दिनांक ११.११.११च्या निमित्ताने...

Submitted by किंकर on 10 November, 2011 - 23:43

लिहणार आहात का कधी दैनंदिनी?
असा प्रश्न मी विचारला होता त्याला आज एक वर्ष एक महिना एक दिवस झाला. त्या दिवशी तारीख होती १०/१०/१०
आणि आज आहे ११/११/११ ....
खरेतर ८/८/८८ पासूनच अनेकदा अशा जुळून येणार्‍या तारखा आणि आपण काहीतरी वेगळे करावे हि उर्मी मनात अनेकदा येवून गेली.पण त्या त्या वेळी असे काही तरी घडले कि,प्रत्यक्षात काही उतरलेच नाही. एक वर्ष एक महिना आणि एक दिवसापूर्वी मी मनात म्हणालो,चला आता १०/१०/१० अशी सुरेख तारीख आली आहे तर आज पासून दैनंदिनी लिखाणास सुरवात करू या.

पण अंतर्मन बोलते झाले आणि म्हणाले. काही तरीच काय? म्हणे दैनंदिनी लिहणार आणि मनात खालील विचारांची मालिकाच येवून गेली.
कधी काही मनात आले कि लेखणी उचलावी आणि अनुभव नोंदवून ठेवावा इतपत ठीक. पण काही जण दैनंदिनी लिहतात.ते नक्की काय करतात ? असा प्रश्न मला नेहमी पडतो.आणि दैनंदिनीतील नोंदी खरच खर्‍या असतात का?
.....मी आज घरी कोणीही आजारी नसतना मी खोटे कारण नोंदवून रजा घेतली.
.....आज समोरच्या टेबलवर बसणारी अमुक तमुक xxxx खरच इतकी गोड दिसत होती,
वाटले आत्ता उठावे आणि xxxx
.....मी आज इतके पैसे लाच म्हणून देवून माझे हे अवैध काम पूर्ण करून घेतले.
.....उद्या त्याला इतकी रक्कम आणून दे म्हणजे तुझे काम करतो असे सांगितले आहे.
.....आज माझ्या जुन्या मैत्रिणीचा फोन आला होता.ती पुढील आठवड्यात माहेरी येणार आहे,आणि तिने भेटायला बोलवले आहे.अशा नोंदी असणारी दैनंदिनी कोणी ठेवते का ? नाही.
पण घटना मात्र अशा घडत असतात. म्हणूनच मला नेहमी असे वाटते कि, ......
स्वतः विषयी, स्वतःला आलेल्या अनुभवांविषयी, मनातल्या आंदोलनांविषयी,ज्यांच्याकडे खरे बोलण्याची ताकद असते तेच ...
सातत्य आणि सत्यता जपण्याचे धाडस ज्यांच्याकडे आहे तेच ...
"तुम्ही नेहमी खरे बोला लोकांना तो विनोद वाटेल"- असे म्हणणारा मार्क ट्वेन ज्यांना समजला आहे तेच ...
माझ्या चुका इतरांना समजल्याने मला काय कमीपणा येणार आहे?असा विचार जे करू शकतात तेच.....
कालची गोष्ट उद्या कोणास कळली तर काय होईल याची आज ज्यांना चिंता नसते तेच ....
आत्म चरित्र आणि आत्म चारित्र्य जे एकाच पातळीवर तोलतात तेच .....
दैनंदिनी लिहू शकतात.
आणि म्हणूनच मी कधीही दैनंदिनी लिहणार नाही. आणि एवढेच फक्त मी खरे बोलू शकतो..
आणि आज दिनांक ११.११.११च्या निमित्ताने विचारतो तुमचे काय ?
लिहणार आहात का कधी दैनंदिनी?
एक वर्ष एक महिना एक दिवसापूर्वी मला पडलेला हा प्रश्न मी आज पुन्हा ११/११/११ च्या निमित्ताने विचारला आहे.अगदी १२/१२/१२ पर्यंत विचार करून सांगितलेत तरी चालेल पण त्यानंतर इतकी सुरेख तारीख पुढे अनेक वर्षे आपल्या वाट्याला येणार नाही हे मात्र विसरू नका बर का !

गुलमोहर: 

भुंग्या मस्त रे.
डायरी लिहायला लागणारा प्रामाणिकपणा पटला. खरच कुणी आजपर्यंत इतक्या प्रामाणिकपणे आत्मचरित्र लिहिले असेल का डायरीच्या माध्यमातुन??

