चुकतय कुठे आणि कोणाचं?

Submitted by नीतु on 12 November, 2011 - 01:50

हल्लीच मला माझ्या शाळेच्या एक शिक्षिका भेटल्या होत्या, तेव्हा त्या म्हणत होत्या, हल्लीच्या मुलांना शिक्षकांविषयी आदरच नाही, शिक्षक वर्गात आले की पूर्वी मुलं उठून उभी रहात, आता शिक्षक वर्गात आले तरी मुलांच लक्ष नसतं. पूर्वी रस्त्यात शिक्षक भेटले तर मुलं पाया पडत असतं. आता हसत देखील नाहीत्.काही लिहून आणायला सांगितल, तर मुलं झेरोक्स काढतात. वगैरे वगैरे, मग मनात विचार आला, चुकतय कोणाचं आणि कुठे? आई वडील घराबाहेर, विभक्त कुटुंब पध्द्ती, एक किंवा दोन मुले, आई वडिलांचा मुलांशी संभाषणाचा अभाव, घरात संगणक, मोबाइल वगैरे वस्तूंची उपलब्धता, ही तर कारण नसतील? काही अंशी मुलांच्या अशा वागण्याला ही कारणं जबाबदार असतील देखील नाही असे नाही. वाढती महागाई, किंमती शिक्षण, वाढणारे जागांचे भाव यामुळे घरच्या स्त्रीला पैसे कमवायला घराबाहेर पडावे लागले. मुलांवर संस्कार करणारी आईच घराबाहेर गेली त्यामुळे मुलांना दुसय्राच्या ताब्यात तिला द्यावे लागले. काही मुले तर एकटी दिवसभर रहातात. मग काय घरी काही केले तरी लक्ष ठेवणारे कोणी नाही. आई वडील कमावणारे असल्यामुळे घरात वस्तूंची रेलचेल होऊ लागली, जाऊ दे, कोणासाठी कमावतो आहे, मुलांसाठीच ना? ही भावना वाढीस लागली. पूर्वी मुलांचा अभ्यास आई वडील घेत असत, आता आई वडिलांना वेळ नाही, त्यामुळे क्लासेसचं प्रस्थ वाढलं आहे. परप्रांतीयांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे, विशेषता मुंबईमध्ये शाळा महाविद्यालय कमी पडत आहेत, स्पर्धा वाढली आहे, हवे तेवढे पैसे देऊन दाखले दिले जात आहेत. मुंबईच्या मुलांना शिक्षणासाठी मुंबईच्या बाहेर जावे लागत आहे, तो ही खर्च वाढत आहे.
एका मिनिटात हवी ती माहिती त्यांना इंटरनेट उपलब्ध होतेय त्यामुळे मुलांच वाचन कमी झालयं. रात्री नऊ वाजता मुलं क्लासमधून घरी येतात. कसेतरी दोन घास खातात त्यामुळे त्यांच्या तब्बेतीवर परीणाम होतोय. चुकतय कुठे आणि कोणाचं हेच कळेनासं झालय. मुलांच्या द्रुष्तीने विचार केला तर त्यांच बरोबर वाटत. पालकांचा विचार केला तर त्यांच ही बरोबर वाटत. मोबाईल संगणक या सर्वांचा चांगल्या कामासाठी उपयोग करुन घेतला तर खरच आपला आणि देशाचा फायदा होईल. पण तसे होत नाही आहे, त्याचा दुरुपयोगच जास्त होतोय, याची जाणीव नवीन पीढीला लवकरच व्हावी.

गुलमोहर: 

जव्हेरगंज

आपले चांगले विचार दुसय्रांपर्यंत पोहोचवणे हा दुरुपयोग नव्हे. मग तुम्ही काय तेच करताय.

आम्ही कुठे आस म्हटल बॉ, संगणकाचा दुरुपयोग़ जास्त होतोय म्हणुन..
बाकी आपल चिंतन ठिकय..
आम्हाला आपला एक विरोधाभास आढळला, तो आम्ही मांडला..

मला तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते कळत नाहीये. तुम्ही ज्या "आजकाल"च्या गोष्टी म्हणताय (उदा. विभक्त कुटुंबे, नोकरीतले आईवडील इ) त्या कमीतकमी २० वर्षापासून तरी "आजकालच्या" म्हणून वादग्रस्त आहेत.
मी ४-५वीत असताना "टीव्ही - बेन ऑर बून" असा विषय निबंधाला असायचा. मग ७-८वीत तो "संगणक" वर आला. ११-१२ वीत असताना "इंटरनेट" वर घसरला. आता मोबाइल वर लिहित असतील पोरं. टेक्नॉलॉजी चांगल्या कामासाठी वापरली तर चांगली नाहीतर वाईट यशिवाय काय निष्कर्ष निघु शकतो यातून? त्यात विशेष चर्चा करण्यासारखे ते काय हे मला आधीही कळायचं नाही अन आताही कळत नाही. असो.

चला.. पुन्हा एकदा सुरूवात.. आजची पीढी.. आदर.. सन्स्कार.. नोकरी करणारी आई.. डेकेअर .. संस्कार.. आजी आजोबा.. लक्ष न देऊ शकणे.. इ. इ. इ.

आता शिक्षकान्ना आदर मिळत नाही.. मूले वाचत नाहीत ह्यासाठी शिक्षक काय करतात? ह्यासाठी पालक त्यान्च्या शिक्षकांवर किती विश्वास नि आदर दाखवतात (तरी)? किती आजी आजोबा संध्याकाळच्या सिरीअल्स सोडून काही तरी क्रिएटीव्ह छंद जोपासतात किंवा नातवंडाचे इतरत्र वाचन वाढावे म्हणून प्रयत्न करत्तात? किती जण नात्यातल्या छोट्या मुलान्ना एकादे बक्षिस म्हणून पुस्तक भेट करतात?

किती शिक्षकान्नी हॅरी पॉटर किन्वा ट्वायलाईट सागा वाचलेत? मराठीतले नविन लेखन वाचलेय? किती शिक्षक मूल क्लासला शिकतच म्हणून शाळेत पाट्या टाकतात? किती शिक्षक अभ्यासक्रमाच्या बाहेरची गणितं.. प्रयोग.. लेखन ह्याची मुलान्ना ओळख व्हावी म्हणून विशेष प्रयत्न करतात? एकाद्या शिक्षकाने भाषा शिकवली आणि पोर्शन नाही शिकवला की किती पालक पीटीएला बोंबाबोंब करतात? किती शिक्षक मुलांसमोर व्यसन, पांचट मस्करी करू नये यासारखे नियम पाळतात?

जे चान्गले शिक्षक असतात त्यान्ना रिस्पेक्ट मिळतोच आणि मुलान्शी एकदा बोलून पहा त्यांच्या लेवलवर.. त्यांना बरेच काही महीत असत .. आन्तरजालाच्या उपयोगानेच!

चान्गले काम म्हणजे काय?

असे लेख म्हणजे "प्रकट स्वगत चिंतन" प्रकाराचे असतील तर त्यातून कुठचीही पीढी वै. काहीही शिकणार नाहीये.. समाज मन बदलता येत असेल तर बघा नाही तर फक्त.. "वादे वादे .."

जाई जुई

हा लेख त्यासाठीच लिहिला आहे, कोणाच चुकतय तेच कळेनासं झालय. दोन्ही पीढ्यांनी एकमेकांचे चांगले गुण घ्यावेत. एकमेकांना समजून घ्यावे.