द डर्टी पिक्चर

Submitted by भुंगा on 4 December, 2011 - 22:46

नागमुका नागमुका नागमुका नागमुका
नागमुका नागमुका नागमुका नागमुका

असं भांबावून बघू नका........ !!! हे बॅग्राऊंडचं गाणं आहे ज्यावर एकताची "सिल्क" सर्वांचं लक्ष्य वेधून घेते.... अगदी सर्वांचंच..!! Happy पब्लिसिटीच अशी केलीये की चाणाक्ष वाचकांना आता वाटेल की, पुढच्या सीनमध्ये विद्या बालन आता "नागाचा मुका" च घेणार..... Wink

घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका
घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका (नागमुकाच्याच चालीवर )

तसं काहीही होत नाही...... ईम्रान हश्मी आणि नसिरुद्दीनसारखे धुरंधर असताना नागाला काही संधीच नाहिये... नाग वैतागलाय, पण एकताने पार्ट २ मध्ये पहिल्याच सीनमध्ये नागाला मारून नायकाचं नावच "नाग" ठेवायचं असं नक्की केलय Proud
**********************************************************************************************
लग्न न केलेली (की न झालेली Proud ) माणसं नेहमीच काही बाबतीत लग्न झालेल्या किंवा लग्नाळलेल्या माणसांपेक्षा पॉवरफूल असतात.....:डोमा: ही माणसं आपली पॉवर इतरांशी नडायला किंवा इतरांना नाडायला वापरतात....... "नडणारे" उदाहरण म्हण़जे अण्णा हजारे आणि "नाडणारे" उदाहरण म्हणजे साक्षात एकता कपूर. Happy

सिरिअल माध्यमातून विवाहबाह्यसंबंधांचा मारा करत तिने लग्न झालेल्यांवर सूड उगवला.... आणि आता रेश्मा, सिल्क, शकिला सारख्यांना नायिका बनवून त्यांचे जीवनपट काढलेत.. Sad

पब्लिसिटी पण एवढी भन्नाट करून ठेवलिये की, ऑनलाईन बुकिंग करताना जोगेश्वरी ते मालाड या भागातली मल्टिप्लेक्सेस एका तासाच्या काळात ज्या पधतीने धडाधड फूल होताना पाहिलीत ऑनस्क्रीन, तेही दुसर्‍या दिवशी.... धडकीच भरली.

*****************************************************************************************************

चला आता चित्रपटाकडे वळूया.

चित्रपट आणि "सिल्कस्मिता किंवा तत्सम कोणीही" यांच्या आयुष्याचं साधर्म्य हेच की, आहे नाही ते हातचं न राखता पूर्वार्धात दाखवायचं आणि मग उत्तरार्धात हरी हरी करत बसायचं.....!!!
विद्या बालनचा एकता बरोबर सुरू झालेला "हम पांच" पासूनचा अभिनयाचा प्रवास "द डर्टी पिक्चर" पर्यंत पाहिला तर काही काही सीन्समध्ये नक्कीच दाद द्यावीशी वाटेल विद्याला...... पण अंगप्रदर्शनाच्या अतिरेकामुळे तो अभिनय कोण किती लक्षात ठेवेल जरा शंकाच आहे. Sad

एका अत्यंत गलिच्छ समजल्या जाणार्‍या वातवरणातून (पांढरपेश्या समाजाच्या नजरेतून) आलेली, महत्वाकांक्षी (कोणाची महत्वाकांक्षा काय करायला लावेल नेम नाही) स्ट्रगलर तरूणी एक एक शिडी योग्य वेळी योग्य (तिच्या दृष्टीने) पधतीने वापरत स्टारपदावर पोचते.... स्वतःचे असे "ऊसूल" न तोडता शिखरापर्यंत पोचते आणि मग तिथून पुन्हा एकदा अधोगतीला लागून तिचे आयुष्य एक शोकांतिका कसे होते, याचा प्रवास म्हणजे "द डर्टी पिक्चर". हा असा जीवनप्रवास आपण यापूर्वीही अनेकदा पाहिलाय... पण इथे पब्लिसीटी एवढी आहे की, लोक तो प्रवास वगैरे बघायला आलेलेच नसतात......

विद्या बालनने अभिनय केलाय यात वादच नाही...... नसीरभाई, ईम्रान आपापल्या ठिकाणी योग्यच... तुषार कपूरबद्दल फक्त चित्रपटांची नावं बदलतात, त्याच्याबद्दल काही लिहिण्यासारखं नसतंच.... प्रेक्षकांवर खरा प्रभाव पडतो तो "संवांदांचा"...... अत्यंत चटपटीत संवाद....... म्हणजे कित्येक वेळा जाणवत राहातं की सिल्क सारख्या लोकांनी अश्या प्रकारे ईंडस्ट्री रूल वगैरे करणं हे वास्तवात अशक्य आहे, पण संवादांमुळे काही ठिकाणी नकळत प्रेक्षक दाद देऊन जातोच. विशेषतः पुरस्कार मिळतो, तेंव्हाची जगाला फाट्यावर मारल्याची तिची बडबड प्रत्यक्षात अशक्य असूनही प्रेक्षक तिच्या मानसिकतेला दाद देतो. ही संवादलेखकाची करामत.

मिलन लुथ्रियाची ही खासियत आहे. अगदी "कच्चे धागे" पासून "वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई" पर्यंत त्याचे संवाद लक्षात राहणारेच असतात.... इथेही त्याची ही छाप कायम आहे.

मला स्वतःला शेवटचा काही भाग जास्त आवडला जिथे विद्याला अभिनयाला बराच वाव मिळाला आणि तिने तो सार्थ केलाय.....

महत्वाची त्रुटी म्हणजे "साऊथ ईंडियन" वातावरण कुठेच निर्माण होत नाही..... फक्त न्कपडे तसे दिले.. लुंग्या नेसवल्या प्रोड्युसर्सना म्हणजे सगळं होत नाही..... देहबोली, संवाद कुठेही साऊथ ईंडिअन वाटत नाहीत....
त्यासाठी संबंधित लोकांनी "रामगोपाल वर्माच्या" चित्रपटांची पारायणं करायला हवी होती.... ती जमलेली नाहीत.

उल्लाला उलाला गाणं चपखल बसलय..... "ईश्क सुफियाना" गाणं हे चक्क घुसडलय...... ईम्रानला तिच्याविषयी वाटू लागलेलं प्रेम दाखवायला उगाच एक गाणं वाया घालवलय..... त्याचं चित्रिकरण तर बकवासच. तिथे कात्रीच लागायला हवी होती.

ओव्हरऑल, ज्या अपेक्षेने प्रेक्षक आत घुसतो ती पूर्ण करण्यात विद्याने कुठेही कसूर केलेली नाही.... हा चित्रपट चालला तर तो विद्यामुळेच चालेल..... !!!!!

सरतेशेवटी एकच वाटलं.......

प्रेक्षकांची मानसिकता आजही तीच आहे..... फक्त नावं बदलली आहेत....त्यावेळी "सिल्कस्मिता" होती आज "विद्या बालन" आहे..... अंगप्रदर्शनाला इतकी पूर्वप्रसिध्दी मिळाली नसती तर हा चित्रपट इतकं ओपनिंग घेऊच शकला नसता.......... Sad आजही एकट्याच्या जीवावर प्रेक्षक खेचून आणण्याएवढी विद्या मोठी नाही , ती "बाल"च आहे.

बाकी आता या लाटेवर स्वार होऊन शकिला आंटी, रेश्मा, हुमा खान, पार्वती, डॉली बिंद्रा, राखी सावंत यांच्यावर "जीवनपट" निघाले तर प्रेक्षकांनी त्याची मानसिक तयारी ठेवावी.

नागमुका नागमुका नागमुका नागमुका
नागमुका नागमुका नागमुका नागमुका

गुलमोहर: 

Biggrin

हा चित्रपट पहायचा नाही असं ठरवलेलं होतं.भुंग्याच्या परीक्षणाने त्यावर शिक्कामोर्तब झालं.

मस्त आढावा घेतला आहेस.

अतिरेक ही एकच गोष्ट आहे ज्यामुळे सिनेमा काही अंशी फसला(खास करून उत्तरार्धात).

नसीर, विद्या ह्यांचा अभिनय म्हणजे प्रश्नच नाही.

हा सिनेमा म्हणजे एक धाडसी पाऊल म्हणायला हरकत नाही.

परिचय आवडला. Happy

टीव्हीवर झलक पाहून सारखे असे वाटत आहे की सिल्क स्मिताच्या चेहर्‍यावरचे बिनधास्त भाव काही विद्या बालनच्या चेहर्‍यावर येत नाहीत. ती सात्विक आणि सलज्जच दिसत राहते. सिल्क स्मिताने अंगप्रदर्शनाव्यतिरिक्त जो मुद्राभिनय केला त्यामुळे ती त्या जमान्यात अधिक गाजली असावी असा निष्कर्ष काढायला वाव आहे.

-'बेफिकीर'!

हे परिक्षण अजिबात आवडले नाही. चीप वाटले.
विद्या बालनने आजवर इतपत काम केलेय की तिला अंगप्रदर्शन करून स्वतःला मोठे करण्याची गरज नाहीये. अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला उत्तमरित्या प्रूव्ह केले आहे. अभिनेत्री अश्या प्रकारच्या व्यक्तिरेखेत स्वतःला झोकून देणे आणि नाईलाज म्हणून अंगप्रदर्शन करणे यात फरक आहे.

निर्मातीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे उल्लेख फारच खटकले. कुणाही बाईने लग्न केले वा नाही केले यासंदर्भाने टिका करायचा अधिकार कोणालाच नाही. आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलच बोलायचे तर वयाच्या तिशीमधे ३०० कोटीचा टर्नओव्हर असणारी कंपनी उभी करण्याची ताकद अंगात असणे याबद्दल प्रथम बोलावे.

नीरजेला अनुमोदन.
वैयक्तिक टिप्पण्या अनावश्यक तर आहेतच, पण पातळीही काही फार वरची नाही.
बाकी, विद्या बालनबद्दल जे लिहिलं आहे, ते अजिबात पटलं नाही, आणि आवडलंही नाही.
दक्षिणा,
'बायकांनी पाहावा असा' म्हणजे नक्की कसा चित्रपट?

आपण आता "बाळ राहिलेलो नाही" हे बाल-न मॅडमनी यापूर्वीच्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटात थोड्या फार फरकाने दाखवलेलं होतेच, इथे तिला कुरणच मिळालय..... !! << या विधानाला आक्षेप.

विद्या बालनने आजवर इतपत काम केलेय की तिला अंगप्रदर्शन करून स्वतःला मोठे करण्याची गरज नाहीये. अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला उत्तमरित्या प्रूव्ह केले आहे. << अनुमोदन.

दक्षे मी पाहिलाय... पाहूच शकतेस! फक्त बरेचदा किळस वाटेल इतकं अतिरेकी अंगप्रदर्शन आहे, पण चूकवू नकोस असंच म्हणेन कारण चित्रपटातले संवाद.

आता हा "A+" मूव्ही असल्याने द्विअर्थी संवाद आहेतच पण चपखल वाटतात.
विद्या बालन ने खरेच श्रम घेतलेत - सगळ्याच बाबतीत!!

असो, सांगावं हे वाटेल, विद्याने ज्या प्रकारे संवाद्फेक केली आहे- उतरवते ती एकेकाची/ तिला व्हल्गर म्हणणार्‍या समाजाची, तिथे तिला खरी दाद- सिल्क आणि हिच्या साकारलेल्या पर्सनॅलिटीत किती साधर्म्य आहे आणि किती मसाला ते एकताच जाणो, पण विद्याचा अभिनय रॉक्ड!

पुरस्कार सोहळ्यात विद्याने केलेले भाषण म्हणा किंवा सूपरस्टारच्या बायकोला शाब्दिक लोळावणं म्हणा, नायला (पत्रकार) चा पार्टीचे तीन-तेरा करतानाची अ‍ॅक्टींग म्हणा, यशाने आलेला माज म्हणा आणि तो विरतानाच आलेलं फ्रस्ट्रेशन म्हणा- विद्या रि अ ली रॉक्ड!

नसीरने साकारलेला "कमर्शियल" माणूसही पहावाच.
"अरे, हिरो अनाथ सिक्टीज में होते थे, अब एटीज का जमाना है, हिरो को फॅमीली दो, बहन दो, उस बेहन को इज्जत दो, फिर लूटवॉओ..." ह्या नसीरच्या वाक्याने- आपण आणि आपल्या समाजाची मानसिकता उमटली आहे- आपण जशीजशी दशके पुढे जातो आहोत "जगण्यालाच" निर्ढावत चाल्लो आहोत, वाटून गेलं!

तिच्या अंग प्रदर्शनापेक्षाही तिच्या सशक्त अभिनयासाठी- संवादांसाठी- तिने साकारलेल्या निर्धास्त व्यक्तिमत्त्वासाठी हा मूव्ही बघायला हरकत नक्कीच नाही.

विद्या बालनचा अभिनय, चित्रपटातील संवाद आणि एकतेच्या सढळ हस्ते निर्मितीसाठी चित्रपट बघावाच.

A सर्टिफिकेट आहे म्हणून काही विशेष अपेक्षा ठेवून चित्रपट बघायला गेलात तर वरील लेखाप्रमाणे अपेक्षाभंग होईल एवढे खरे.

हा लेख चित्रपट ग्रूपात लिहायला हवा.

नीधप,

एकता कपूरबद्दल आणि तिच्या प्रोफेशनल कर्तुत्वाबद्दल शंकाच नाही...... त्यामुळे आक्षेप पटला म्हणून आवश्यक बदल केले आहेत.

पुन्हा मी फक्त इथे माझं मत लिहिलय आणि ते आहे तसंच आहे..... मला वाटलेलं....
मी कुठेही म्हणत नाहिये की मी समिक्षण वगैरे केलेय...... मी वैयक्तिक मत सामान्य प्रेक्षक म्हणून लिहिलय.

पुन्हा प्रत्येक ठिकाणी विद्याच्या अभिनयाला झाकेल असं काही न लिहिता तिच्या अभिनयाबद्दल लिहिलेलं आहेच...... पण अंगप्रदर्शनाच्या अतिरेकात अभिनय झाकला गेलाय असं मला वाटलं......

आणि दमदार पब्लिसिटी होती म्हणून हे ओपनिंग मिळालय हे ही धडधडीत सत्य आहेच........

मला अजिबातच विद्या बालन फॅन क्लबच्या भावना दुखवायच्या नव्हत्या.....

दक्षे,

इतकं काही भयंकर चित्र उभं केलेलं नाही मी....

बिनधास्त पाहू शकतेस चित्रपट...... उत्तरार्ध जास्त चांगला आहे.

मी चित्रपट पाह्यला नाहीये. त्यामुळे माझं चित्रपटाबद्दल अजून काहीच मत नाही.
पण या परिक्षण/ रिव्ह्यू/ रिपोर्ट मधली भाषा आक्षेपार्ह वाटली ते सांगितलं.

नीधप,

तशी भाषा वापरायला काहीच वैयक्तिक आकस नाही..... जसं वाटलं तसं लिहिलय...

परखड मताबद्दल धन्यवाद. सुधारणेला नेहमीच वाव असतो..... नोंद घेतलेली आहे. Happy

चिनूक्स,
बायकांनी थेटरात जाऊन पहावा असा आहे का असं विचारायचं होतं मला.

तिकडे विपुत नीधपने पण झापलंच मला यावरून Proud (आता जातील सगळे माझी विपु वाचायला.. जा जा.. :हहगलो:)

हा लेख असल्याने 'चित्रपट परिक्षण' या चष्म्यातून बघणे ही गफलत नाही का? वैयक्तीक मते आहेत ती! Happy

दक्षे, झापायचा संबंध नाहीये. जे चुकीचं वाटलं त्याला चुकीचं म्हणालेय. इथे तो विषय नको म्हणून विपु मधे टाकलं. तुला ते इथे आणायचंय का?

"लव्ह सेक्स और धोका" असू द्या... "रागिनी एम. एम. एस." असू द्या किंवा नुकताच प्रदर्शित झालेला "डर्टी पिच्चर" असू द्या... एकताने प्रेक्षकांची "नाडी" अचुक पकडलीय, असं वाटतयं. Wink

लग्न न केलेली (की न झालेली ) माणसं नेहमीच काही बाबतीत लग्न झालेल्या किंवा लग्नाळलेल्या माणसांपेक्षा पॉवरफूल असतात..... ही माणसं आपली पॉवर इतरांशी नडायला किंवा इतरांना नाडायला वापरतात....... "नडणारे" उदाहरण म्हण़जे अण्णा हजारे आणि "नाडणारे" उदाहरण म्हणजे साक्षात एकता कपूर.

सिरिअल माध्यमातून विवाहबाह्यसंबंधांचा मारा करत तिने लग्न झालेल्यांवर सूड उगवला.... आणि आता रेश्मा, सिल्क, शकिला सारख्यांना नायिका बनवून त्यांचे जीवनपट काढलेत..

>>>>>>> लग्न न केलेली (की न झालेली ) ....... हे काये भुंग्या??????
कोणाच्या वैवाहिक स्टेटसचा इथे काय संबंध???? शिवाय लग्न केलं नाही म्हणजे झालं नाही असाही निष्कर्ष काढलाय. हे खटकलं. लग्न झालेले तरी कुठे समजून उमजून लग्न करतात?

नीरजा >>>> निर्मातीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे उल्लेख फारच खटकले. कुणाही बाईने लग्न केले वा नाही केले यासंदर्भाने टिका करायचा अधिकार कोणालाच नाही. आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलच बोलायचे तर वयाच्या तिशीमधे ३०० कोटीचा टर्नओव्हर असणारी कंपनी उभी करण्याची ताकद अंगात असणे याबद्दल प्रथम बोलावे.
>>>> हे भारी पटलं. अनेकवार अनुमोदन.

बाकी हे परीक्षण वाचूनही पिकचर बघणारच. Happy

मामी Wink मग ठीक आहे...... एक तिकिट माझं पण काढ मग......

यावर पिक्चरवर सारखं बोलून माझा "अब्राहम" नाय झाला म्हणजे मिळवली Happy
एक फॅन वाढायचा फॅन क्लबात विद्याच्या. Happy

चित्रपट, निर्माती, दिग्दर्शक, मुख्य अभिनेत्री इतकेच काय चित्रपट पहायला आलेल्या प्रेक्षकांकडे एक विशिष्ट चष्मा लावून पाहिलंय का?
एकता कपूर बद्दल : तिची पहिली मालिका हम पांच आली तेव्हा ती १८ वर्षांची होती.
तिच्या सासबहु मालिका २००० सालात आल्या. तिच्या या मालिकांचा भर घरातल्या स्त्रियांमधले नातसंबंध यावर होता. कारण अर्थातच प्रेक्षकांमध्ये रिमोट कंट्रोल कोणाकडे असतो, ते तिने ओळखले होते. मालिकांमधली पुरुष पात्रे घरातल्या फर्निचर इतकीच महत्त्वाची असायची. विवाहबाह्य संबंध हा दोन स्त्रियांमधल्या नात्याचा एक पदर दाखवण्यासाठी तिने वापरला.(तिच्या एका मालिकेत दोन पुरुषांशी संबंध ठेवून असलेली नायिकाही होती).

चित्रपटांबद्दल बोलायचे तर वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई आणि शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला हेही तिनेच दिलेत. तेव्हा प्रेक्षकांच्या नाडीचे ठोके वेगळ्या लयीत पडत होते का?

<<ओव्हरऑल, ज्या अपेक्षेने प्रेक्षक आत घुसतो ती पूर्ण करण्यात विद्याने कुठेही कसूर केलेली नाही.... हा चित्रपट चालला तर तो विद्यामुळेच चालेल..... !!!!!
सरतेशेवटी एकच वाटलं.......प्रेक्षकांची मानसिकता आजही तीच आहे..... फक्त नावं बदलली आहेत....त्यावेळी "सिल्कस्मिता" होती आज "विद्या बालन" आहे..... अंगप्रदर्शनाला इतकी पूर्वप्रसिध्दी मिळाली नसती तर हा चित्रपट इतकं ओपनिंग घेऊच शकला नसता.......... आजही एकट्याच्या जीवावर प्रेक्षक खेचून आणण्याएवढी विद्या मोठी नाही>>

हा संपूर्ण परिच्छेद अजिबातच पटला नाही. सिल्क स्मिताची कथा पडद्यावर उतरवायची तर अंगप्रदर्शन नाही येणार? नुसत्या अंगप्रदर्शनावर चित्रपट चालायचा असता तर विद्या बालनच का हवी होती निर्माती आणि दिग्दर्शकाला? विशाल भारद्वाजच्या इश्कियातला विद्याचा अभिनय तेवढा कलात्मक आणि एकता कपूरच्या चित्रपटातला गल्लाभरू असे आहे का? नो वन किल्ड जेसिका मधल्या विद्याचे काय ?

देसी बॉइज नावाचा एक चित्रपटही आताच आला आहे. त्यातही अंगप्रदर्शन आहे. त्याबद्दल काय म्हणाल?

Pages