मुलगी म्हणून जन्मच नको देवू ....!!

Submitted by ravindra patil on 6 December, 2011 - 07:30

2). देवा मला मुलगी म्हणून जन्मच नको देवू ..........!!

जन्मण्याआधीच जर लोक आमचा जीव घेतात पाहू
त्यापेक्ष्या देवा मला मुलगी म्हणून जन्मच नको देवू ..........!!

मुलगा असता पोटात त्याला काळजीने ते जपतात
मुलगी असता का मनात मग त्यांच्या काही खुपतात
येणार गोंडस रूप छ्कुल्याच म्हणून भाराहून जातात
अन छकुली येणार कळताच डोळ्यात अश्रू बरे आणतात
देवाकडे नवस करतात मुलगा होवू दे मि पेढे वाटीन
पण जर का मुलगी झाली तर तुला देखील त्या घरातून लोटेन
पेढ्यांच्या या गर्दीत बर्फीची जागा कशी घेवू
त्यापेक्ष्या देवा मला मुलगी म्हणून जन्मच नको देवू ..........!! १ !!

लेकीच्या शिक्षणाचा भार फार
लेकाच्या शिक्षणासाठी घर-दारही ठेवतात उधार
बक्कळ हुंडा द्यावा लागेल म्हणून आमचा बालविवाह करतात
लग्नाच्या नावाखाली आम्हाला परक्याला विकतात
लग्नात ठरलेल्या गोष्टी मिळाल्या नाही तर सासरीही जाच होतो
सीतेसाठी वनवास तसा आमचा सासुरवास होतो
पोटाची खळगी भरण्यासाठी का आम्ही आमच शरीर विकत जावू
त्यापेक्ष्या देवा मला मुलगी म्हणून जन्मच नको देवू ..........!! २ !!

बलात्काराच्या जाल्यामधून आजही बाहेर कस पडावं
आलीच अशी वेळ आमच्यावर तर अश्रू लपवून कस रडावं
रस्त्यावरच्या मवाल्यानासुद्धा आम्हीच सामोर जायचं
अन त्यांनी मात्र शीळ वाजवत आया -बहिणींना छेडत बसायचं
आम्हाला छेडण्याचे प्रमाण या कलयुगात बगतोयस ना कसे वाढू लागलेत
सख्खी नातीसुद्धा आमच्या इज्जतीचे धिन्दोडे सर्वत्र काढू लागलेत
माणसांच्या या वासनेचा शिकार आम्हीच का होवू
त्यापेक्ष्या देवा मला मुलगी म्हणून जन्मच नको देवू ..........!! ३ !!

शेवटच मागण देवा ही अत्याचार तुला थांबवावं लागतील
तेंव्हा कुठे लोक तुझ्याकडे मुलीसाठीही नवस मागतील
पेढ्या बर्फीची शर्यत तेंव्हा कुठे थांबेल
तोंड गोड करण्यासाठी साखरेचा कण देखील पुरेल
बलात्कार हुंडाबळी कायमची नष्ट होवू दे
मुला-मुलींच्या प्रमाणाचा समतोल राखला जावू दे
या सर्वांचा बारकाईने तू विचार करून टाक
मग खुशाल देवा मला मुलगी म्हणून जन्म देवून टाक ........!! ४ !!
@ रविंद्र पाटील
9172104241

गुलमोहर: 

सत्यपरिस्थितीवर चांगले भाष्य केले आहे. जगात पुरूषप्रधान / पुरूषसत्ताक कुटूंबपद्धती जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे सद्यस्थिती उद्भवली आहे. जोपर्यंत पुरूषविचार मरणार नाही तो पर्यंत समाजातले वैगुण्य राहणार आहे. मुलगा-मुलगी भेद एका कुटूंबाने विसरल्याने हि स्थिती बदलणार नाही. समाजाने जागृकतेने यावर विचार करणे गरजेचे आहे. शासनानेदेखील बदलत्या परिस्थितीत विचार करून दुरगामी शासकिय योजना आणल्यास मदत होईल.

दोन व्यक्तींच्या (नवरा-बायको) कुटूंबात एकच कमावती व्यक्ती असेल तर स्त्री असावी असला काहीतरी नियम करायला हवा.

खूप छान!जर प्रत्येक घरातला " पुरुष", यावर विचार करून बदलला तर खूप काही बदलेल. आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्याने हे आवश्यक आहें.

खूप छान!जर प्रत्येक घरातला " पुरुष", यावर विचार करून बदलला तर खूप काही बदलेल. आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्याने हे आवश्यक आहें.>>चुकताय आपण, मुलगा पाहिजे मुलगी नको यासाठी
पुरुषांच्या बरोबरिबरीने किंवा जास्तिने स्त्रियाच आग्रही असतात.
वास्तव्याच सुंदर दर्शण.

छान ! भारत हि बुद्धाची संबोधि भूमी आहे. त्यांनी कोणताही भेदभाव न करता स्त्रियांना पुरुश्या एवढेच महत्व दिले आहे. स्त्री च्या बाबतीत ते म्हणतात ज्ञानी पंडित, शूर- वीर, व चक्रवर्ती सम्राट यांना जन्म देणारी हि स्त्रीच असते. कारण फक्त स्त्रीच प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मातृत्व, देवू शकते.

छान