प्रेम...!!

Submitted by mahesh_engpune on 21 November, 2011 - 06:02

प्रेम!!! आहे खरा अडीच अक्षरी शब्द हा, पण किती तरी गुढार्थ लपलाय त्याच्यात. अन हाच गुढार्थ शोधण्याच्या जाणीवेपोटी आजवर कितीतरी उपमा त्याला दिल्या गेल्या. आजमितीला कितीतरी भाषांमधे कितीतरी स्वरुपात ह्या प्रेमाची महिमा गायली गेली असेल हे मलाही सांगता येणार नाही. पण मला सांगायचय ते मला कळालेले प्रेम. माझ्या द्रुष्टिकोनातुन मला जाणावलेलं प्रेम.
प्रेम म्हटलं की आजकाल ते फक्त स्त्री पुरुष या नात्यातल्या विविध भावनांच कोंदडटलेले आभाळच झालय. प्रेम म्हणजे काय असतं हे समजुन घेण्याच्या फंदातही फारस न पडता कुठल्यातरी भावनेला प्रेम म्हणायच फॅडच आलय आजकाल. असोत. स्त्री पुरुष या द्वयीचा प्रेम या संकल्पनेशी फारच जवळचा अन खुपच घट्ट असा संबध आहे अन त्याचमुळे प्रेमाची व्याख्या ह्या दोन पात्रांभवतीच फिरत राहते. पण स्त्री अन पुरुष हे त्या संकल्पने पर्यंत जाण्याच एक साधन आहे. खर तर आजवर प्रेमाची अशी कुथलीच सर्वव्यावी व्याख्या अस्तित्वात नाही. जे काही प्रेमा बद्दल ऐकविण्यात आलय ते मला फारस पटत नाही.
प्रेम म्हणे सागरा सारखं असतं, कारण त्याला कुठल्याच सीमा नसतात. असं बरेच जण म्हणतात. पण मला प्रेम वाटतं ते झर्‍याच्या धारेसारखं! अस्तित्व असुनही नसल्यासारखं!! अस्तित्वाशी त्याच धारेचं फारसं देणंघेणं नसावचं. म्हणुन तर अश्या असंख्य धारा मिळुन त्याचा झरा होतो. पण तोही प्रवाही. हाच प्रवाही झरा पुढे स्वताच अस्तित्व विसरुन नदीचं स्वरुप घेतो. ती नदीही प्रवाहीच. पुढे अश्याच असंख्य नद्या एकमेंकाना मिळुन सागराचं स्वरुप घेतात. अन सागर महासागराचं!! ह्या सगळ्या अस्तित्व लोप पावण्याच्या क्रियेतही एक स्थुल भाव कायम रहात असतो सर्वांमधे. अन तो म्हणजे प्रवाही पणा..!! अस्तित्व गमावणं म्हणजे प्रेम नसतं. तर दुसर्‍याच्या जागी जाऊन त्याचं अस्तित्व होणं म्हणजे प्रेमाचा एक घटक होणं असतं. हो प्रेमाचा घटक! आजवर जे प्रेमाचं वर्णन ऐकत आलोय त्यात मला प्रेम कमी अन त्याचे घटकच जास्त दिसतात. प्रेमाला घटक असतात? माझ्यामते तरी हो प्रेमाला घटक असतात. अन आपण या घटकांनाच सर्वव्यापी प्रेम म्हणुन संबोधत त्या खर्‍या प्रेमाच्या साक्षात्कारापासुन वंचित राहतो. स्त्री पुरुष नात्यांतील भावना या प्रेमाच्या घटक असतात पण सर्वव्यापी प्रेम नसतात. तसेच काम, क्रोध, मत्सर्,लोभ हे प्रेमाचे शत्रु मानले जाणरे विषय सुद्धा प्रेमाचेच घटक असतात. प्रेम फक्त अनुभवता येतं. असं शब्दात मांडण्या इतकं ते सोप्पं नसतं अन म्हणुनच प्रेमाची व्याख्या करताना या प्रेमाच्या घटकांनाच प्रेम म्हणुन ग्राह्य धरलं जातं. आपल्याकडे वारकरी सांप्रदयात हरीपाठ झाल्यानंतर एकमेंकाच्या पाया पडतात. का तर म्हणे भागवत धर्माची शिकवण च अशी आहे की त्यात देव हा माणसात व्यापलेला आहे. माणसाच्या जो देवाच्या भक्तीत रमलेला आहे त्याच्या देहात देवच तर कणाकणाण वास्तव करुन उरलाय. मग तरीही वारकरी आपल्या लाडक्या विठुरायच्या मुर्तीला वंदतातच की! आपलं ही तसचं!! प्रेमाच्या घटकांत आपण इतक गुरफुटुन गेलोत की खरं प्रेम आपल्या कळण्या पलिकडे गेलय. प्रेमाचा मुळ प्रवाही पणा सोडुन आपण त्याच्या स्थायी भावाकडेच जास्त लक्ष देउन असतो. प्रेमाला आपण उगीचच नात्याच्या वीणीत गुंफत असतो. पण प्रेमाला अस्तित्व देण्याचा तो माणसाचा अक्कल हुशारीपणाच..!! प्राण्यात कुठे असतात नाती. पण प्रेम असतच की! प्रेम म्हणजे आजवर वर्णिनेल्या त्याच्या घटकांच असं एक बेमालुम मिश्रण आहे की त्याचं खरं अस्तित्वच दुरापास्त झालय. ह्या घटकांच्या पलिकडेच खरं प्रेम उमगायला लागेल.
मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटत माणुस हा खुपच लोभी प्राणी. हव्यास हा तर त्याचा मुळ स्थायी स्वभाव. पण प्रेमाच्या बाबातीत तो मात्र फारच अल्पसंतुष्ट राहिला. अन म्हणुनच तो प्रेमाच्या खर्‍या संकल्पनेपासुन दुरावला गेला. त्याला प्रेमाच्या घटकातच जास्त रमावस वाटल.
माझाही शोध चालुच आहे प्रेमाला समजुन घेण्याचा. पण प्रेमाला तर त्याच्या घटकांना नाही. पण प्रेमाच्या या घटकांना समजुन घेतल्याशिवायही प्रेम समजणं तसं अवघडच की..!!

______________--------------------------- महेश. रा. घुले.

गुलमोहर: 

फक्त अनुभवता येतं. असं शब्दात मांडण्या इतकं ते सोप्पं नसतं >>> ह्येच्यावर जर ठाम राहिला असतात तर असं 'कणाकणाण प्रवाही घटकप्राय अस्तित्वहीन स्थायी अल्पसंतुष्टीय स्त्री-पुरुषद्वयी झरा' लिहायच्या फंदात पडला नसता..

भुगोल, भौतिकशास्त्र, अध्यात्म, तत्वज्ञान ज्याच्या कणाकणात भरले आहे असा लेख.