आज की ताजा खबर: काल पुण्यात बालगंधर्व जवळ हास्यस्फ़ोट!! अर्थात महिला महागटग वृत्तांत!

Submitted by मी_आर्या on 9 January, 2012 - 06:38

नाही नाही...लगेच आयबीएनला नका विचारु. ते कळवण्याची तसदी आम्ही घेतली आहे. तर कुठे काय विचारता महाराजा....मायबोलीच्या महिलांचं महागटग पार पडलं सुद्धा.गम्मत नाहीये काही.. !
बरं मला सांगा, तुम्हाला कधी कुणी सांगितलं की मायबोली आयडी ’किश्या’ या वर्षात १६ महिलांना एकत्र आणण्यास कारणीभूत ठरणार आहे तर विश्वास ठेवाल? अर्थात हे गगोवर किश्याने बोलायच्या आधीपासुन ठरत होतं आणि त्याच अनुषंगाने शोभाने त्याला आव्हान दिले होते याचा त्याला पत्ताच नव्हता. Happy
मग काय सर्व महिला माबोकरणींना मेलामेली करून ठरलं की नुस्तं 'गटग' नै तर महागटग करायचं!महिलामहिलांच!!! या शुभकार्याचा मूहूर्त ठरला ०८ जानेवारी, २०१२........ अन अखेर काल उजाडला तो सोनियाचा दिनू! Happy

नेहा आणि राखी भल्या पहाटे ४.३० ला उठल्या. आणि ६.३५ ची इंद्रायणी पकडुन ९.००वाजता पुण्यात हजर झाल्या. आदल्या रात्रीच पुणे पोलीसांचा शिवाजीनगर परिसरात हाय ऎलर्ट जाहीर केल्याचे कळले होते. मुंबैहुन दोन अतिरेकी आणि ऑस्ट्रेलीयाहुन पुण्यात आलेला एक अतिरेकी पुणे बालगंधर्व परिसरात भेटणार आणि काही घातपाताची शक्यता असल्याचे आयबीएनचा निखिल वागळे घसा फ़ोडफ़ोडुन कोकलत
होता.सुमारे १०वाजेपासुन बसस्टॊपवर थांबुनही बस न आल्याने माझा पुतळा झालेला आणि तिकडुन शोभा फ़ोन करकरुन एकेक हार अर्पण करत होतीच. ११.३० वाजता बालगंधर्व इथे पोचले तर तिथे मागच्या गंधार्वविहारमधे हास्यस्फ़ोटांची मालिका सुरु असल्याचे निदर्शनास आले. जाउन पाहाते तर पुढीलप्रमाणे दृष्य होते.
१) माबोवर (एकमेकींशी नाही) कधीकधी कचाकचा भांडणा-या सुमारे १५-१६ माबोकरणींचा हशा
टाळ्य़ा प्रोग्रॆम सुरु होता.
२) या गटगची अजुन एक संयोजिका मनिमाउने आधीच प्रत्येकीचे पिवळ्या गुलाबाचे फ़ुल देउन स्वागत केले होते आणि सगळ्या सॆंडवीच कॊफ़ीवर यथेच्छ ताव मारत होत्या. .
३) हे सगळं इतक्या कमी वेळात आणि काहीच फ़ोनाफ़ोनी /मेलामेली न करता ठरले होते. फ़क्त एका इमेलवर एवढ्या बायकांनी प्रतिसाद दिल्याने व एकावेळेस जमणे अशक्य वाटत असतांना हे घडुन आल्याने, आयोजिका शोभाला अगदी गदगदुन वगैरे आले होते.
४) आतापर्यंत फ़क्त आंतरजालावर भेटलेल्या बायका प्रत्यक्ष भेटल्यावर जे होतं तेच झालं होतं. ओळखपरेड मधे,"’अगं तु ती आहेस होय”, वाटलं नव्हतं तु तीच असशील ई..ई. असे हास्यचित्कार ऐकु येत होते. .
५) स्निग्धाची मुलगी ’आर्या’ या गोड मुलीने सर्वांना चॉकलेट्स देउन वर ’खाऊ नका, दात किडतील" असा शालजोडीतला दिला होता.

