ऑरेंज शिरा

Submitted by राजुल on 27 December, 2011 - 01:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराची सोललेली संत्री, १ वाटी रवा, १ वाटी दूध, १ वाटी पाणी, १ वाटी साखर,२ लवंग,
बेदाणे-काजू तूकड १ चमचा, कणभर मीठ, २ ते ३ चमचे तूप, १ चमचा केशर सीरप

क्रमवार पाककृती: 

तूप गरम करून त्यात लवंग, काजू , बेदाणे तळून काढून ठेवणे. त्याच तूपात बारीक गॅसवर रवा गुलाबी रंगावर भाजून घेणे.रवा भाजल्याचा सुगंध दरवळसपर्यंत भाजणे. नंतर त्यात संत्र्याचे तुकडे टाकुन मस्त हलवून घेणे.दुध, पाणी एकत्र उकळवून घेणे, त्यात केशर सिरप घालावे आणी हे पाणी गरम रव्यावर ओतुन दोन वाफा काढाव्यात. मग साखर व कणभर मीठ घालुन एक वाफ काढावी. साखर विरघळल्यावर लवंग, काजु, बेदाणे टाकुन व्यवस्थित हलवून घेणे. ऑरेंज शीरा तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
माहितीचा स्रोत: 
माझाच प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो दिनेशदा, आज सहजच सकाळी पहिल्यांदा केला, घरी संत्री होती म्हणून.रंग आणी स्वाद अप्रतीम Happy फक्त सकाळच्या घाईच्यावेळेत फोटो नाही काढू शकले.

मस्त पा़.कृ.
केळं किंवा अननस टाकुनही करतात शिरा.<<
हो सत्यनारायणाच्या पुजेच्या प्रसादात केळी टाकलेली असतात, व प्रसाद लागतेही छान.

छान