एक मैफिल छानशी - कविता वाचन

Submitted by Kiran.. on 16 December, 2011 - 10:43

नमस्कार मित्रांनो

ऑनलाईन मैफिलीची ही संकल्पना इथं काहीजणांकडे बोलून दाखवली होती. सकारात्मक प्रतिसादामुळे हा बाफ आपल्यासमोर सादर करीत आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय मैफिल अपूर्ण राहणार हे सांगणे न लगे.

मित्रमैत्रिणींनो..
प्रमोद काकांचा उत्साह घ्या.. आणि माईक घेऊन कामाला लागा बरं.. तुम्हाला आवडेल त्या फॉर्म मधे अपलोड करा आणि लिंक मात्र इथे द्या. एकाच पोस्टमधे लिंक आणि मूळ कविताही दिली तर अतिउत्तम !!

करायची सुरूवात ?

गुलमोहर: 

सुरूवात मी करावी का ?

ठीकै.. माझ्या आवाजात
छोड ना यार ऐका Happy

काय म्हणता ऑडिओ प्लेयर नाही ?

एक मिनिट हं.. सगळी सोय आहे आमच्याकडे Wink ( बहाणे नाही चालायचे आता Proud )

Hosted by kiwi6.com file hosting.
Download mp3 - Free File Hosting.

चुकांचे रिपोर्ट देण्याचे करावे. पुढच्या रेकॉर्डिंगमधे सुधारता येतील. तांत्रिक सुधारणा सुचवल्यात तर मंडळ आभारी राहील Happy

छोड ना यार ऐकण्याचा प्रयत्न केला किरण. व्हॉइस क्लियर नाही. रेकॉर्डिंग गंडलं आहे बहुतेक. तु कविता वाचली आहेस छान. सुस्पष्ट असती तर ऐकायला मजा आली असती. शक्य असेल तर परत बघ ना एक प्रयत्न करुन.

एकुणात ऑडियो कविता ही कल्पना झकास ! विश, खुप जण बर्‍याच कविता टाकतील आणि अनेकोनेक उत्तमोत्तम कविता वेगवेगळ्या फॉर्म मधे ऐकायला मिळतील. Happy

किरण

ठरल्याप्रमाणे धागा आणलात त्याचा आनंद झाला. सद्या नाशिकबाहेर आहे, परत आलो की एक रेकॉर्डींग पाठवतो

ठिक आहे........ चाल लावुन म्हणाला असतास तर अजुन छान झाले असते....... उच्चार वेगळे वाटत आहे Happy
मैफिली ची प्रस्तावना तर झाली... आता कवितेंना चाली सुध्दा लावणे सुरु करा ... Happy

इथे कविता-वाचन ही कल्पना अभिनव आहे..... आवडली.
फक्त स्वतःच्या कविता त्या कवीने स्वतःच्या आवाजात
ऐकविणे हा नियम आवश्यक वाटतो.
अर्थात बाकीच्यांची मते अजमावावीत.
-------------------------------------------------------------------------------
किरण,
तुमची कविता देखील ऐकली .... छान वाटली.
फक्त काही ओळींमधले शेवटचे शब्द जरासे नीट ऐकू येत नाहीत.
------------------------------------------------------------------------------
उपक्रमाला शुभेच्छा

https://rapidshare.com/files/4277976069/Voice0005.mp3

चाल लावली आहे ........प्रयत्न केलेला आहे.........आवाज माझा खराब आहे त्यात मी मोबाईल फोन वापरा.....रेकॉर्डिंग साठी............क्षमा असावी.........

सांजसंध्या यांची http://www.maayboli.com/node/27204#comments ही कविता

ठीकै

दोस्तांनो
तुमच्या कानावर अत्याचार Happy

http://www.4shared.com/mp3/G82bH5jj/mbsan3.html
प्ले होतंय ना ?

माफ करा. पण मूळ कविता आत्ता सापडत नाहीय्ये इथं पेस्ट करायला Sad

देवकाका... सुंदर रेकॉर्डिंग झालंय तुमचं. तुमचा ब्लॉग म्हणजे भांडारच आहे एक

विशाल कुलकर्णी = छान आवाज आहे तुझा. गायलंय देखील छान.

उदयवन - अरे त्या लिंक वर क्लिक करून पहा ना एकदा

सांसं,तुझी वाचनाची पद्धत छान आहे ....पण एक विनंती, शक्य तो पार्श्वसंगीत आणि प्रतिध्वनी वगैरे गोष्टी नसाव्यात...कविता वाचनात इतर साजामुळे जर कवितेचे शब्दच नीट ऐकू नाही आले तर मग कविता वाचनात काय अर्थ उरेल?
स्पष्ट आणि स्वच्छ शब्दोच्चार आणि अर्थाप्रमाणे आवाजातला चढ-उतार...इतकं सांभाळलं तर बाकी कशाचीही गरज नाही...असं माझं प्रांजळ मत आहे.

http://www.4shared.com/mp3/udGYn8f0/halli_naa.html
माझा कवितावाचनाचा एक प्रयत्न...हे आदर्श नाहीये पण किमान इतके हवे असे मी खात्रीने म्हणेन...ह्यात सुधारणेला भरपूर वाव आहे.

Pages