माहीम हलवा - Ice Halavaa

Submitted by आरती. on 22 November, 2011 - 12:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी - रवा किंवा मैदा
१ वाटी - दुधाची पावडर
१ वाटी - तूप
४ वाटी - दूध
४ वाटी- साखर
१ टे. स्पून - बदाम, पिस्ता आणि काजूचे पातळ काप
१/२ टि. स्पून - वेलची पूड
१ प्लास्टिकच्या sheet ला तूप लावून ठेवावे.
१ बटर पेपरची sheet घेऊन माहीम हलव्याच्या आकारात कापून ठेवाव्यात.

क्रमवार पाककृती: 

एका जाडबुडाच्या कढईत रवा किंवा मैदा, साखर, दुधाची पावडर, दुध आणि तूप मिक्स करा.
कढई मध्यम आंचेवर गॅसवर ठेवून सारख ढवळत रहा.
थोडयावेळाने मिश्रणाचा घट्ट गोळा तयार झाला कि गॅस बंद करा.
५ मि. मिश्रण थंड होऊ द्या.
हा गोळा तूप लावलेल्या प्लास्टिकच्या sheet वर मध्यावर ठेवा. sheetची घडी घालून लाटण्याने पातळ लाटा.
sheetची वरची घडी काढून पातळ पोळीवर बदाम, पिस्ता आणि काजूचे पातळ काप व वेलची पूड सगळीकडे पसरवा. परत sheetची घडी घालून लाटणीने दोन तीन वेळा फिरवा.
प्लास्टिकच्या sheetची वरची घडी काढून माहिम हलव्याचे चोकोनी तुकडे करा.
१ तासाने माहिम हलवा सेट होईल.
एक एक तुकडा कापलेल्या बटर पेपरवर ठेवा.

mahim halwa.jpg

अधिक टिपा: 

वरील मिश्रणामध्ये १/२ चमचा हळद घालून पिवळ्या रंगाचा माहिम हलवा तयार करा.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर, हे माहीम हलवा असं आहे ना ? कृपया दुरुस्त करणार का ? तसंच ते चुकून विरंगुळा त ओपन झालंय, ते पाककृती मधे हलवायला हवं. धन्यवाद.

१ कप रवा किंवा मैदा घ्यायचा
If you want colour then you can use 1/4 teaspoon of turmeric powder. Add turmeric powder when you are adding other ingredients.

.

.

माहिम हलवा अत्यंत आवडता प्रकार आहे माझा मात्र हा प्रकार फक्त विकतचाच खाल्लाय.
बाकी संपादन पर्याय वापरुन शीर्षक बदलून "हलवा - halavaa" असे करणार का? नुसते नाव वाचून काही बोध होत नाही. जमले तर रोमनमध्ये न लिहीता देवनागरीत कृती लिहा.

Ice Halava hya nava ne sudha prasidha aahe.
Mala devnagarit type karayacha hota pan type karatan khup problem hot aahe, pan lavkarach prayatna karen devnagarit type karanyacha.

आर , अत्यंत आवडता पदार्थ आहे माझा हा. फोटो तर एकदमच खास आहे. करुन बघणार नक्की.
देवनागरी लिहायला जमेल हळूहळू. मायबोलीवर स्वागत. Happy

Dhanyavad Seema. Karun baghitala tumhi ki mala nakki photo pathava.

छान जमलाय हलवा. माझ्या मते आईस हलवा हा पदार्थ थोडा वेगळा असतो. बंगाली मिठाईचा प्रकार आहे तो. चौकोनी रसगुल्याच्या मधे भरलेले क्रीम असा प्रकार असतो तो.

Dineshda,

Thanks ani tumchya receipies pan khup chan asatat. Tumhi swata banavatat ka??
Ice Halwa bangali mithai cha prakar nahi. Mahim Halava, South India madhye Bombay Ice Halwa mhanun prasidha aahe.

बदामी हलव्यापेक्षा माहीम हलवाच चांगला खायला. बदामी हलवा दातातली चांदी / कॅप उचकटवू शकतो सहज Wink
आर, मस्तच दिसतोय तुम्ही बनवलेला हलवा Happy पण मराठीत लिहायचं तेवढं मनावर घ्या प्लीज Happy

बदामी हलवा दातातली चांदी / कॅप उचकटवू शकतो सहज >>> ह्म्म्म. तू पण माझ्याच कॅटेगरीतली दिसतेयस Wink तू पण एक्लेअर खात नसशील ना?

तू पण एक्लेअर खात नसशील ना? >>> अज्जिबात नाही Happy चिक्की पण जरा पारखूनच खावी लागते Wink
आर, सीताफळ आईस्क्रीम धावेल Happy