कासच पठार आणि आमचं वरातीमागुन आलेलं घोडं

Submitted by झकासराव on 14 November, 2011 - 06:59

नमस्कार मंडळी!!
आज बरेच दिवसानी की महिन्यानी इकडे फोटू टाकतोय. तसं पहायला गेलं तर कासला जाउन आलो त्यालाच २ महिने उलटुन गेले. पण फोटो शेअर करणं होतच नव्हतं म्हणून हे आमच वरातीमागुन आलेलं घोडं ...

कासच पठार अफाट आहे. विस्ताराने, सौंदर्याने आणि विविधतेने संपन्न अस हे पठार.
तिथे आपल्याला अनेक प्रकारचे लोक आलेले दिसतील, हौशे, नवशे, गवशे, कचरा करणारे, कचरा होउ न देणारे, कचरा साफ करणारे, फोटोसाठी आलेले, ये कास कीस चिडिया का नाम है बघुन येवु असा आविर्भाव असलेले, अजुन एक वीकेंड साजरा करण्यासाठी आलेले, सगळ्यानी पाहिल म्हणुन आपणहि बघु म्हणून आलेले,
मोबाइलमध्ये मिलिमीटरच्या आकारात असलेल्या फुलांचे फोटु काढण्याचे प्रयत्न करणारे, फुलांची काळजी असणारे, फुल तुडवुन उधळलेले, फुलांच्या ताटव्यात बसुन वनभोजन करणारे, छोट्याशा रस्त्यावर आपली चारचाकी कशीही पार्क करुन छोटासा रस्ता जॅम करणारे, वनरक्षकांच म्हणण्याप्रमाणे खालीच चारचाकी पार्क करुन महमंडळाच्या एस टी साठी रांगेत उभा राहुन तिकिट काढुन निसर्गाची काळजी घेणार्‍या लोकांना आदर देणारे, पार्किंग पासुन पठारावर चालत जाणारे....
तर मंडळी आपण हे बघत बघत जायच पठारावर आणि अदभुत निसर्गसौंदर्याची अनुभुती घेत जमेल तसं कॅमेर्‍यात सौंदर्य पकडण्याचा प्रयत्न करायचा. हा असाच एक प्रयत्न. साध्या डिजिटल कॅमेर्‍याने केलेला. फुलं एकतर छोटी, त्यात डिजिटल कॅमेर्‍यातील मॅन्युअल फोकसींगची बोंब, वरुन सुर्यदेव अतिप्रसन्न असल्याने त्या दिवशी असलेला भरपुर प्रकाश. ह्या सर्व कारणाने जमेल तसं मॅन्युअल सेटींग करत फोटॉ काढले आहेत ते गोड मानुन घ्या. Happy

कॅमेरा सोनी एच ७.
१) गालिचा
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

२) समोरच सज्जनगड दिसतोय.
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

३) मिकि माउस / कवळा
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

४)
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

५) हे फुल खुपच छोटं होतं.
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

६) सीतेची आसवं
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

७)
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

८) ही वाट दुर जाते, फुलांच्या गावा
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

९)
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

१०)नफाडी??
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

११)
From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

१२)From Kaas-Plateau of floers in maharashtra" alt="" />

अजुन काहि फोटॉ खालील लिन्क्वर आहेत.
https://picasaweb.google.com/zakasrao/KaasPlateauOfFloersInMaharashtra

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

झक्या,
काही फोटो दिसत नाहियेत, पण उशिरा जाऊन सुद्धा चांगली दृश्य लागली की हाताला. पुढच्या वर्षी जास्ती उशिर करू नकोस. Happy

धन्यवाद सर्वाना. Happy
मी गेलो त्यादिवशी छान सुर्यप्रकाश होता. आधी गेलो असतो तर तितका चांगला सुर्यप्रकाश नसता मिळाला.
त्यामुळे एवढे फोटो काढता आले. बॅटरी पुर्ण डाउन झाल्याने (आदल्या दिवशी फुल्ल चार्ज केली होती तरिहि) बरेच फोटॉ घेता आलेच नाहीत.
बरीच फुल पहायलाच नाही मिळाली. Sad
जामोप्या, कास हे सातार्‍यापासुन जवळच एक पठार आहे जे मागच्या ४-५ वर्षात तिथल्या विविध रान्फुलांमुळे चर्चेत आणि प्रसिद्धिस आल आहे. पुढच्या वर्षी जायच हे नक्की. जमलच तर तोवर डी-एसएलाआर्च बजेट पुर्ण झालं पाहिजे मग अजुन मजा येइल फोटु काढायला. Happy