"फक्त चढ म्हणा" :क्षणचित्रे -अंतिम भाग

Submitted by Yo.Rocks on 20 December, 2011 - 12:50

फक्त चढ म्हणा: क्षणचित्रे: भाग १
http://www.maayboli.com/node/31250

- - - - -- - - - -- - - -

मदनचा पॅच रोपच्या आधारे सर केला तरी पुढची चढाईदेखील तितकीच जोखमीची.. पुढची वाटेत लागणार्‍या काही भक्कम तर काही तुटक्या अवस्थेतील लागणार्‍या पायर्‍या मस्तच.. थंडगार सुटलेला वारा, डोळे बारीक करायला भाग पाडणारे उन आणि चढताना 'तुला कॅच करू का' म्हणणारी दरी... ! जरा इकडे तिकडे झाले की कोसळलात दरीमध्ये.. याचकारणास्तव तर अलंग-मदन हे ट्रेकींगमध्ये 'अत्यंत कठीण' श्रेणीत गणले जातात.. 'फक्त चढ म्हणा' चा मंत्र पुटपुटत आगेकूच करणारे मायबोलीकर्स !

प्रचि १:

प्रचि २:कुठे मी आलो ! (या माझ्या मित्राचा पहिलाच ट्रेक होता.. त्याला कल्पना दिली होतीच तशी तरीपण इतकी उंची व खोली पाहून थक्क झालाच.. पण डगमगला जराही नाही..)

प्रचि३: मायबोलीचे इंद्रदेव

प्रचि ४: अवाढव्य 'केक' सारखा वाटणारा कुलंग

प्रचि ५: मदन व कुलंग मधील या कातळाला गावकरी 'पलंग' म्हणतात !

प्रचि ६: या मदनवरूनच दिसणारा नजारा..

प्रचि ७: आणि हा एका नजरेत मावणारा शेजारचा 'अलंग' जिथे आम्ही रात्रीस मुक्कामाला जाणार होतो..

प्रचि ८: मदन पॅच चढलो.. आता उतरण्याची पाळी.. मायबोलीकर सुन्या माझ्या मित्राला नटवताना..

प्रचि ९: बाय बाय मदन !

मदन चढून उतरून झाला आता वळालो अलंगकडे.. फक्त चढच म्हणा !

मोठा अंदाजे ९०फुटी रॉक पॅच लागण्यापूर्वी एक छोटा पॅच लागतो.. जणू काही मुख्य सामन्यापुर्वी सरावच ! फारसा कठीण नाहीये पण सवय नसणारे चाचपडतात..

मायबोलीकर्स निघाले अलंगच्या दिशेने..
प्रचि १०: छोटा पॅच

प्रचि ११: अलंगवरील चढाईचे मुख्य आकर्षण.. ! अंदाजे ९० फूटी रॉक पॅच...एक बरे झाले रोपची लॅडर लावली होती.. नाहीतर चांगलाच घामटा निघाला असता..

(मायबोलीकर आनंद काळे)
- - -
प्रचि११ अ

(रोहीत एक मावळा - सौजन्य गिरीविहारचा कॅमेरा, फोटोग्राफर - इंद्रा)

- ----
प्रचि ११ बः


(गिरीविहार चढाईमध्ये प्रयत्नशील - सौजन्य: गिरीविहारचा कॅमेरा, फोटोग्राफर - इंद्रा)

मदनप्रमाणेच इथेही पॅच सर केल्यावर पायर्‍या आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात.. पण इथल्या पायर्‍या म्हणजे निव्वळ थरारक.. डोळे पांढरे करून टाकणार्‍या...

प्रचि १२: सावरुन बावरून बसलेले कटटयाचे मालक 'विनय भीडे' !!

प्रचि १३

प्रचि १४: चंद्रग्रहणाचा उगवता चंद्र !

प्रचि १५: ये श्याम कुछ अजीब होती है !

प्रचि १६ :

गडावर, इतक्या उंचीवर आल्यावर न चुकवण्यासारखे असे काही असेल तर सुर्योद्य.. नि:शब्द करुन टाकणारे दृश्य पाहताना दंग होउन जातो..

प्रचि १७: सुर्योद्यापुर्वीचे पुर्वेकडील क्षितीज..आणि आमचा रोहीत एक मावळा

प्रचि १८: अजुनही साखरझोपेत भासणारे डोंगर नि जलाशय..

प्रचि १९: लवकरच पुर्वेकडील क्षितीजाच्या कपाळावर कुंकू उमटले..

प्रचि २०: मग जाग येते जलाशयातील पाण्याला.. सोनेरी रंग उमटतो तेव्हा

प्रचि २१: या अलंगवर पाण्याच्या टाक्या बर्‍याच आहेत.. त्यातलीच एक..

प्रचि २२: सुर्योद्य आटपला की मोर्चा साहाजिकच चुलीकडे.. चहानाश्त्यासाठी..

४८०० फुट उंचीवरचे किल्ले चढून पुरे झाले.. आता वेळ सरसर खाली उतरण्याची..

प्रचि २३:

(मायबोलीकर प्रणव कवळे, सौजन्यः कॅमेरा- गिरिविहार, फोटुग्राफर - अस्मादीक)

प्रचि २४: चढा-उतरीचा खेळ संपला.. आणि वाट बघायची गाडीची..

प्रचि २५

# सविस्तर वृत्तांत इंद्राने इथे लिहीलेला आहे..
http://www.maayboli.com/node/31288

गुलमोहर: 

मस्त!

एक्दम थरारक्......प्रचि ११ आणि १२ तर काटा आणणारे आहेत्...काय करता ते सगळ सांभाळुन करा रे लोकांनो..उगाच जीवाशि खेळ नकोत..

फाटु ट्रेक आहे रे.
लेका ढाक बहिरीलाच जायची माझी हिम्मत नाही. त्यामुळे अलंग, मदन आणि कुलंगला कळसुबाइ शिखरावरुन (लांबुनच) राम राम घातलाय. Happy

छान

यो साहेब !! तुम्हा सगळ्यांचा हेवा कर्तोय !! फोटो बद्दल काय बोलणार ? जबरद्स्तच ... म्हणजे बघितल्यावर 'जबर' 'दस्तच!!' लगतिल! Wink याच दिवसात मी चावंड,दुर्ग्,ढाकोबा असा ट्रेक केला.

काय बोलावं कळतचं नाही. खूपच छान.
झक्कास फोटु .. ..............
ते सुर्योदयाचे दोन्ही फोटो खूपचSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS आवडलेत.

प्रचि १५: ये श्याम कुछ अजीब होती है ! >> अतीशय सुन्दर प्र.चि. - जबरदस्त

तसेच प्रचि १५ ते प्रचि २० खासच !!! कॅमे-याची डिटेल्स समजतील काय? - अतुल

Pages