हिस्स्सssssss

Submitted by जिप्सी on 11 January, 2012 - 23:19

कोब्रा
वाईन स्नेक (हरणटोळ)

एक फोटो माझापण Happy
ट्रिंकेट (Trinket)

धुळनागीण (रेसर)

धामण (रॅट स्नेक)

साप चावला, काहिही नाही झालं (प्रात्यक्षिक) Happy Happy

गुलमोहर: 

कोब्रा काय देखणा आहे. हरणटोळ मिश्किल हसतो आहे असं वाटतंय. आणि त्या ट्रिंकेटची नक्षी अ‍ॅनिमल प्रिंट कपड्यांसाठी काय सही आहे.

जिप्सी, सही आहेत फोटो. हिम्मतवाला आहेस. (जितेंदर नाही. जिगरबाज म्हणायचंय मला) Happy

सुंदर फोटो... खास करून ट्रिंकेट..
पण साप फार हाताळू नयेत. ते थंड रक्ताचे असल्याने त्यांना त्रास होतो.

बित्तुबंगा ..
हरणटोळ टाळूवर वार करतो अशी वदंता आहे. त्यात किती तथ्य आहे?

>>>> साफ खोटे आहे. हा साप अर्धविषारी असतो. म्हणजे ह्याचे विष मानवाला हानिकारक नसले तरी बारीक प्राणी आणि कीटक वगैरेंना मारायला पुरेसे असते. आपल्याला फारतर खाज नाहीतर पुळ्या असे इन्फेक्शन होऊ शकेल.

नाग सोडला तर घोणस, फुरसे आणि मण्यार हे भारतातील इतर विषारी साप...

माझ्याकडून झब्बू...

मण्यार...

घोणस...

या शिवाय पिवळी धामण..

आणि हा स्पेक्टकल कोब्रा..

वरचा साssss Lol
शिर्षक वाचून आधी मला वाटले मल्लिकाचे फोटो आहेत की काय ...:हहगलो:

ट्रिंकेट एक्दम पिल्लूकलं आहे वाट्टं!
हरणटोळ सुंदर. जिप्सी हा हरणटोळ आणि सापकांदा नावाची वनस्पती बेमालूमपणे एकमेकांची नक्कल करतात.
सगळे फोटो सुंदर. खूप आवडले.
झब्बूपण सुंदर.

अरे सापांचे फोटो टाकायचे आहेत का झब्बूत....मग माझापण....

हरिश्चंद्रगडावर सापडलेला वूल्फ स्नेक...बिनविषारीच पण साधर्म्यामुळे मण्यार समजून मारला जातो.

आणि हा माझ्याबरोबर

जिप्सी, माफी असावी रे, तुझ्या धाग्यावर दुसर्यांदा झब्बू दिल्याबद्द्ल. पण यावेळी सुरूवात रोहनने केली.

हिरवाचार या शब्दाचा अर्थ 'जाणवला'. बापरे! खरंच खतरनाक!
हरणटोळ = दामलेमास्तर लोक्स! का चितळेमास्तरांना उगा बोल लाविता.

धन्यवाद लोक्स Happy

चितळे मास्तर/दामले मास्तर >>>>>:फिदी:

कोब्राचे फोटो जबरी. त्याचे फोटो लांब उभा राहुन काढताना पण वाट लागते>>>>अगदी अगदी. त्याच्या नुसत्या फुत्कारानेच अंगावर काटा उभा राहत होता.

दक्षे,अवल, हिम्स, अके Proud

वरचा साssssss लावला आहे>>>>>:हहगलो:

कोब्रा म्हणजे काय बोलाचं कामच न्हाई. दिसला की आपण धूम ठोकावी.>>>>>अगदी अगदी

मने Happy

रोहन/आशु, झब्बू सह्हीच. Happy
पण साप फार हाताळू नयेत. ते थंड रक्ताचे असल्याने त्यांना त्रास होतो. >>>>रोहन धन्स ह्या माहितीसाठी.
रोहन, तु काढलेला नाणेघाटातील पाण्यातील सापाचा फोटो पण सह्हीच आहे. जमल्यास इथे पण टाक ना. Happy

फुरसं माझं एकदम आवडतं!
जल्ला लै डेंजर फोटुज.
देखणी मॉडेल मंडळी!
कसला ऐटीत बसलाय कोब्रा!
आणि तो हरणटोळ पण भारीच हसतोय >>>>>:फिदी:

जिप्स्या ... झब्बु देऊ काय ?>>>>>रोमा, बिनधास्त Happy किंवा थोड्या दिवसात अजुन एक धागा काढ "फिस्स्स्स्स्स्स". Happy Wink

जिप्सी, माफी असावी रे, तुझ्या धाग्यावर दुसर्यांदा झब्बू दिल्याबद्द्ल. पण यावेळी सुरूवात रोहनने केली.>>>>>बस्स क्या Happy अजुन असेल तर येऊ देत. Happy विषारी/बिनविषारी सापांची माहिती असलेला एक वेगळा धागाच (माहितीसाठी) काढुया. Happy

का चितळेमास्तरांना उगा बोल लाविता.>>>>:फिदी:

जिप्सी..खतरनाक फोटोज... खुर्चीवर पाय घेऊन मग पाहिले... किती शूरपणा !!!
Proud
रोहन,आशुचँप चे झब्बूही जबरदस्त!!!!!

जिप्सी ..सर्व च्या सर्व फोटो एक नंबर ..कोब्रा खतरनाक ...

चतका प्रमाणे तुझा प्रकाशचित्र ची वात पाहणारा तुझा पंखा

बाबारे!!!!!!!
"साप" शब्दानेच भिती वाटते, तरीही हिम्मत करून स्नॅप्स पहायला आले..
योगेश, छान स्नॅप्स, भिती नाही का रे वाटली पण, आणि ते प्रात्यक्षिक कोणाच्या हातावर केले आहे?

सेनापती आणि आशूचे झब्बू पण एक से एक.
तो मण्यार डेंजर आहे दिसायला देखील!

माय गॉड...आश्चर्यचकित बाहुली....खरच मस्त फोटो, मी धामण, हरणटोळ पाहिलेत, बाकीचे नवीन आहेत.

जिप्स्या जबरदस्त..
माझा EOS T3 आला रे, अधी जर तुझ्यासारख्या मोठ्या प्राण्यांचे फोटो काढावे म्हणतो. Happy

कसले भयंकर प्रचि आहेत.. मानलं तुला.. आणि इतक्या जवळुन फोटो काढलेस ते... ग्रेट..

मी मात्र प्रचि बघुनच घाबरले, इतके जिवंत दिसतायेत सगळे साप

झब्बू आत्ता पाहिले.. बरं झालं एका दमात सगळे प्रचि पाहिले नाहित ते...

सगळे प्रचि, झब्बु क्लासच आणि साप हाताळणार्‍यांच आणि त्यांचे प्रचि काढणार्‍यांचे प्रचंड कौतुक..

आणि ते प्रात्यक्षिक कोणाच्या हातावर केले आहे?

>>> योग्य प्रश्न बागेश्री. जिप्सी, त्यांना म्हणावं नखं कापायला झाली आहेत. Proud

जबर फोटोज आले आहेत, पण चावल्यावर काही अ‍ॅन्टीसेप्टिक लावायला दिले का? कमी प्रमाणात जरी विष असले तरी ते "विष" आहे Sad
की नुसतीच जखम होते आणि मग बरी होते?

Pages