बेल्लारीच्या पोटनिवडणुकीचा निकाल

Submitted by फारएण्ड on 5 December, 2011 - 03:00

बेल्लारीच्या पोट निवडणुकीचा निकाल इंटरेस्टिंग आहे. मूळ भाजपचे पण आता बंडखोर उमेदवार श्रीरामुलू (चुभूद्याघ्या) अपक्ष म्हणून विजयी झाले. भाजपच्या अधिकृत उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. एकूण मतांची संख्या (जी आमदारकी च्या निवडणुकीच्या मानाने फार कमी वाटते) पाहता ४७,००० मतांचा फरक जबरदस्त आहे.

हा मतदारसंघ म्हणजे त्या सगळ्या मायनिंग स्कॅण्डलचाच ना?

सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराविरूद्ध लोकांनी दिलेला निकाल म्हणावे तर हे श्रीरामुलू यात अडकलेल्या रेड्डी बंधूंचेच उमेदवार्/साथीदार आहेत असा आरोप आहे.

म्हणजे एकतर हे श्रीरामुलू खरोखरच क्लीन आहेत आणि सर्वसामान्य मतदाराला ते माहीत आहे किंवा त्या मतदारसंघात काहीतरी त्यांनी केले आहे (तेथील लोकांना त्याच खाणींमधे बर्‍याच नोकर्‍या दिल्या असे वाचले. म्हणजे 'लोकशाहीची बेटे' थिअरी. "आमच्या वैध/अवैध मागण्या मान्य होतायत ना, मग देशाला बुडवत असेल तरी काय फरक पडतो?") किंवा मग अझरूद्दीन च्या निवडीसारखीच ही एक अगम्य निवड असेल Happy यांना मत देणारे कोण असतात नक्की? जामीनावर सुटलेल्या त्या कनिमोझींचे जोरदार स्वागत करणारे "कार्यकर्ते" असतात तसे असेल पण तेथे ते शंभर दीडशे असतील, येथे ७४००० लोकांनी मत दिले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारेन्डा, हा सर्व भाग तसा बर्‍यापैकी मागासलेला. मायनिंगमुळे इथे भरभराट आली. बाकीचा भ्रष्टाचार वगैरे समजून घ्यायची लोकांची इच्छा नाही. याच मतदारसंघातून अमेठीसोबतच सोनिया गांधी यानी निवडणूक लढवली होती. आणि सुषमा स्वराज हरल्या होत्या.

रेड्डी बंधुना दोषी ठरवलेले इथल्या लोकाना आवडलेले नाही. त्यांच्यामते, रेड्डींच्या वाढत्या लोकप्रियतेवर जळून त्याना यामधे विनाकारण गोवण्यात आलेले आहे. त्यामुळे भाजपाविरूद्धदेखील इथे असंतोष तयार होतोय. आपल्याकडे लोक पक्षाशी कमी आणि नेत्याशी जास्त एकनिष्ट असतात याचाच हा पुरावा म्हणायला हवा. म्हणून रेड्डीनी ज्याला पाठिंबा दिला (अधिकृत नव्हे!!!) त्यानाच लोकानी विजयी केले.

बाकी, याच मतदारसंघातल्या गावामधे एका नातेवाईकाच्या मुंजीला गेलेले असताना निवडणुकामधे लोकाना पैसे कसे वाटले जातात याचे प्रात्यक्षिक बघितले होते. तवर फक्त ऐकून माहिती होती. त्या पाचशे रूपयांचे आम्ही सर्वानी आईस्क्रीम खाल्लेले. Proud

रेड्डी ब्रदर्स च्या स्कॅमची व्याप्ती फार मोठी आहे. आंध्रातून त्यांची सुरूवात झाली आहे. हा जो जिंकला तो रेड्डीच्या पाठिंब्याशिवाय जिंकला असे समजून पाठ थोपटणे चालू आहे. रेड्डींनी प्रचंड पैसे वाटून सर्वांना मिंधे केले आहे. It is totally horrible. Even today there are people outside Hyd jail who support the brothers. It is a travesty of the electoral process.

त्या मतदारसंघात काहीतरी त्यांनी केले आहे>>

बेल्लारीच्या तीन वेळा खासदार असलेल्या श्रीमती बस्वराजेश्वरी ह्यांची नात माझी जवळची मैत्रीन आहे. तिच्याकडून बेळ्ळारी अन रेड्डी बंधू बद्दल अद्यावत माहिती नेहमीच मिळते. कारण तिचे वडिल देखील (श्रीमती बस्वराजेश्वरीह्यांचे चिरंजीव) हे भाजपाचे राजकारणी आहेत व रेड्डीबंधूचे जवळीक. तिच्यामते बेळ्ळारी सुधारण्यात रेड्डींनी सहभाव लावल्यामुळे ते अपक्ष राहोत वा कुठल्याची पक्षाचे त्यांनी ज्यावर हात ठेवला ते निवडून येणार. थोडक्यात रेड्डीलोक रॉबीनहुडचे काम करतात म्हणे. इकडून तिकडून पैसा खायच व बेळ्ळारीत सुधारणा करायच्या. तो भाग थोडक्यात कर्नाटकातील "बारामती" झाला आहे.