काळाचे रहस्य

Submitted by स्वाती मोरे on 4 January, 2012 - 01:32

श्रीराम आणि रावण युद्धाचा शेवट..

घायाळ झालेला रावण शेवटच्या घटका मोजत होता.

आणि इकडे रामाच्या छावणीत श्रीराम लक्ष्मणाला सांगत होते की, त्वरीत रावणाकडे जा आणि त्याचे शिष्यत्व पत्करून 'काळाचे रहस्य' आत्मसात कर! रामाच्या त्या बोलण्याने संभ्रमित झालेल्या लक्ष्मणाला शेवटी रामाने अक्षरश: आज्ञा केली की, हे लक्ष्मणा, शिघ्रता कर अन्यथा रावणाच्या अंता बरोबरच ते रहस्य सुध्दा कायमचे अंत पावेल.

मरणासन्न रावणाने सुध्दा काही आढेवेढे न घेता, आपल्याकडे आलेल्या लक्ष्मणाची विनंती स्विकारली.

त्याने लक्ष्मणाला सांगितले की त्वरीत पिंपळाची तीन पाने अन एक टोकदार काडी घेऊन ये. लक्ष्मणाने तसे केल्यावर रावणाने पुन्हा सांगितले, आता ते तीनही पाने एकावर एक ठेव आणि एका झटक्यात ती काडी त्या पानांवर आरपार खोच. लक्ष्मणाने तसे केले आणि काय आश्चर्य, काडीचे टोक ज्या पानातून प्रथम स्पर्ष करून गेले ते सोन्याचे झाले, दुसरे रुप्याचे झाले अन तिसरे आहे तसेच राहीले.

रावण म्हणाला, हे आहे काळाचे रहस्य. क्षणमात्र जरी विलंब झाला तरी सोन्याचे रुपे होते. म्हणून जो क्षण हाती लागेल त्याचा क्षणमात्र ही विलंब न करता 'सोने' कर

गुलमोहर: 

मंडळ आभारी आहे तुमचे सर्वांचे
मी नवीन च आहे ग्रौप मध्ये सांभाळून घ्या
आणि बेफिकारी तुमच्या कविता आणि लेख सुपर असतात मी तुमची फ्यान आहे

आणि बेफिकारी तुमच्या कविता आणि लेख सुपर असतात मी तुमची फ्यान आहे>>>>>

चालेल चालेल, व्हा फॅन! माझे 'असंख्य' फॅन्स आहेत असे ऐकून आहे. पण नांव 'बेफिकीर' असे लिहावेत. Happy

छान Happy

खूप चांगली बोधपर गोष्ट आहे.
उचलेगिरी असणार असं वाटलंच. कारण त्यांच्याच आधिच्या लेखा ---- वास्तव ( किंमत )..... --मधे शुध्दलेखनाच्या इतक्या चूका आहेत आणि इथे अजिबात नाहीत. इथल्या प्रतिसादात मूळ रुप उघड झालंच आहे. शुध्दलेखन नाही पण कॉपी पेस्ट मात्र चांगलंच जमतय बर्का स्वतिताई !

राम इंदुलकर>>>>>>यांचे आभार मानुया,चांगल्या लेखासाठी.
स्वति मोरे>>>>आता यांचेही मानुया,लिंक देण्यासाठी.

ithe mahtav changlya goshty karnyat ahe ka copy pest madhe, mala avdalele lekh mi ithe takale ahet maa vatal tumhala hi avdel pan tumhala tyat kami interest disat ahe ani chuka kadhnyat jast

स्वति मोरे......मायबोलीवर तुमचे स्वतःचे लेखन अपेक्षित आहे. दुसर्‍या कुणाचे आवडलेले लेख तुम्ही जर इथे टाकत असाल तर तसा उल्लेख करणे आवश्यक आहे.
वाईट वाटू देऊ नका, तुम्ही माबोवर नविन आहात म्हणुन माहिती दिली.

छान आहे गोष्ट.

नवीन लेखन करण्यासाठी नवा किंवा जुना सभासद जेव्हा 'नवीन लेखन करा' वर क्लिक करतो तेव्हा खालिल माहिती दिसते.

नवीन लेखन करा
मायबोलीवर लेखनासाठी वेगवेगळे विभाग आहेत. आपण या अगोदर मायबोलीवर लेखन केले नसेल तर आधी या विभागांची माहिती करून घ्या.

हितगुज-ठिकाणाप्रमाणे
तुमच्या गावातल्या मायबोलीकरांबरोबर गप्पा मारण्यासाठी. विविध ठिकाणांबद्दल लेखन करण्यासाठी. ग्रूपमधे लिहण्यासाठी त्या ग्रूपचे सभासद व्हा.

हितगुज-विषयाप्रमाणे
विविध विषयांवर लेखन करण्यासाठी. एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी. आधारगटामधे लिहण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी. ग्रूपमधे लिहण्यासाठी त्या ग्रूपचे सभासद व्हा.

गुलमोहर/साहित्य लेखन
कथा, कविता, कादंबरी, ललित, लेख, विनोदी या सर्व प्रकारांसाठी. तसेच आपली चित्रकला, फोटोग्राफी तसेच इतर कलांसाठी हा लेखन प्रकार निवडा. येथे फक्त स्वत:च्या मराठीत लिहिलेल्या कलाकृती/ लेखन सादर कराव्यात.

त्यात येथे फक्त स्वत:च्या मराठीत लिहिलेल्या कलाकृती/ लेखन सादर कराव्यात.
हे स्पष्टपणे लिहिलेले आहे. ते लक्षात ठेऊन लेखन करावे.