यावर कहर म्हणुन की काय... मी लाजो आली समजुन मनिमाऊलाच गळाभेट घेतली. आणि मनिमाऊ समजुन स्निग्धाशी हातमिळवणी केली. Sad
१२.३५ झाले म्हणुन म्हणुन लिडर ’मनीमाऊ’ने सर्वांना ’श्रेयस’ कडे कुच करायचा आदेश दिला. बाकी सगळे गाड्यांवर पसार झाले आणि मी व शुभांगी घरच्याच असल्याने आणि आम्हाला 'जिव्हाळ्याच्या' गोष्टी बोलायच्या असल्याने पायी तिथे पोचलो. तेवढ्या १५ मिंटात आम्ही सर्व गप्पांचे धागे, त्यावर चाललेले विनोद, क्रमश: कादंब-या यांचा आढावा घेतला. "आणि आजकाल माबोवर नविन काही वाचणेबल लिखाणच नाही’ या नेहमीच्या निष्कर्षावर आलो.
हॊटेल श्रेयसला २-३ लग्नाची रिसेप्शन असल्याने अर्थात तुफ़ान गर्दी होती. थोडा वेळ तिथेही हास्यचित्कार उडवुन आपापल्या खुर्च्यांवर स्थानापन्न जहालो. तिथे आमचं खास स्वागत केलं गेलं. एवढंच नव्हे तर ''मायबोली महिला महागटग'' च्या नावाने टेबल चं स्पेशल बूकिंग होतं. थँक्स टू मणिमाऊ! Happy अस्सल पुणेरी मराठी पद्धतीचं जेवण मिळाल्याने पोटोबा खुष झाले सगळ्यांचे!
विशेष म्हणजे श्रेयसचा स्टाफ़ पुणेकर मराठी असुनही आदबशीर आहे. ते प्रत्येकीला ’मॅडम’ऐवजी ’ताई’ असे संबोधत होते.
DSCN1742.jpg

कोथिंबिर भात, छोले, अळुची भाजी, बटाटावडा, कोशिंबिर, बटाटाभाजी, दहीवडा,
डेझर्ट म्हणुन बासुंदी, फ़्रुटस्लार्ड, गुलाबजाम....

RSCN1751.jpgsweet.jpg

सर्वात शेवटी ’श्रेयस’कडुन स्पेशल विडे. आणि नंतर त्यांच्याकडुनच एक गिफ़्ट उकळुन बाहेर पडलो तेव्हा सर्वांचे 'अजगर' झाले होते. आता पुन्हा बालगंधर्वचा रस्ता धरला. मजल दरमजल करीत बालगंधर्व आल्यावर जी या गटगचे खास अ‍ॅट्रॅक्शन होती ती ’लाजो’बै तिच्या ’आदितीला’ घेउन आली. आणि पुन्हा ओळख परेड गप्पा, धम्माल!!! यात कोण नव्हतं? कट्टा, गगो, निग, पिंचिकरणी सगळ्यांनी झाडुन हजेरी लावली. गप्पांच्या धाग्यातल्या भिंती कधीच गळुन पडल्या होत्या. तिथले रुसवे फ़ुगवे,लटकी भांडणे, मुखवटे, तिथेच सोडुन सगळ्याजणी ’न भूतो न भविष्यति” अशा रितीने एकत्र आल्या होत्या.

