हिवाळी अंक २०११ संबंधीचे निवेदन!

Submitted by प्रमोद देव on 29 November, 2011 - 08:33

दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या अंकासाठी आपले उत्तमोतम साहित्य पाठवावे असे आम्ही आपणास आवाहन करत आहोत...

साहित्य कोणते असावे?

साहित्याला विषयाचे/प्रकाराचे कोणतेही बंधन नाही ... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/विनोदी/प्रवासवर्णन/चरित्र/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि कोणत्याही विषयावरील लेखन चालेल.. त्याच बरोबर ध्वनीमुद्रण(अभिवाचन.. कविता अथवा लेखाचे),ध्वनीचित्रमुद्रण,छायाचित्रण आणि व्यंगचित्र अशा प्रकारचं साहित्यही ह्या अंकासाठी आपण पाठवू शकता.

काही अटी आणि नियम:

केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन अंकात प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही. जरूर तिथे संबंधित साहित्यिकाशी बोलून निर्णय घेतला जाईल.

अहो, आम्हालाही ह्या अंकात भाग घ्यायचाय, पण खरंच सांगतो/सांगते नवीन लिहायला अजिबात वेळ नाहीये हो..जुनं अजिबात चालणार नाही का?

नवीन लिहायला वेळ नाही...हरकत नाही...मग आपले जुने लेखनही चालेल.
अरेच्चा,वर तर म्हणताय की केवळ नवे आणि ताजे लेखन हवंय आणि इथे म्हणता जुनेही चालेल...नीट काय ते सांगा ना!
थांबा,थांबा मंडळी! असे एकदम अंगावर येऊ नका....सांगतो...नीट वाचा. Happy
जुने लेखनही चालेल, पण, त्याचे स्वरूप बदलून,बरं का...म्हणजे कसे? सांगतो....आपल्याच कोणत्याही जुन्या लेखाचे/कवितेचे अभिवाचन/गायन करून आपण ते आम्हाला पाठवू शकता...पाठवतांना कृपया तसा उल्लेख मात्र करावा.

साहित्य कसे पाठवावे?

१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.

२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).

३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.

४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.

ह्या अंकाबाबत आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.

लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:

jaalarangaprakaashana@gmail.com

साहित्य पाठवताना हिवाळी अंक २०११साठी असे लिहून पाठवावे.

आपले साहित्य आमच्याकडे पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे २१ डिसेंबर २०११

चला तर मग आता लागा तयारीला आणि आपले साहित्य आमच्याकडे ठरलेल्या मुदतीत पाठवायला विसरू नका.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मंडळी इथे लक्ष असू द्या!
(धागा नजरेसमोर राहावा म्हणून हा प्रतिसाद)

संपादक मंडळात सुपर्णा कुलकर्णी, श्रेया रत्नपारखी आणि मी(प्रमोद देव) असे तिघेजण आहोत.
साहित्य पाठवण्याची शेवटची तरीख संपल्यानंतर पुढच्या दोन तीन दिवसात...अंक कधीही प्रकाशित होईल.

डिजिटल पेंटिंगही चालेल पद्मजा...पण त्यासोबत त्या चित्रासंबधी काही माहिती लिहिली तर ते जास्त आवडेल.
मुकु आणि मंदार तुम्हा दोघांचं साहित्य मिळालंय...धन्यवाद!

वत्सला,आपणही लिहीत असाल तर जरूर भाग घ्या.
अंक प्रकाशित होईल तेव्हा इथेही घोषणा नक्कीच केली जाईल...दुव्यासहित!

देवसाहेब, मी सोलापुरातून आपल्याशी फोनवरून बोललो आहेच.
पुण्याला नुकताच आलो आहे. आपली सुचना लक्षात घेऊन ध्वनिमुद्रण करून २० तारखेपर्यंत पाठवतो.

माझ्याकडे माझ्या कथकथनाची सीडी आहे पण त्यात एकाच फाईल मधे सलग तीन कथा आहेत आणी मला एकच द्यायची असेल तर काय करायचे? की संपादक बाकिच्या दोन कथा डिलीट करू शकतील?

चालेल Happy

गोखलेसाहेब,हरकत नाही...तशीही आपली शेवटची तारीख २१ डिसेंबर आहे...तेव्हा निवांतपणे होऊ द्या.
हबा,अरे नक्की जमेल...विशाल करून देतोय म्हणजे मग चिंताच नाही.
विशाल धन्यवाद रे!

Pages