स्वयंपाकघरातल्या युक्त्या

Submitted by आरती on 26 November, 2011 - 12:18

युक्ती सुचवा / सांगा या बाफचा हेतु, आत्ता मला कहितरी युक्ती सांगा किंवा आत्ता मला मदत हवी आहे असा आहे असे समजुन मी हा नविन धागा सुरु करते आहे. पुर्वी असा एक धागा मायबोलीवर होता (असे मला आठवते).

अशा पण काही टिपा (अनेकवचन Happy ) असतात ज्या 'हँडी' सापडल्या पाहिजेत. अगदी छोटीशीच टिप असते पण काम खुप सोप्पे होते त्यामुळे.
उदा. (काजुकतली चा बाफ) काजुची पुड करण्या आधी ते थोडावेळ फ्रिजमधे ठेवावेत.

तर अशा उपयोगी सुचना प्रत्येकाकडेच असतात, त्या सगळ्या एकत्रित असाव्या, त्यासाठी हा धागा.

[त्या सगळ्या वरतीच एकत्र ठेवायचा प्रयत्न मी करेन, देणार्‍याच्या नावासहित]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बीडाच्या तव्यावर डोसे काढताना, तवा आधी चांगला तापवुन आच सेट(मध्यम) ठेवावी, पहिला डोसा घालायच्या आधी नारळाच्या शेंडीने तेल लावावे. नंतरच्या डोशांना पुन्हा पुन्हा तेल/बटर लावावे लागत नाही. अगदी अल्मोस्ट पुढचे १०-१२ डोसे(याशिवाय जास्तीचा प्रयत्न अजुन केला गेलेला नाही) तरी तेलाच्या थेंबाशिवाय येतात. आणि अगदी हवे तसे, चांगला हॉटेल्च्या डोशांसारखाच सोनेरी-तपकिरी रंग येतो. पातळ डोसेही अगदी क्रिस्पी होतात्(पेपर डोसा). न चिकटता. प्रत्येक डोशाच्या आधी तेल्/बटर, मीठाचे पाणी शिंपडायची गरज भासत नाही.
हा शोध मला अपघाताने लागला, दुसरा डोसा घालायच्या आधी तेल लावायला विसरले म्हटल झाल आता 'हा' चिकटणार मग सगळा तवा खरवडुन धुवुन स्वच्छ केल्याशिवाय नाश्ता बोंबलला, शिवाय सकाळची वेळ.. पण वाचले अगदी पुढचे सगळे डोसे न चिकटता व्यवस्थित आले .. आता नेहमी असेच करते. चुकल्याशिवाय असे शोध लागतही नाहीत. शिवाय तेला-बटरशिवायची सकाळची त्यातल्या त्यात 'डाएट रेसीपी' म्हणुन विशेष खुश.. Happy

फ्लॉवर ५-१० मिनीट उकळत्या पाण्यात ठेवावा, कमी तेलात, पटकन भाजी होते.>>>> पाण्यात थोडीशी हळद घातली तर रंगही सुंदर येतो भाजीला आणि वासही. Happy

बिडाच्या तव्याला नारळाच्या शेंडीने तेल लावण्याप्रमाणेच त्यावर तेल घालून कांद्याने पसरून घ्यायची पण पद्धत आहे.

टमाटो फ्रीझ करून नंतर किसण्यापेक्षा वेळ असताना टमाटो प्युरे करून आइसट्रे मध्ये ठेवून त्याचे क्युब्ज करून ते पॅकबंद करून डीपफ्रीजरमध्ये ठेवले आणि गरजेनुसार हवे तसे वापरले तर वेळ आणि हात दोन्ही वाचतील.

वेलदोड्याची पूड करताना सालांसकट करावी करताना साखर घालावी म्हणजे छान होते आणि सालेही वायाही जात नाहीत छान एकजीव पूड होते.

अनरसे करायचे असतील तर त्या दिवशी जबरदस्तीने Wink बेसन लाडूही करावेत. एका परातील लाडू बेसन पसरुन ठेवावे आणि तळून निथळलेला अनरसा त्यावर टाकावा. थोड्यावेळाने तो कडक होतो. त्याला लागलेलं बेसन झटकून तो डब्यात भरावा. जास्तीचे तूप बेसनात जाते. अनरसे झाल्यावर परातीतले बेसन कढईत काढून लाडवांसाठी भाजायला घ्यावे. अजून तूप हवे असेल तर घालावे.

अनरसे करायचे असतील तर त्या दिवशी जबरदस्तीने डोळा मारा बेसन लाडूही करावेत. अश्वे Lol

सगळ्यांच्या टिप्स मस्त आहेत.

