लिंबाचे उपवासाचे लोणचे

Submitted by प्रिति १ on 24 December, 2011 - 10:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६ लिंबु, १ छोटी वाटी साखर, अंदाजे मीठ, १/२ चमचा तिखट, आवडत असल्यास थोडेसे जिरे.

क्रमवार पाककृती: 

६ लिबे चांगली धूऊन पुसुन घ्यावीत. त्याच्या नेहमीप्रमाणे १ लिंबाच्या ८ याप्रमाणात फोडी कराव्यात.
नंतर त्यात साधारण १ चमचा मीठ, १ छोटी वाटी साखर घालुन मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. नंतर
१५ दिवसांनी त्याला रस सुटलेला दिसेल. फोडी चिरतानाच त्यातील सगळ्या बिया काढुन टाकाव्यात.
व १/२ चमचा तिखट घालुन ते सर्व मिश्रण मिक्सर मधुन काढुन घ्यावे. अगदी चटणी वाटल्याप्रमाणे
बारीक करुन घ्यावे.झाले मस्तपैकी उपवासाचे लोणचे तयार. आंबट-गोड असल्यामुळे लहान मुले पण
आवडीने खातात. व संपुर्ण वाटल्यामुळे लिंबाची साले पण वाया जात नाहीत.
फक्त १ काळजी घ्यावी लागते कि एखादी बी जर राहीली तर ते कडु होण्याची शक्यता असते. म्हणुन
काळ्जीपुर्वक सगळ्या बिया काढाव्यात. उपवासाला खिचडीबरोबर छान लागते.
अगदीच १५ दिवसांनी जमले नाही तर १ महिन्यांनी जरी मिक्सरमधुन काढले तरी चालते. नंतर फ्रिज मधे
ठेवावे. जसे जसे मुरेल, तसे सुंदर लागते.

वाढणी/प्रमाण: 
अगदी थोडे थोडे लागते.
माहितीचा स्रोत: 
माझी सुग्रण आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याला आपण लिंबाचा सौस पण म्हणु शकतो. १० मिनिटे हा पहिल्यांदा लागणारा वेळ आहे.
नंतर मिक्सरमधुन काढायला पण १० मिनिटे लागतात. तेव्हाच आवडत असल्यास थोडे जिरे
घालता येते.

माझंही लहानपणापासूनचे आवडते लोणचे. पण मी मिक्सरमधून काढत नाही.
(त्यामूळे बिया राहिल्या तरी चालतात.)
आणि १५ दिवस कुठला मला धीर, मुरलं का बघू या, असं म्हणत ७/८
दिवसानीच खायला सुरवात होते. घरी केलं तर साखर प्रमाणात घालता येते.
विकतच्या लोणच्यात भरमसाठ साखर असते.

प्रिती१, छान आहे गं! कधी केलेयंस! डब्यात घेऊन ये, चव कशी झालेय ते तिथेच सांगते. Happy