शेवटचं पत्र

Submitted by कविन on 30 December, 2011 - 05:47

"शर्वरीने आत्महत्या केलेय.." वाक्य कानावर पडलं पण मेंदूपर्यंत पोहोचायला अजून काही काळ जावा लागला.

"का केली असेल? सगळं तर चांगलच घडत होतं तिच्या बाबतीत. आता एक प्रमोशन पण ड्यु होतं. लवकरच तिच्या आणि रोहनच्या लग्नाचं पक्कं होणार होतं. सगळं तर चांगलं होतं. मग का? का घेतला असेल तिने हा निर्णय."

पहिल्या धक्क्यातून ती जऽऽरा कुठे सावरतेय न सावरतेय तोच तिच्यावर पुन्हा एक घाव झाला.

"रोहनला वाटतय तू जबाबदार आहेस ह्या सगळ्याला"

"काऽऽय? बरा आहे ना तो? मी? मी काऽऽ? आणि कशाला?" पुढचं सगळं बोलणं तिच्या हुंदक्यामधे विरुन गेलं.

"तुला माहितेय ना निमा, मीच तर खटपट लटपट करुन त्यांच्या लग्नाला घरच्यांचा होकार मिळवून दिला. आणि तरिही...." तिला पुढे बोलवेना. निमाने फक्त थोपटलं तिला.

तशीच डोक्याला हात लावून ती सोफ्यावर बसून राहिली.

खोलीतल्या अंधाराला धरुन तशीच मुटकुळं करुन बसली. रोहनला भेटायला हवं, तिला वाटलं.

"त्याला खरच असं वाटलं असेल? मी जबाबदार आहे म्हणून? पण का? हेच ओळखलं का त्याने मला?" प्रश्नच प्रश्न सगळे.

"आपल्याला तरी कधी वाटलेलं का कधीतरी आपली सर्वात लाडकी शर्वरी असं काही पाऊल उचलेल म्हणून? आणि रोहन? तो तर किती भिस्त ठेवून होता आपल्यावर" तिच्या मनात आलं.

"माणसाचं मन अजब कोडं आहे जे सुटलं असं भासतं फक्त प्रत्यक्षात सुटतच नाही" गेल्याच भेटीत निमा तिला म्हणाली होती.

"रोहन.. ह्म्म रोहनला भेटायला जायला हवं. आत्ता ह्याक्षणी. बाहेर बदाबदा पाऊस कोसळतोय, पावसाळा तर केव्हाच सरला आता वर्षही सरत आलय. पण ह्या अवेळीच्या पावसाने समोरच्या वाटेचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. वाट कुठुन सुरु होते नी कुठे जाते हे सराईतालाही पटकन कळणार नाही इतपत बदलाय. तरिही जायला हवं." तिच्या मनात आलं तशी मनावरची अंधारी बाजुला सारुन ती लगबगीने उठली. तोंडावर पाणी मारुन जरा तरतरी आणायचा प्रयत्न केला तिने. आणि तरातरा आहे त्याच अवतारात निघाली बाहेर.

डोक्यावरच्या छत्रीचा फारसा उपयोग नाहीये हे कळून छत्री मिटली आणि आतबाहेरच्या पावसात तशीच भिजत चालत राहिली.

"कदाचित हि बातमीच खोटी असेल. तिला काहीही झालं नसेल. मी जाईन तेव्हा ती दोघेही समोर येऊन पटकन म्हणतील मला - ताई इतक्या पावसात काय असं महत्वाचं काम निघालं तुमचं? एक फोन करायचात ना आम्ही आलो असतो की दोघेही."

"पण असली मस्करी कधी कोणी करत नसतं. निदान निमा तर नक्कीच नाही करणार. निमाला मी चांगलं ओळखते" तिच्या मनात आलं.

"पण ओळखत तर मी शर्वरी रोहनला ही होते! " लख्खकन काहीतरी मनात चमकून गेलं.

सुक्ष्मसी कळ उठली हृदयात. ती तशीच पुढे चालत राहिली वाट शोधत.. कधीतरी पोहोचली तिथे.. त्यांच्याघरी.

ती कितीवेळ तिथे बसली, काय बोलली, कोण कोण होतं काऽऽही आठवत नव्हतं तिला. रोहन होता का? बोलली का ती त्याच्याशी? कशी आली परत इतक्या रात्री पावसातून? तिलाच आठवत नव्हतं. फक्त . ह्म्म एक पत्र तेव्हढं कोणितरी आणुन हातात दिल्याचं आठवलं तिला.

तशिच तिरमिरीत उठली आणि ओलचिंबं झालेलं पत्र हातात घेऊन आली बाहेर.

बसुन राहिली अंदाज घेत, काय असेल त्यात ह्याचा.

"रोहन तुला जबाबदार धरतोय ताई" निमा म्हणाली होती त्या दिवशी.

"खरं तर नसेल? तेच असेल का पत्रात?" तिला पत्र उघडायचा धीरच होईना.

कसंबसं भरकटणाऱ्या विचारांना लगाम घालून, कोलमडू पहाणाऱ्या मनाला थोपवुन थरथरत्या हाताने तिने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली.

पावसाने बर्‍याच ठिकाणी शाई एकमेकांत मिसळून गेलेली. ती तरिही जुळवून जुळवून वाचत राहिली.

"प्रिय ताईस," ह्या संबोधनावरुन हात फिरवताना उगाचच शर्वरीचा स्पर्श जाणवल्यासारखं वाटलं तिला.

"ताई, कंटाळा आला ग असं तिष्ठत रहाण्याचा. पुढचा रस्ता दिसत नाही. तू ही अशी बिझी होऊन गेलीस. असं अर्धवट पुढे काय होईल आणि कधी होईल ह्याची नुसती वाट बघत रहायचं? मला तरी जमत नव्हतं. घुसमट होत होती माझी.

रागवू नकोस पण त्यादिवशी तू पटकन बोलून गेलीस "सगळी अर्धवट राहिलेली कथानकं तू स्क्रॅप मधे काढणारेस. पुढे काहीच सुचत नाहीये" मग आमचं काय? तू डिलिटचं बटण दाबलस की आम्ही पण हवेत विरुन जाणार ना? मग कर तरी एकदा तुझ्या मनासारखं. पण आज करेन पुर्ण, उद्या करेन पुर्ण कथानक म्हणत किती दिवस असं एकाच ठिकाणी बांधुन ठेवलयस आम्हाला. समोर संपुर्ण अंधार.. वाट आहे की नाही माहित नाही. वर्तमान काळच फ्रिज करुन टाकलास आमचा मग भविष्याची काय स्वप्न बघणार आम्ही?"

तुझा किती जीव आहे माझ्यावर ते फक्त मलाच माहितेय ताई. पण आता खरच संपलेय ग शक्ती माझी वाट बघण्यातली. म्हणून मी तू डिलिट करण्याची वाट न बघता आज स्वत:च डिलीट करतेय स्वत:ला.

रोहनला जप आणि काळजी घे स्वत:चीही.

नवीन वर्षी नवीन संकल्पना सुचोत तुला, अशा शुभेच्छा.

सगळ्यांनाच माझ्यातर्फे शुभेच्छा सांग.

स्पेशली नंदिनीला सांग, रेहानला माझ्यासारखीच निराशा यायच्या आधी लक्ष दे त्याच्याकडे. साजिरालाही सांग अर्धवट लिहून काढलेल्या कादंबरी कडे लक्ष द्यायला. बाकीच्याही अर्धवट कथानकं सोडलेल्यांना सांग मनावर घ्यायला नाहीतर आहेच माझ्यासारखा शेवट.

तुझीच,

शर्वरी

--------------

गुलमोहर: 

कवे Proud

Lol

मस्त.
जरा संबंधितांनी दखल्घेतली तर बरं होईल.
मी त्यांच्या विपूत रिक्षा फिरवू का?

Lol
रैनाची अन्वाणी गेनु, शोनूची वर्षाची गोष्ट, टण्याची वारी हे पण आहेत त्यात.

आशिष दामलेंचे अफगाण डायरी पण असेच अर्धवट राहिलेले प्रकरण.

कवे, काय गं...
Lol

नंदिनीची मोरपिसे आणि
रैनाची अन्वाणी गेनु, शोनूची वर्षाची गोष्ट, टण्याची वारी
यांच्या स्थानाशी इतर कोणीच पोचू शकत नाहीत या बाबतीत Proud

आयला हे तर भलतच धक्कादायक प्रकरण निघाले. एवढा ट्विस्ट तर मायबोलीवरच्या रहस्यकथांमध्येपण नसतो. Lol
कविता I hate you Proud

कवे Proud

सरल्या वर्षात सुचलेली छान कल्पना कविता Wink आवडली.

शर्वरीने मायबोलीला भारंभार लिखाणापेक्षा कसदार लिखाण येण्यासाठी शुभेच्छा द्यायला हव्या होत्या असं राहून राहून वाटतंय. Wink

देवा!!! कसलं सीरीअसली वाचलं मी!

केवढं सूचक, शालजोडीतलं, बादरायण इ संबंधांवर लिहिता हो तुम्ही!!
Proud

मंजूडी +१ Happy

Pages