वेलदोड्याची पूड करताना सालांसकट करावी करताना साखर घालावी म्हणजे छान होते >>> हो इथच वाचली होती ही टीप. चमचाभर तुपात ते परतले तर टम्म फुगतात अन झटकन होते पूड अस सांगितले होते. Happy

साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर अगोदर साबुदाणा कोरडा भाजून मग भिजवावा. मस्त फुलतो. दलियाही अगोदर भाजून मग शिजवावा.

भाजीचा पाला, फळभाजी जर मलूल वाटली तर गार पाण्यात थोडा लिंबाचा रस पिळून त्यात बुडवून ठेवावी. चांगली टवटवते.

फ्रीजमध्ये जास्तीचा कणकेचा गोळा हवाबंद डब्यात ठेवताना त्याला वरून थोडेसे तेल / तूप लावावे, म्हणजे ती कणीक कोरडी पडत नाही.

विदर्भात बर्‍याच घरी ही टिप अमलात आणतात - पराठी, थालीपिठ, धिरडे वगैरे करताना तव्याला कमी आणि समांतर आणि सर्व भागाला तेल लावण्यासाठी कांद्यांची शेंड्याकडची चकती घ्यावी आणि ती चकती वाटीतल्या तेलात बुडवून तव्यावर फिरवावी. हात जळत नाही, तेल पण कामी लागत आणि तव्याला तेल घर्षण करुन लावता येत. कित्येकदा कांद्याला देठ असत सुकलेलं. तसा कांदा आणखीनचं उत्तम.

साबुदाना खिचदि , मोदकचे पुरन कुकर् मधे शिजवुन घ्यावे. शिला भात ताज्या भातात मिसलुन एक वाफ आनावि. कोनाला काही कलत नाहि... शिल भात कुथे गेल ते..

काकडी चोचविण्यासाठी खमंग काकडी किंवा काकडीच्या कोशिंबीरीसाठी काकडीचे तुकडे मिक्सरमध्ये
फिरवावेत. एकदा चमच्याने फिरवुन ( खाली-वर करुन ) पुन्हा मिक्सर चालु करावा. झटपट मस्त काम
होते. मुळा किंवा गाजराच्या कोशिंबीरीसाठीही असाच उपयोग वेळ आणि कष्ट वाचवितो.

आभार : सुगरणीचा सल्ला पुस्तक.

लसुण सोलण्यासाठी न सोललेल्या पाकळ्या दोन लहान भान्ड्यान्मधे ठेवुन, भान्डी जोरात हालवावित. हालवताना लसुण-पाकळ्या भान्ड्यान्मधे बन्द असल्यामुळे एकमेकांवर आपटुन सोलल्या जातात.

heard over npr - video at http://www.saveur.com/article/Video/video-How-to-Peel-a-Head-of-Garlic-i...

पण हे गावठी लसुण जरा जास्तच अवघड, बधत नाहीत. मी सरळ सालांबरोबरच वापरतो.

कबूतरखान्याजवळील भांड्यांच्या दुकानांत लसूण सोलण्यासाठी, अगदी माफक किमतीत, एक वीतभर लांबीचे खास रबर मिळते (सायकलच्या ट्यूबसारखे). लसूण सोलण्यासाठी फारच उत्तम साधन आहे ते.

सोललेला नारळ मध्यभागी फुटण्यासाठी तो नळाखाली आधी ओला करून घ्यावा आणि मग फोडावा. (सौजन्यः मेजवानी अंक)

सुरीची धार बोथट झाली असेल तर -
सुरी थोडी ओली करायची आणि चिनीमातीचा कप /बाऊल उलटा केल्यावर तळाला जी कडा असते त्यावर धार करताना तिरकी ठेवुन घासतात तशी काही वेळ घासायची. खुपच मस्त धार होते.
( सौजन्यः जपानी मित्र )

@अकु..... साबुदाणा कोरडा भाजुन घ्यावा म्हणजे नक्की कसा? धुवुन भिजवायच्या आधी की भिजवलेला साबुदाणा खिचडीत घालायच्या आधी?

निर्मयी, धुवून भिजवायच्या आधी.
साबुदाणा कधी कधी मुळातच घोळाचा असतो. नेहमीप्रमाणे सगळं करूनही चिक्कट गोळाच होतो भिजवल्यावर अश्या वेळी हे जाम उपयोगी पडतं. Happy

खरंय, साबुदाणा खिचडी हा जाम आवडता प्रकार असून सुद्धा भिजवताना काय्यम घोळ Sad गिचका, नायतर टचटचित... बरोब्बर प्रमाणात कधी पाणि आमच्या हातून पडतच नाय मेलं Sad

१. कांदा शिजवताना त्यात किंचित मीठ घातले की लवकर मऊ होतो.
२.आलं सोलून घेतल्यावर त्याची साले टाकून न देता, ती चहा करताना त्यात घालावीत, मस्त स्वाद येतो.
३.पाव भाजी करताना वाफवलेल्या सर्व भाज्या स्मॅश करत बसण्यापेक्षा एकदा मिक्सरमधून भरड वाटून घ्याव्या (पाणी घालू नये, आवश्यक वाटल्यास ज्या पाण्यात वाफवले तेच पाणी थोडेसे घालावे.) भाजी मस्त एकजीव होते.
४. काही रेसिपींसाठी आपण चिकन किंवा व्हेजीटेबल्स उकडून घेतो. ह्यासाठी वापरलेले पाणी फेकून न देता, त्यापासून चिकन सूप, व्हेजीटेबल सूप इ. बनवावे.

वड्या करताना कढईतला पदार्थ कडा सोडू लागला की गॅस बंद करून त्यात २/३ चमचे पिठी साखर घालून छान ढवळावे आणि मग तूप लावलेल्या ताटात हे ओतावे. खुटखुटीत वड्या होतात.
अर्थातच बर्फी (मऊ वडी)हवी असल्यास ही युक्ती चालत नाही.

साबुदाण्यावरची चर्चा वाचून .........ही माझी टिप......
अर्थातच खिचडी प्रीप्लॅन्ड असेल तर..........
रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास साबुदाणा पाण्यात संपूर्ण बुडेल इतका भिजवावा.
अर्ध्या तासानंतर चाळणीतून एक्सेस पाणी काढून टाकावे. रात्रभर झा़कण ठेऊन भिजू द्यावा. काय बिशाद खिचडी बिघडेल!

लसुण पाकळ्या मा. वे. मधे २० - ३० सेकंद ठेवाव्या. टणाटणा फुटतात. पण जेवढा लसुण हवा तेवढाच कराव असा तो जरा नरम होतो. काहि लोकांना नंतर तो वापरताना गिलगिलित वाटु शकतो.

मानुषी तसं करून पाहिलंय गं Sad
आता साबुदाणा कोणत्या दुकानात चांगला मिळतो, याचीच टिप द्या कोणितरी.

साबु बद्दला थोडे. अम्म्म्म्ह सासरेबुवा नाही :). साबुदाणा खिचडी. त्यात करताना घालतो त्याच्या नि म्मा दाण्याचा कुट घालायचा व शेवटची वाफ काढताना ओले खवलेले खोबरं घालायचे. ज्यांना दाण्याने पित्त होते त्यांच्यासाठी तर बेस्ट. व मऊ पण होते खिचडी.

* उकडलेल्या भाज्यांत सोडा घालण्याचे टाळा, त्यामुळे भाजीतली प्रोटीन्स नष्ट होण्याची भीती असते.

* भाजी आमटीत मीठ जास्तीचे पडले तर कच्चा बटाटा कापून त्यात टाका... जेवायला वाढण्या अगोदर काढून टाका. कच्चा बटाटा जास्तीचे मीठ शोषून घेतो.

* शिळ्या पोळ्या एका स्वच्छ रूमालात गुंडाळून, एअर टाईट डब्यात घालून, प्रेशर कुकर मध्ये २ शिट्ट्या द्या. एकदम ताज्या केल्याप्रमाणे फ्रेश होतात.

* शिळ्या ब्रेडवर थोडं दूध शिंपडून, किंचित गरम ओव्हनमध्ये १५ मिनिटं ठेवा.. परत फ्रेश होतो.

पाव भाजी करताना वाफवलेल्या सर्व भाज्या स्मॅश करत बसण्यापेक्षा एकदा मिक्सरमधून भरड वाटून घ्याव्या >>> यापेक्षा एक सोपी युक्ती मी करते. Happy सिमला मिर्ची सोडून ज्या-ज्या भाज्या घालायच्यात त्या मोठे तुकडे करून कुकरमध्ये शिट्टीसाठी फुसफुसायला लागल की ५ मिंन्ट बारीक ठेवा. नंतर मोठ्या चमच्याने सुध्दा सहजी मेण होतात भाज्या.

गुळ कडक झाला असेल आणि फोडता / कापता येत नसेल तर ३० सेकंद मावे मधे ठेवा. चांगला सॉफ्ट होतो, कपता येतो. नंतर पुन्हा रुम टेम्परेचर ला पुर्ववत पण होतो.

GAAJAR KISTANAA HAAT KAAPU NAYE YAA SATHI KAAY KARAAVE... ?

MAZE DONHI HAATANCHI BOTE VARUN NEHAMI KISALI JAATAAT.... Sad TYA MULE GELI 10 VARSHAN PASUN GAAJAR KISALE NAAHI... Sad

KAAHI YUKTI AAHE KAA...BOT VAACHAVNYA SATHI

Pages