’खड्डे’ अच्छे हैं !!

Submitted by chinmaysk on 18 December, 2011 - 01:08

गेल्या महिन्यात पुण्यातल्या खड्ड्यांना आणि traffic jams ना फ़ारच वैतागलो आणि ’सकाळ’च्या ’वाचकांचा पत्रव्यवहार’ मध्ये ’एक सुजाण नागरिक’ या नावानं एक खरमरीत पत्र लिहिलं, मनपा ला उद्देशून.. त्यात रस्त्यांची दुरवस्था, traffic jams, इत्यादीबद्दल बरीच हजेरी घेतली होती. त्याचा काही impact होईल असं वाटलं नव्हतं, पण मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाय्राचं त्याच पत्राला अवघ्या २ दिवसात आलेलं उत्तर बघुन मला क्षणभर गरगरल्यासारखं झालं, आणि उत्तर वाचून झीटच आली.. ते उत्तर खाली देत आहे. त्यामुळे आपल्याही काही तक्रारी असतील पुण्यातल्या रस्त्यांबद्दल, तर त्या नक्की दूर होतील, असा विश्वास वाटतो.

॥श्री॥
दि. १६.०८.२०११

प्रिय ’एक सुजाण नागरिक’,

आपले ’सकाळ’मधले पत्र वाचले. आपली शहराच्या सुव्यवस्थेविषयीची कळकळ बघून अत्यंत आनंद झाला. आपल्यासारख्या ’सुजाण नागरिकां’मुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे, हे निश्चित. परंतु आपल्या शहरातील रस्त्यांची बांधणी ही जनतेच्या भल्यासाठीच केलेली आहे, हे आपल्या लक्षात आलेले दिसत नाही. पुणे मनपा च्या ’खड्डे’ अच्छे हैं !! समाजसुधारणा योजनेअंतर्गत नमूद केलेल्या मुद्द्यांची आपल्याला माहिती होऊन आपल्या ’सुजाणते’पणात आणखी भर पडावी, यासाठी हा पत्रप्रपंच!

’खड्डे’ अच्छे हैं !! योजनेतील मुद्दे खालीलप्रमाणे-

१) रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चालक (driver) लोक कायम सतर्क राहतील. सतत बसणाय्रा धक्क्यांमुळे त्यांना झोप लागायचा प्रश्नच उद्भवत नाही. दूरच्या प्रवासातील अपघात टाळण्याच्या द्रुष्टीने हा मुद्दा फ़ार महत्त्वाचा आहे.

२) खड्ड्यातून गेल्यावर गाड्या puncture होणारच. रस्त्याच्या कडेला असलेल्या हजारो puncture chya दुकानदारांच्या रोजगाराची हमी यामुळे देता येते. NREGA सारख्या सरकारच्या उपयुक्त योजनेला संलग्न असा हा मुद्दा आहे.

३) आधीचे खड्डे बुजवणे आणि pipelines टाकण्यासाठी नवीन खड्डे खोदणे हा प्रकार पण मुद्दा क्र. २ शी संबंधित आहे, हे आपल्या लक्षात आलेच असेल.

४) खड्ड्यांतुन वाट काढत केलेला प्रवास हा एक संस्मरणीय अनुभव ठरेल. विचार करा, सरळ रस्त्यांवर कुठलेही अडथळे नसलेल्या प्रवासाची कल्पनाही रुक्ष नाही वाटत?

५) रस्त्यात जागोजागी असलेले खड्डे प्रवाशांना ’हे जीवन ही एक अडथळ्याची शर्यत असून त्यातून मार्ग काढत काढत आपणांस ईष्टस्थळ गाठायचे आहे’ याची कायम आठवण करून देतील.

६) दरवर्षी तयार केलेले नवीन रस्ते, पहिला पाउस आला की खड्डेमय होतात. ’रस्त्यांवर खड्डे आज नाहीत, उद्या आहेत’ यावरुन ’हे जीवन आज आहे, उद्या नाही’ या विचाराची जाणीव सदोदीत नागरिकांना रहावी, हा यामागील सुप्त हेतु आहे.

७) पुण्यातील रस्त्यांवर पुण्याबाहेरची सामान्य जनता सोडाच, पण Michael Schumacher तरी तुम्हाला शर्यतीत हरवेल का हो? F1 मध्ये Pit Stops घेतात म्हणे.. आपल्या शहरात सगळीकडे Pits मुबलक प्रमाणात असल्याने तो बिचारा गाडी पुढेच नेऊ शकणार नाही. प्रत्येक पुणेकराने ’या शहरातील रस्त्यांवर माझं राज्य आहे, साक्षात Schumacher जरी आला, तरी तो मला हरवू शकणार नाही’ असा विचार केला, तर कोणालाही कधीच नैराश्याला सामोरे जावे लागणार नाही.

८) खड्ड्यांमुळे होणारे traffic jams प्रवाशांच्या patience वाढवतात. अश्या प्रकारची योगसाधना मोफ़त उपलब्ध करुन देणारा हा उपक्रम आहे.

असो. या योजनेचे फ़ायदे सांगावे तितके थोडेच. अश्या या सर्वांगीण विकासाला चालना देणाय्रा योजनेला आपण विरोध करु नये, हे आपल्याला आत्तापर्यंत कळलेच असेल. पुण्यातच काय, ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

हेच पत्र सामान्य जनलेच्या फ़ायद्यासाठी ’सकाळ’ मध्येही छापायला सांगितले आहे.

ता.क. ही योजना फ़ारच सुंदररित्या राबवल्याबद्दल हिंजवडी परिसराला अजुन एक मोठा खड्डामय रस्ता बहाल करण्याचे ठरविण्यात आले आहे.

कळावे. लोभ असावा.

पुणे म.न.पा. तील एक वरिष्ठ अधिकारी
मा.ज.लेले

शुद्धीवर आल्यावर मी तरी या योजनेला संपूर्ण पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. तुमचं काय मत आहे?

गुलमोहर: