तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता........तरही

Submitted by सुहासिनी on 17 November, 2011 - 02:03

जरी तू वायदा दोघातला धुडकावला होता,
तुझ्या पत्रातला मजकुर का ओलावला होता.

किती रे वार केले तू मनावरती सख्या माझ्या,
तुझ्यासाठी तरी का जीव हा नादावला होता.

नभाला भाव भिडले सर्व वस्तूंचे तरी सुध्दा,
कळेना माणसांचा भाव का मंदावला होता.

विरह का गोंदला माझ्या तुझ्या भाळीच दैवाने,
नभीचा चंद्रही ते पाहुनी पाणावला होता.

मना मध्ये तुझ्या जेव्हा वसंताची वसे चाहुल,
ॠतू तेव्हाच प्रेमाचा कसा थंडावला होता.

...........सुहासिनी सुरेश.

गुलमोहर: 

कळेना माणसांचा भाव का मंदावला होता

ॠतू तेव्हाच प्रेमाचा कसा थंडावला होता

असे काही सुटे मिसरे आवडले. बरा प्रयत्न आहे:) शुभेच्छा

मतला, मंदावला व शेवटचा वसंताचा शेर आवडले. Happy 'मंदावला' या शेरात 'तरी पण' ऐवजी 'तरीसुद्धा' असे केल्यास वृत्तात बसेल. Happy खूप शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

विजयजी, प्रितीजी, निशिकांतजी, सगळ्यांची आभारी आहे.
बेफिकीरजी, आपण केलेली सुचना बरोबर आहे, वहित तोच शब्द आहे पण लिहीतांना चुक झाली. दुरूस्त केली आहे.धन्यवाद.

जरी तू वायदा दोघातला धुडकावला होता.
तुझ्या पत्रातला मजकुर का ओलावला होता.....<< सुंदर मतला >>

कळेना माणसांचा भाव का मंदावला होता......<<< सुंदर मिसरा >>>

मनामध्ये तुझ्या जेव्हा वसंताची वसे चाहुल.
ॠतू तेव्हाच प्रेमाचा कसा थंडावला होता......... <<< सुंदर शेवटचा शेर >>>>>