माझी नविन वर्षामधील कोकण सहलीची प्रकाशचित्रे

Submitted by अतुलनीय on 10 January, 2012 - 02:39

मी पाहिलेली ठिकाणे -
मालवण, वेंगूर्ला, शिरोडा, रेडी, तेरेखोल, तारकर्ली, देवबाग, निवती, आचरा, कुणकेश्वर, जैतापुर, पावस, रत्नागिरी, मार्लेश्वर
-----------------------------------------------------------
एकुण ४ दिवसांचा प्लॅन होता (३ रात्री, ४ दिवस). ३ही रात्री मालवणमध्येच मुक्काम केला.
-----------------------------------------------------------
पहिल्या दिवशी सकाळी पुण्याहून निघून कोल्हापूर, गगनबावडा, करुळ घाट, तळेरे, कणकवली, कसाल मार्गे मालवण मुक्कामी सायंकाळी पोहोचलो (एकूण अंतर ४१०कि.मी., एकुण ९ तास).
-----------------------------------------------------------
दुस-या दिवशी सकाळी सिंधुदुर्ग किल्ला व स्नोर्केलिंग केले. दुपारी बाहेर पडून परुळे, वेंगुर्लामार्गे (सागरी महामार्गाने) रेडी व तेरेखोल (६५कि.मी.) पाहुन सूर्यास्ताच्या वेळी शिरोडा बीचला पोहोचलो. तेथे समुद्रस्नानाची मजा लुटून रात्री ८ वा. मालवणला परत आलो.
-----------------------------------------------------------
तिस-या दिवशी सकाळी तारकर्ली, देवबाग, भोगवे बिच (२०कि.मी.) व साळ्गावकर गणपती मंदिर (मालवण गावामध्ये) पाहीले. दुपारी थोडी विश्रांती घेवून बाहेर पडून मालवण येथील चिवला बीच पाहून, मालवण मार्केट्मध्ये फेरफटका मारुन सूर्यास्ताच्या वेळी तारकर्ली बीचला पोहोचलो. तेथे समुद्रस्नानाची मजा लुटून रात्री ८ वा. हॉटेलवर परत आलो.
-----------------------------------------------------------
चवथ्या दिवशी सकाळी लवकर बाहेर पडून आचरा, कुणकेश्वर, जैतापुर, पावस या मार्गे रत्नागिरी येथे सकाळी १०:३० वा. पोहोचलो. (१२०कि.मी., ४ तास, पुन्हा सागरी महामार्ग झींदाबाद). वाटेमध्ये वेळेअभावी फक्त कुणकेश्वर येथे थांबलो. नाहीतर आडिवरेची महाकाली, कशेळी येथील कनकादित्य, पावस येथील स्वामी स्वरुपानंद यांचा आश्रम, देवगड वगॅरे पाहता आले असते. रत्नागिरी येथे जेवण करुन दुपारी १ च्या सुमारास मार्लेश्वर येथे पोहोचलो (७०कि.मी., २ तास). मार्लेश्वर येथे देवदर्शन घेवुन आंबा घाटमार्गे कोल्हापुरला सायंकाळी ५:३० वा. पोहोचलो. (शॉर्टकटने ८५कि.मी., ३ तास). कोल्हापुरला चहाचा ब्रेक घेवून ६ वा. नीघून रात्री १०वा. पुण्यामध्ये पोहोचलो. (या दिवशी गाडीचे रनींग खूपच झाले - ५१०कि.मी.) पण दुस-या दिवशी ऑफीसला सुट्टी असल्यामुळे जास्ती थकवा जाणवला नाही.
-----------------------------------------------------------

मालवण समुद्रकिनारा
Picture_10.JPG

सिंन्धुदुर्ग किल्ला - मालवण किना-यावरुन
Picture_21.JPG

सिंन्धुदुर्ग किल्ला - होडीमधून
Picture_22.JPG

सिंन्धुदुर्ग किल्ल्यामधील एक झाड
Picture_33.JPG

सिंन्धुदुर्ग किल्ल्यामधील भवानी मातेचे मंदिर
Picture_45.JPG

सिंन्धुदुर्ग किल्ल्यामधील जास्वंदीचे फुल
Picture_58.JPG

सिंन्धुदुर्ग किल्ल्यामधील तटबंदीच्या एका झरोक्यामधुन दिसणारे द्रुष्य
Picture_68.JPG

वाटेमध्ये जाताना लागलेली एक खाडी
Picture_80.JPG

रेडीच्या गणपती मंदिराचा कळस
Picture_88.JPG

तेरेखोल किल्ल्यामधील येशुंचा उभा पुतळा
Picture_103.JPG

शिरोडा बिचवरील सुर्यास्त
Picture_112.JPG

शिरोडा बिचवरील सुर्यास्त
Picture_114.JPG

शिरोडा बिचवरील सुर्यास्त
Picture_115.JPG

तारकर्ली बॅकवॉटरमधून दिसणारा सुर्योदय
Picture_130.JPG

तारकर्ली बॅकवॉटरमधून दिसणारा सुर्योदय
Picture_142.JPG

निवती किल्ल्याचे भग्नांश
Picture_163.JPG

निवती बीच - अतिव सुंदर जागा. तीथे गेल्यावर "कहोना प्यार है" मधील मॉरिशसच्या बीचवरील गाण्याच्या लोकेशनची आठवण आली.
Picture_170.JPG

