(प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली

Submitted by पाषाणभेद on 29 December, 2011 - 15:41

तुझी माझी प्रित जमली

तो:
दे हातात तुझा मला हात सजणे
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
दे हातात तुझा मला हात साजणा
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
लपून छपून प्रेम ते केले
कधी कुणा नाही कळले
आता वाट नको पाहू
वेळ लग्नाची झाली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

तो:
कानी तुझ्या ग डूल डुले
पायी पैंजण रुणझूण बोले
गाली लाली येण्याची
वेळ जुळूनी आली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
तू या शेताचा रे राजा
येथेच आण तू बँडबाजा
तुझ्या राणीची वरात
मला स्वप्नात दिसली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

तो:
घराची होशील तू ग राणी
कसा राहू तुजवाचूणी
नको जावू आता दुर
तारीख लग्नाची ठरली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

तो:
दे हातात तुझा मला हात सजणे
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
दे हातात तुझा मला हात साजणा
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

- पाभे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जबरदस्त !!! सजणा व सजणे बरोबर हातात हात देण्याचे यमक जुळते तर आणखी मजा आली असती.
उदा: दे हातात तुझा मला हात सजणे
घटिका जवळ आली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //: