शब्दगाऽऽरवा २०११चे प्रकाशन झाले आहे.

Submitted by प्रमोद देव on 22 December, 2011 - 21:46

जालरंगचा हिवाळी अंक ’शब्दगाऽऽरवा २०११’चे प्रकाशन झाले आहे,तेव्हा वाचकांना/श्रोत्यांना आवाहन आहे की त्यांनी त्यातील साहित्याचा आनंद मनमुराद लुटावा..पसंती/नापसंतीची अशी कोणतीही प्रतिक्रिया द्यावीशी वाटल्यास जरूर द्या...आपल्या प्रतिक्रियांतूनच आम्हाला आम्ही केलेल्या कामाची पावती मिळत असते...तसेच मार्गदर्शनही होत असतं.
http://hivaaliank2011.blogspot.com/ हा दुवा तुम्हाला अंकाकडे नेईल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Happy

अंकाचं स्वरूप खूपच आवडलं. मुखपृष्ठ छान आहे . वेबसाइटसारखंच रूप दिलंय कि ब्लॉगला..
एकंदरीतच देखणा अंक आहे खूप !! Happy

ख्रिसमस संपला कि निवांत वाचन करता येईल. खाणच आहे इथं तर !!

मनापासून अभिनंदन हो काका !!

काका, धन्यवाद ! व अभिनंदन !
कविता वाचून, व ऐकून झाल्या. छानच आहेत. पद्मजाच पण अभिनंदन. मस्त झालाय अंक.

देव साहेब, या सर्वांगसुदर अंकाबद्दल धन्यवाद.
फक्त मला या अंकाच्या वाचकांच्या नजरेला खालील गोष्ट आणायची आहे- सध्या सावरकरांना देशद्रोही व समाजद्रोही ठरविण्याची नवी मोहीम चालू आहे. ही मोहीम राबविणारे लोक अगदी खेड्यापाड्यात पोचले आहेत. ते हे सर्व जाणून बुजून करीत असल्याने त्यांना उत्तरे देण्यात शक्ति खर्च करण्यात अर्थ नाही. मी ८ जुलै २०१० ला 'अष्टविनायकदर्शन ' ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवर लिहिलेली २८ पानी पुस्तिका स्वखर्चाने सोलापूर येथे प्रकाशित करून विनामूल्य वाटली. तरुण मुलांना तासाभरात वाचता येईल अशी ही पुस्तिका सावरकरांचे जीवन, कार्य आणि विचार यांचे दर्शन अगदी थोडक्यात घडविते. तसेच त्यांच्या कणखर व्यक्तीमत्वाचेही दर्शन घडवील.या पुस्तिकेचे अगदी संक्षिप्त वाचन मी या हिवाळी अंकात आपल्या पर्यंत आणण्याचा देवसाहेबांच्या सहकार्याने प्रयत्न केला आहे. माझे वय ७२ असल्याने माझे उच्चार नातवाच्या उच्चाराइतके स्पष्ट वाटत नाहीत याची मला जाणीव आहे. तरीही वाचकांनी ते वाचन गोड मानून घ्यावे ही विनंति.
या पुस्तिकेचेच मी फेब्रुवारी २०११ मध्ये इ-बुक केले आहे, हे विनामुल्य इ बुक डाउनलोड करून सावरकराना अभिवादन करावे असे मी आवाहन करतो.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवर लिहिलेले 'अष्टविनायकदर्शन ' हे इ बुक खाली दिलेल्या लिंक वर जाऊन विनामुल्य डाऊनलोड करून घेता येईल.त्यात ४० पाने आहेत व त्यामध्ये ४१ फोटो आहेत. तरुण मुलांना तासाभरात वाचता येईल.
http://www.bookganga.com/eBooks/Books?FEB=1
चौदावे पुस्तक "अष्टविनायकदर्शन" हे आहे. click on VIEW DETAILS. click on DOWNLOAD. click on DOWNLOAD to download the Free ebook reader. इ-बुक रिडर मधून हे इ बुक मग डाऊन लोड करून घ्यावे.

अंक चाळलाय आत्ता वरवर. बरेच वैविध्य आहे वाचायला. हिवाळी अंकाची कल्पना तर आवडलीच होती, तिची अंमलबजावणीही आवडली. Happy