निवती बीच - अतिव सुंदर जागा. Another view
Picture_177.JPG

तारकर्ली मधील त्सुनामी आयलंडवरील "सी-गल्स"
Picture_191.JPG

देवबागच्या किना-यावरील M.T.D.C.ची हाउस्-बोट
Picture_197.JPG

तारकर्ली किनारा
Picture_200.JPG

तारकर्ली येथील श्री. गुरुदेव दत्त मंदिर
Picture_204.JPG

तारकर्ली किना-यावर जाळे बाहेर खेचताना स्थानीक कोळी बांधव
Picture_214.JPG

जाळ्यातील माशांवर झेपावू पहाणा-या सी-गल्सना पहात पहात अस्ताला जाणारे सुर्यबिंब
Picture_219.JPG

सुर्यास्तानंतरच्या रंगांच्या उधळणीच्या बॅकग्राउंडवर किना-यावरील होडी
Picture_221.JPG

सुर्यास्तानंतरच्या रंगांच्या उधळणीच्या बॅकग्राउंडवर किना-यावरील होडी
Picture_222.JPG

मालवणमधील साळगावकर यांचे श्री. गणेश मंदिर
Picture_226.JPG

मालवणमधील साळगावकर मंदिरामधील गणेशाची सुंदरशी सुवर्णमूर्ती
Picture_227.JPG

कुणकेश्वर समुद्रकिनारा व उजवीकडे दिसणारे मंदिर
Picture_234.JPG

कुणकेश्वर मंदिराचा नक्षीदार कळस व गाभा-याची भिंत
Picture_238.JPG

कुणकेश्वर मंदिरासमोरील नंदी
Picture_242.JPG

वाटेत जाताना लागलेली एक खाडी
Picture_244.JPG

जैतापुरची खाडी
Picture_245.JPG

अजुन एक खाडी (पावसजव्ळील)
Picture_253.JPG

मार्लेश्वर मंदिरामागील खडे पर्वत
Picture_270.JPG

मार्लेश्वर मंदिर
Picture_273.JPG

गुलमोहर: 

अप्रतिम प्रचि आहेत, माझी कोकणवारीची इच्छा दिवसेंदिवस प्रबळ होतेय. Happy मालवण किनारा,सुर्यास्त, सुर्योदय्, निवती बीच , खाडी तर मस्तच आहेत. कोकण ट्रीप प्रीपोन करावी लागणार बहुतेक, हे अस्सल निसर्गसौंदर्य पहायची आता खुप खुप घाई झालीये. Happy

झरोक्याच्या फोटोचे फ्रेमिंग आणि 'सुर्यास्तानंतरच्या रंगांच्या उधळणीच्या बॅकग्राउंडवर किना-यावरील होडी' या फोटोचे फ्रेमिंग आवडले. Happy

धन्यवाद सावली, आपले असेच प्रोत्साहनपर शब्द मिळाले तर अजुन उत्त्त्तमोत्तम फोटो काढायला बळ मिळेल.

मस्त चित्रे.
कोकणातील बहुतेक सर्व मंदिरांना रंगीबेरंगी केलेले असते. अर्थातच चांगले दिसते.
जैतापूरच्या खाडीच्या चित्रात अर्धा बुडालेला पूल आहे की आणखी काही?

मैना, तो बहुदा अर्धा बुडालेला पूल नसावा. मला असे वाटते की नवीन पुल बांधताना पाणी अडवण्यासाठी केलेली टेंपररी अ‍ॅरेंजमेंट असावी.

अतुल...
मला असे वाटते की नवीन पुल बांधताना पाणी अडवण्यासाठी केलेली टेंपररी अ‍ॅरेंजमेंट असावी...>>>...
फार पूर्वी समुद्रावरुन बरिच वहातूक व्हायची, आणी त्यावेळि जैतापूरची खाडी बर्‍यापैकी खोल होती. त्या मुळे समुद्रात फिरणारे मोठे पडाव, मचवे या खाडीत सहजपणे व्यापार-उदिमा साठी फिरू शकत असत. पडाव, मचव्या तून येणार्‍या/ जाणार्‍या मालाची, लोकांची चढ-उतार करण्यासाठी बांधलेली जेटी आहे ती... कालांतराने समुद्रामधिल बंदरे आणी शेजारच्या खाड्या गाळाने भरून गेल्यामुळे, या जेटीचा बराच मोठा भाग पाण्याखाली गेलेला आहे... Happy ...

शेनापती...
आपलाच अरिया असा...>>> == एरिया आपलोच आसा, तेव्हा येवक काय्यक हरकत नाय... Proud ...

Pages