पून्हा गप्पांची एक सर येऊन गेली........ आमची इकडे धम्माल सुरु असतांना लाजोची आदिती, शुभांगीची 'येशा' आणि योगुलीचा लेक यांचं मायक्रोगटग सुरु होतं! त्यांना 'भावी माबोकर्स' या नावाने गौरवण्यात आलं. तेवढ्यात कुणीतरी पचकलं की पण यांच्यातले ड्यु आयडी शोधायचं काम कोण करेल? Wink
एव्हाना तीन वाजले होते. टोकीला अन राखीला ३.३० च्या डेक्कन ने परतायचे होते....त्यामुळे गटग ची सांगता करत सगळ्याजणींनी भरल्या पोटाने नि भारलेल्या अंत:करणानी एकमेकींचा निरोप घेतला....पून्हा मुंबईत नक्की भेटायचे असं ठरवून आम्ही निघालो....आणि......."महिला एकजुटीचा विजय असो" या घोषणेने बालगंधर्वचा आस्मंत दणाणून गेला. यावेळ्च्या गटगची बेस्ट "टांगारु’म्हणुन ’अवल’ उर्फ़ आरती खोपकर ही मानकरी ठरली. सर्वात महत्वाचे म्हणजे रविवार असुन आणि नवरोबाला एकटं सोडुन टोकी, राखी मुंबैहुन येउन हजेरी लावुन गेल्या...त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक (शिरोडकरांचा नाही)!!!! पजो ने तिच्या या खास मेहमानलाच व्हायोलीन वाजुन दाखवल्याबद्दल तिचा णिषेढ आणि पुढच्या गटगला तिला व्हायोलीनशिवाय प्रवेश नाकारण्यात येइल.

विविध वयोगटातल्या, विविध फ्यामिली बॅकग्राऊंड असलेल्या , अन कायम जपता येतील
अश्या मैत्रीणी मिळाल्या....कधीही न विसरता येणारी आठवण गाठीशी बांधता आली....'' जिंदगी ना मिलेगी दोबारा'' असं म्हणत सर्वांनी यथेच्छ मजामस्ती केली!
हजर माबोकर्णी

शांकली
स्निग्धा
योगुली
शुभांगी-हेमंत
लाजो
प्रिती
प्रज्ञा १२३
शोभा
मनिमाऊ
सखीराधा
टोकुरिका
पद्मजा जोशी
राखी
अनुसया
मी_आर्या
आणि अजुन एक (नाव न सांगण्याच्या बोलीवर)

आणि मग वृत्तांत लिहिण्यासाठी माझी bali.jpg ही बनवुन एकेक करता सगळ्या जणी पसार झाल्या.

गुलमोहर: 

व्वा मस्तच लिहले...
खाण्यात तर कुठेच कंजुषी नाही केली..........:D
पुढल्यावेळेस माझ बुकींग नक्की...:स्मित:

हं! तरीच काल ट्रॅफीक ब्लॉक होते सगळीकडे!

लक्ष्मी रोड, तुळशी बाग व हाँगकाँग लेन येथील दुकानदारांनी धसका घेऊन (खरे तर हाय खाऊन) दुकाने बंद ठेवल्याचे समजले.

याच वेळी मायबोली पुरुष गटग कोथरुडमध्ये चालू होते व त्यात महिला गटगचा निषेध ठराव मांडण्यात आला आणि एक मोर्चा काढण्यात आला त्याचा वृत्तांत मी स्वतंत्रपणे देत आहे.

दिवे घेऊन ठेवा.

महिला गटग आयोजीत झाल्याबद्दल प्रचंड नवल व्यक्त करून व अभिनंदन करण्याची औपचारिकता करून थांबतो.

Happy

-'बेफिकीर'!

आर्ये, मस्त लिहिलस ग. खरच कालचा दिवस अविस्मरणीय झाला. राखी आणि नेहाच खरच कौतुक कराव तेवढ थोडच आहे. मनिमाऊने सर्वाच छानच स्वागत केल. लाजोने, आदितीच्या (हे नाव आदिती फक्त कानाताच सांगते :फिदी:)'शॉपिंग करायच्य" या गोड हट्टाला त्यापेक्षा गोड 'हो ' म्हणुन गटगला लावलेली उपस्थिती, महिला गटगची शक्ती ठरली.
स्निग्धाच्या 'आर्याने', मी काढलेल्या फोटोचे, केलेले परिक्षण अप्रतिम. शुभांगीच्या लेकीला "ही मोठी आहे" अस सांगायला ती विसरली नाही. योगुलीच्या लेकाने आपण अनुभवी फोटोग्राफर असल्याच सिद्ध केले. Wink
शुभांगीची कन्या शांत राहून आईला मदत करत होती.
या तिनही मुलांच खरच खूप खूप कौतुक.

शोभे, माझं नाही कौतुक केले?
>>>
ओ बै, त्यासाठी याव की माणसान कधीतरी वेळ काढुन Happy

वरच्या फोटोत कोण कोण आहे ते लिहा की मला फक्त पजो आणि नेहाला ओळखता आलं
>>>>>>कोणीही कुणाचही नाव सांगायच नाही आहे.

"आणि आजकाल माबोवर नविन काही वाचणेबल लिखाणच नाही’ या नेहमीच्या निष्कर्षावर आलो.

अरारा!! बेफिकीर यांचा वैयक्तिक अपमान!

अहो त्यांच्या विबासं च्या गोष्टी, अनेक भागात प्रसिद्ध झालेल्या कादंबर्‍या, शिव्या देणार्‍या बायकांच्या गोष्टी यातले काहीच वाचण्याजोगे नाही???
आणि इतरांनी लिहीलेल्या एव्हढ्या भाराभर कविता? नि विडंबने नि दुर्गभ्रमणाच्या रोमांचकारी कहाण्या?
च्च, च्च!

अर्थात मी स्वतः यातले काहीच वाचत नाही, पण तुम्हाला पण वाचावेसे वाटत नाही?

जाउ द्या झाले, आजकाल मराठी कोण वाचतो, (किंवा वाचते), त्यापेक्षा इंग्रजी पुस्तके कित्ती छान!! नि आणखी
तमीळ, फ्रेंच, जपानी असल्या भाषातले वाङ्मय म्हणजे काय विचारता? समजायला बुद्धीच पाहिजे, असे म्हणायचे. (भाषा येत नसली तरी चालते, परीक्षा कोण घेणार?)

Light 1

छान.

कोथिंबिर भात, छोले, अळुची भाजी, बटाटावडा, कोशिंबिर, बटाटाभाजी, दहीवडा,
डेझर्ट म्हणुन बासुंदी, फ़्रुटस्लार्ड, गुलाबजाम....
>> हे नक्की कोठे वापरावे? जेथे लिहिलय त्याच्या वरच्या फोटो साठी की खालच्या?

विशेष म्हणजे श्रेयसचा स्टाफ़ पुणेकर मराठी असुनही आदबशीर आहे. >>>>>

या विधानाचा तीव्र निषेध Angry

दिवेबिवे देणार नाही. सरळ निषेध!

सचिन_ | 9 January, 2012 - 18:13
छान.
कोथिंबिर भात, छोले, अळुची भाजी, बटाटावडा, कोशिंबिर, बटाटाभाजी, दहीवडा,
डेझर्ट म्हणुन बासुंदी, फ़्रुटस्लार्ड, गुलाबजाम....

>> हे नक्की कोठे वापरावे? जेथे लिहिलय त्याच्या वरच्या फोटो साठी की खालच्या?

सच्या Rofl Rofl Rofl Rofl

आर्या, सहीच. हा तु आणि नेहाने मिळुन लिहिलेला वृतांत ना. झकासच. Happy आणि वरचा तुमचा सगळ्यांचा मी काढलेला फोटो तर अत्युत्कृष्टच! वा वा ! काय फोटो आहे. Wink

वृत्तांत अपुर्ण आहे बरं का. तुम्ही गेल्यावर मी, शुभा, येशा आणि पजो आम्ही परत कॉफी प्यायला गेलो. येथेच्छ गॉसिप केलं, जे करायचं राहुनच गेलं होतं. Wink भरपुर गप्पा मारुन मगच आम्ही टळलो. सगळ्यात कौतुक शुभाच्या येशाचं. काय पोरीकडे पेशन्स आहेत. एकदाही 'आई बोअर झालं. घरी कधी जायचं?' म्हणाली नाही. बहुतेक ती पण आमच्या गप्पा एंजॉय करत होती. Happy भलतीच गोड आणि सुंदर पोरगी आहे. शुभी, पुढच्या गटगला आपल्या प्लॅनप्रमाणे तु तिला माझ्याजवळ उभी करु शकतेस. Proud

सचिन, सपचा ना तु? शेवटी पुणे ३०पणा दाखवलास ना? Angry Lol

मने Lol

Pages