नववर्ष

Submitted by bnlele on 13 December, 2011 - 03:40

नववर्ष
लवकर येणार वर्ष नवीन-
पर्याय नाही- स्व्वागतच करीन.
रंगबिरंगी पताका अ‌न्‌ दिवे,
ओले अन्‌ सुकेपण मेवे,
चकमक असणार चमत्कार,
सजू लागलाए अत्ताच बाजार.
सगळं-सगळं असणार "बिकाऊ",
तकलादू काय अन्‌ टिकाऊ,
दुकानांच्या अगणित ओळी-
त्यात रेंगतात मानव अळी,
सुरेल गाणी, पण बेसूर मिसळ,
त्यात सुद्धा केली भेसळ!
आहो,फुलांच्याही देठांना-
दिलॆत उभे टेकू सर्वांना.
वेलींवर ती होती ताठ,
पशुमानवाशी पडली गाठ.
आवळती बोटांची दुमड-
कि धारदार कैचीची पकड.
नको उगीच हळहळ.
नववर्षात नुसती चंगळ
बाजारात असणार सगळं-
मांडून फक्त वेगळं.
गेल्या वर्षी असंच होतं,
वस्तू सर्वच घ्याव्या वाटतात,
हात पण खिस्यात पटकन जातात,
मोबदल्यात झोळीत येतात.
संगत गिफ्ट पण येतात-
म्हणे राशीला योग्यच असतात !
इथे आहेत बोलके मुखवटे-
जुना काढून घ्यावा वाटे
पण कोणता- ठरवू कसा ?
मालक सांगेल तो तसा?
दबदबा पडेल अस्सा राकट-
बोलेल मोजकं पण तिखट?
कां दिसावी स्मित-रेषा सतत-
मान-अपमान काहीही मिळोत ?
गुळचट-मवाळ वरून दिसावा-
गांठ आतली अन्‌ मनांत कावा?
छे! आहे तो नाही वाईट-
प्रश्णच करू आऊट-ओफ-साईट ?
नकोच देक्खाव्याचा विचार-
शेवटी नशिबच तर खेळणार !
सांगा नशीब मिळॆल कुठे.?
हो तर- जावा पुढच्या वाटे.
एकच आहे स्टॉल-तिथे-
सिसेल बिल्लोरी महाल.
पूर्वी होता तो कंगाल,
हीच तर नशिबाची कमाल !
अरेच्चा ! विक्रेता हाच होता-
आज ओळखतच नव्हता.
फसविल मला गेल्या खेपेला,
सर्वच नासल-गेलं उताला !
म्हणतोए स्टॉकच संपला-
आयात-निर्यात बंदच झाला ! !

गुलमोहर: 
शब्दखुणा: