मॉड्युलर किचन संबंधी माहिती हवी आहे

Submitted by मनस्विता on 5 December, 2011 - 02:21

सध्या आमच्या स्वयंपाक घरामध्ये ओटा आणि ट्रॉलीज सह आहे. परंतु बरीच वर्षे झाल्याने ट्रॉलीज बिघडल्या आहेत आणि ओट्याची उंची माझ्या साठी कमी असल्याने, ओटा आणि ट्रॉलीज बदलायच्या आहेत. त्यासाठी चौकशी केली असता मोड्युलर किचन चा पर्याय सुचवला आहे. तरी ह्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे माहित/अनुभव असल्यास कृपया मला सांगावेत.
जरा माझा प्रश्न re-phrase करते.
मला सन्गितले त्याप्रमाणे मॉड्युलर किचन म्हणजे ज्यात granite किंवा तत्सम गोष्ट एखाद्या framework वर बसवली असते. म्हणजे बांधकामात ओटा बांधतात तसा बांधलेला नसतो. त्यामुळे अश्या ओट्याचे फायदे/तोटे काय असू शकतात?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत मॉडयुलर किचन साठी कोणी खात्रीलायक जागा माणुस माहित आहे का? चांगला हवा कारण जागा थोडी आणि गरजा फार आहेत. स्लीक किचन बघते आहे. पण ते ब्रॅण्डेड असल्याने महाग आहे. मला कोणीतरी चांगली/ चांगला इंटिरियर वाला/वाली हवी आहे. किचन स्पेशॅलिस्ट

मी आता ही पोस्ट घर पहावे बांधुन मध्ये टाकली. एकदम योगायोग.