नोकरी

Submitted by deepak_pawar on 12 December, 2011 - 23:02

रोजच जात होतो कामावर अपमान गिळून
शरीर थकून जाईस्तोवर मालक घेत होता पिळून

वाटतं कधी? लाथ मारून सारं झुगारून द्यावं
पण मन म्हणत असतं, पोटासाठी काय खावं?

घरात वाट पाहत बसलेली भुकेलेली पोरं
लाज झाकून जात होतो तरी त्यांच्या म्होरं

कळत नव्हतं काय करू मन होतं झुरत
तरीसुध्दा जगण्याची आस नव्हती सरत

किती तरी प्रश्न असे मनात होते सलत
जसा मध्यान्हीचा सूर्य, माळ होता जाळत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

pradyumna जी आभार, वर्तमानकाळ बदललेला नाही.....

आपलं बरोबर आहे जागोमोहनप्यारे साहेब. आपल्याला हे माहित आहे का काही माणसं १२-१४ तास काम करुन सुध्दा योग्य तो मोबदला त्यानां मिळत नाही.