घाण्याचा बैल

Submitted by harish_dangat on 23 December, 2011 - 23:54

घाण्याचा बैल मी
फिरतो गोल गोल
चार लोकात मिरवीतो
माझ्या कर्माच ढोल

रंगीबेरंगी कपडे
जशी बैलाशी झूल
त्यात लपवून जखमा
भल्याभल्यास देतो हूल

धन्याचा इमानी मी
दिवसातून दोन घास
इतर वेळी घेतो मी
मानेवर ओझ्याचा त्रास

रोज फिरतो गोल गोल
जसा घड्याळाचा काटा
छोट्या परीघात माझ्या
अडकल्या सार्‍या वाटा

-हरीश दांगट

गुलमोहर: 

छान..