मी बाफं वर भांडत जातो

Submitted by rmd on 27 November, 2011 - 23:36

अविनाश खेडकरांची क्षमा मागून त्यांच्या कवितेचं विडंबन इथे टाकते आहे
मूळ कविता इथे पहावी -
http://www.maayboli.com/node/30643

लेखन नाही माझा बाणा
मी नच असे कलाकार तो
पण जर काही लिहिले नाही
समाज त्यांना 'बोअर' मानतो

म्हणून नेहमी केली ईर्ष्या
इथे असणार्‍या प्रत्येकाची
असाल तुम्ही सूर्य तळपते
माझी क्षमता प्रतिसूर्याची

तोंडाला येईल जे जेव्हा
तेव्हा ते ते बोलत गेलो
मायबोलीच्या साम्राज्यावर
केवळ कचरा सांडत गेलो

मनात उठला मत्सर जेव्हा
विचार माझे गरळ ओकले
ना कोणाशी सोयर माझे
माबोकरांनी दूर लोटले

हिशोब चुकवायचेच सारे
मनात पक्के मांडून घेतो
पुन्हा मनाला भरती येते
मी बाफं वर भांडत जातो

टीपः वरील विडंबन केवळ गमतीखातर लिहिले आहे. उगाच त्याचा कोणाशीही संबंध जोडायचा प्रयत्न करू नये! Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

म्हणून नेहमी केली ईर्ष्या
इथे असणार्‍या प्रत्येकाची
असाल तुम्ही सूर्य तळपते
माझी क्षमता प्रतिसूर्याची>>>>>आपण प्रतिसुर्याप्रमाने तळपावे हिच सदिच्छा!

धन्यवाद!
किरण... गुन्हा कबूल. पण या कवितेसाठी हीच थीम बरोबर बसली.
माझा विडंबनाचा पहीला प्रयत्न आहे. काही चुकलं असेल तर समजून घ्यावे ही विनंती.