शाहिरी

Submitted by वैवकु on 25 November, 2011 - 07:38

गालीबी नी साहिरी जमलीच नाही
वेदनांची शाहिरी जमलीच नाही

मीच केला भावनांचा कोंडमारा
शेवटी जगजाहिरी जमलीच नाही

जिंकताना हारलो कित्येकदा मी
जिंकण्याची माहिरी जमलीच नाही

मीच केली येथ माझी घोर निंदा
का मुळी वाहवाहिरी जमलीच नाही

बंदगी अन जिंदगी मी एक केली
आतली अन बाहिरी जमलीच नाही

गुलमोहर: 

मीच केला भावनांचा कोंडमारा
शेवटी जगजाहिरी जमलीच नाही...व्वा व्वा!