खरच कुणी आजपर्यंत इतक्या प्रामाणिकपणे आत्मचरित्र लिहिले असेल का डायरीच्या माध्यमातुन??
>>>
अर्थातच,असणारच

किंकर, मस्त लेख. आवडला आणि पटलाही. खूप दिवसानी आलात माबोवर. Happy
भूंग्या, अभिनंदन आणि आजच्या शुभेच्छा.!!. Happy

किंकर छान वाटलं वाचून !
अगदि खरं सांगायचं तर मी सुद्धा गेले बरेच दिवस १ जानेवारीला दैनंदिनी लिहायची असे ठरवते. बरेच वेळा ते शक्य होतेही. नंतर कधीतरी खंड पडतो, परत पुढच्या वर्षीच १ जानेवारीला आठवण येते. पण एक खरं हे मधून मधून लिहिलेल्या आठवणी सुद्धा परत कधीतरी निवांतपणे आपण वाचायला घेतो ना तेव्हा खूप छान वाटते. Happy
आज घरी गेल्यावर परत सुरुवात करते.

भुंगा, तुमची ह्या चार वर्षातील प्रगतीचा चढता आलेख वाचून आनंद झाला. तुमचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !

@ किंकर, मस्त लेख. आवडला आणि पटलाही.
@ भूंगा भाव, अभिनंदन आणि आजच्या शुभेच्छा.!

हम्म्म २००७ ते २०१० पर्यन्तच्या सुन्दर तारखा मी तर काहीच न करता घालवल्या म्हणजे त्या तारखा विषेश/खास होत्या हे ही मला आज, हा लेख वाचल्या वर जाणवल Sad असो आज आणी १२/१२/१२ ह्या २ तारखा आहेत अजुन हे ही नसे थोडे Happy

१२/१२/१२ पर्यंत विचार करून सांगितलेत तरी चालेल पण त्यानंतर इतकी सुरेख तारीख पुढे अनेक वर्षे आपल्या वाट्याला येणार नाही हे मात्र विसरू नका बर का !>>>>>>>>>>> सो ट्रु ... हे वाक्य मनाला टच झाल Happy

१२/१२/१२ पर्यंत विचार करून सांगितलेत तरी चालेल पण त्यानंतर इतकी सुरेख तारीख पुढे अनेक वर्षे आपल्या वाट्याला येणार नाही हे मात्र विसरू नका बर का !>>>>>>>>>>> सो ट्रु ... हे वाक्य मनाला टच झाल
>>>>>>>>>>>>>>>>>

समु.... जास्त विचार करू नकोस ग.

१२.१२.१२ ला लग्न करून मोकळी हो....... पुढेमागे तू तारीख विसरलीस तरी नवरा मात्र आयुष्यभर ती तारीख विसरणार नाही Proud Light 1

थोडक्यात पण अतिशय सुंदर लिहीले आहे. आवडले.
खास करुन हे....
>>>>>स्वतः विषयी, स्वतःला आलेल्या अनुभवांविषयी, मनातल्या आंदोलनांविषयी,ज्यांच्याकडे खरे बोलण्याची ताकद असते तेच ...
सातत्य आणि सत्यता जपण्याचे धाडस ज्यांच्याकडे आहे तेच ...
"तुम्ही नेहमी खरे बोला लोकांना तो विनोद वाटेल"- असे म्हणणारा मार्क ट्वेन ज्यांना समजला आहे तेच ...
माझ्या चुका इतरांना समजल्याने मला काय कमीपणा येणार आहे?असा विचार जे करू शकतात तेच.....
कालची गोष्ट उद्या कोणास कळली तर काय होईल याची आज ज्यांना चिंता नसते तेच ....
आत्म चरित्र आणि आत्म चारित्र्य जे एकाच पातळीवर तोलतात तेच .....
दैनंदिनी लिहू शकतात. <<<<

या मोजमापात स्वतःला प्रामाणिकपणे मोजले, तर लिहीण्यासारखे खरेतर काहीच उरत नाही!
[अन कदाचित म्हणूनच, काहीच न उरलेल्यापेक्षा वेगळे असे काही इथे लिहू पहातो, तेव्हा त्यातही काही अर्थ उरत नाही]
डायरी लिहीणे केवळ अशक्य, पण जे लिहीन ते किमान अनुभव/अनुभूतिने समजलेले असावे इतकी दक्षता मात्र मी पाळतो.

भुंगा, राजेश्वर,शुभांगी हेमंत, सुमेनिष,स्मितू, मुग्धानन्द,शोभा /प्रज्ञा १२३,समू, संदीप आहेर , limdutimbu, .... आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार!