ती........

Submitted by वैवकु on 5 January, 2012 - 07:17

स्वप्नवेडी जाग होती ती
पेटलेली आग होती ती

चेतनांनी काढलेला तो
वेदनांचा माग होती ती

प्राण जेथे आहुती झाला
जिंदगानी याग होती ती

वेगळा पर्याय होता का
फक्त जगणे भाग होती ती

हासण्याचा मोह झालेली
आसवांची बाग होती ती

राधरंगी रंगला काळा
कृष्णभोळा फाग होती ती

--------------------------------------------------
फाग= रंग खेळणारी टोळी जी गाणी म्हणते ती अशी गाणी ;जी कृष्णभक्तीत रंगलेली असतात.
(हा शब्द एका ओंन-लाइन मराठी शब्दकोशातून शोधला आहे .)
-----------------------------------------------------

गुलमोहर: 

जुनी गझल पुन्हा वर आणतोय .....
यापूर्वी एकच प्रतिसाद आला आहे. आणखी प्रतिसादांच्या प्रतीक्षेत........

आपला...........
-वैभव वसंतराव कुलकर्णी

चेतानांनी - याचे चेतनांनी असे केल्यावर टायपो नष्ट व्हावा

बाकी गझल ठीकठाक

मात्रः

वेगळा पर्याय होता का
फक्त जगणे भाग होती ती

हासण्याचा मोह झालेली
आसवांची बाग होती ती>>

हे शेर मस्तच, अभिनंदन

अवांतर - विठ्ठल कुठे गेला यावेळेस?? त्याच्या जागी कृष्ण आला म्हणजे विठ्ठलाच्या एकपत्नीव्रतातील नीरसता गझलेला शोभेलशी नाही हे जाणवले का? Lol

-'बेफिकीर'!

विठ्ठल( काळा ) - एकपत्नीव्रत...........?
अहो बेफिजी ,मला वाटतंय तुम्ही कधी विठ्ठलाला भेटला नसाल.... एकदा याच पंढरपूरला! इथे त्याच्यासोबत रुक्मिणीशिवाय सत्यभामा आणि राधीकासुद्धा नांदतायत. त्यांचीही मंदीरं आहेत इथं .

टायपिंगची चूक सुधारली आहे.

अहो बेफिजी ,मला वाटतंय तुम्ही कधी विठ्ठलाला भेटला नसाल.... एकदा याच पंढरपूरला! इथे त्याच्यासोबत रुक्मिणीशिवाय सत्यभामा आणि राधीकासुद्धा नांदतायत. त्यांचीही मंदीरं आहेत इथं .>>>>>

अन हे तुम्हाला चालतं? Proud