर भर द्यावा असे मला वाटते.
कायदेशीररित्या, प्रीस्कुल जर रजिस्टर्ड असेल, तर प्रमाणपत्रांची अडचण काहीच येणार नाही. रजिस्टर्ड, कुठे कसे करावे (म्युन्सिपल अ‍ॅथोरिटीज), त्यांचे मिनिमम नियम काय असतात याबद्दल माहिती काढावी लागेल.

२) नामवन्त शाळा कधीकधी (कायदेशीररित्या करारस्वरुपात नाही तरि) प्रीस्कुलशी मिलतेजुळते घेऊन पुढे जात रहातात. तुमच्या परिसरातील अशा कोणत्या शाळा या स्वरुपात "अलिखित" जोडणी करतील याचा अन्दाज घ्यावा लागेल. पण अशी गरज नाही की दरवेळेस हे झाल्याशिवाय प्रीस्कुल उघडताच येणार नाही. सबब या अ‍ॅडीशनल अ‍ॅक्टिव्हीटीज ठरतील.
आता या पुढील माहिती मात्र जाणकारान्नीच सान्गावी Happy

Pages