महीपत, सुमार आणि रसाळगड ह्यां किल्ल्यांवर जाण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता?

Submitted by विजय आंग्रे on 22 November, 2011 - 04:30

नमस्कार भटक्या मित्रांनो Happy
कोकणात रत्नागिरी जिल्हातील खेड जवळ असणारे महीपत, सुमार आणि रसाळगड दुर्गत्रिकूट, पोलादपूर सोडल्यावर, मुख्य सह्याद्रीपर्वत रांगेशी स्पर्धा करत जाणार्‍या एका डोंगरसोंडेवर असलेले हे किल्ले. त्यातल्यात्यात महीपत आणि रसाळगड हे थोडे वहीवाट असलेले पण सुमारगड अगदीच वेगळा पडलेला, या किल्ल्यांची सफर करण्याचा पुढच्या महीन्यात विचार चाललाय तरी मा.बो. वरिल कोणी भटके याही बाजूला भटकले असल्यास माहीती द्यावी..

धन्यवाद....
विजय आंग्रे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणात रत्नागिरी जिल्हातील खेड जवळ असणारे महीपत, सुमार आणि रसाळगड दुर्गत्रिकूट,आपण सप्टेंबर पासुन करु शकता रसाळगड पासुन सुरु करा.गाईड ,पाणी, खाणे,आवश्क रसाळ्वाडीतच घेणे आणखी माहीती हवी असलेस मो बा ०९४२२५८२३५३ संपक्र करा.

आंग्रे साहेब.. कुठल्या दृष्टीने सुंदर म्हणायचे आहे तुम्हाला? सह्याद्री १२ महिने नितांत सुंदरच असतो.. Happy अर्थात फेब्रुवारी नंतर सौंदर्य रांगडे आणि पावसाळ्यानंतर सौंदर्य हिरवेगार... आपल्याला जे पहायचे आणि टिपायचे त्या मोसमात भटकंती करावी.. Happy

मी तर म्हणतो शक्य असल्यास प्रत्येक किल्ला / ठिकाण किमान ३ वेळा वेगवेगळ्या मोसमात करावा.. Happy